शेंदरी बोंड अळी नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना

24 September 2018 03:18 PM


महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांच्याकडून शेंदरी बोंड अळी नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना यासाठी पिक सल्ला.

2 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018
पीक वाढीच्या अवस्था: पेरणीनंतर 75-105 दिवसांपर्यत (फुले, पाते, बोंडे तयार होण्याची अवस्था)

 • पिक फुलोरा अवस्थेत असल्यापासून प्रती एकरी 2 कामगंध सापळे बसवून सतत निरिक्षण करावीत.
 • कामगंध सापळ्यातील वडी (ल्यूर) त्याच्या वैधता तारखेप्रमाणे बदलावी.
 • कामगंध सापळ्यात अडकलेले पतंग प्रत्येक आठवड्याला बाहेर काढून नष्ट करावेत.
 • जर किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल (म्हणजेच सर्वसाधारण नर पतंग 8 प्रती सापळा सलग 3 दिवस सापडल्यास) मास ट्रॅपींगसाठी जास्तीचे 6 कामगंध सापळी प्रती एकरी लावावेत.
 • प्रती एकर (रॅन्डमली) 20 हिरवी बोंडे घेवून (एक बोंड प्रती झाड) त्याचा काप घेवून पहाणी करावी. 10% प्रादुर्भावग्रस्त फुले किंवा बोंडात जिवंत अळ्या आढळल्यास क्विनॉलफॉस 25% ए एफ 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम/प्रती 10 लिटर पाणी घेवून फवारणी करावी.
 • 10 ते 15 दिवसाच्या अंतराने क्लोरोपायरीफॉस 20% ईसी 25 मिली किंवा थायोडीकार्ब 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम/प्रती 10 लिटर पाणी घेवून फवारणी करावी.
 • उपलब्धता असल्यास सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परजीवी ट्रायकोग्रामा बॅक्टरी 60,000 अंडी प्रती एकर प्रमाणे वापर करावा.
 • साधारणपणे एका ट्रायकोकार्डवर 5,000-18,000 ट्रायकोग्रामा बॅक्टरी अंडी असतात.
 • ट्रायकोकार्ड लावल्यानंतर साधारणपणे 10 दिवस किटकनाशकांची फवारणी टाळावी.

1 ऑक्टोंबर ते 30 ऑक्टोंबर 2018
पीक वाढीची अवस्था: 105-135 दिवस (बोंडे भरणे, बोंडे फुटणे)

 • सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात ट्रायकोकार्ड लावलेले नसतील तर चार ट्रायकोकार्ड प्रती एकरी लावावेत.
 • प्रती एकरातील रॅन्डमली 20 हिरवी बोंडे घेवून शेंदरी बोंड अळीची निरीक्षणे घ्यावीत.
 • किड आर्थिक नुकसान पातळीच्या वर (कामगंध सापळे किंवा हिरवी बोंडे पाहिल्यानंतर) गेलेली असेल तर लगेच फेन्वलरेट 20% ईसी 10 मिली किंवा सायपरमेथ्रिन 10% ईसी 10 मिली प्रती 10 लिटर पाणी घेवून फवारणी करावी.

1 नोव्हेंबर 2018 ते 15 जानेवारी 2019
पीक वाढीची अवस्था: 180-210 दिवस (बोंड फुटणे, वेचणी)

 • शेवटची वेचणी करून वेचणी झालेल्या शेतात चरण्यासाठी मोकळी जनावरे सोडावीत.
 • पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळी पिकाची फेरपालट करावी.

संदर्भ:
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन वेबसाईट

बोंडअळी शेंदरी बोंड अळी pink bollworm cotton agriculture department कृषी विभाग कापूस पिक सल्ला crop advice control नियंत्रण शेतकरी farmer
English Summary: control measures for pink bollworm in cotton

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.