महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांच्याकडून शेंदरी बोंड अळी नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना यासाठी पिक सल्ला.
2 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018
पीक वाढीच्या अवस्था: पेरणीनंतर 75-105 दिवसांपर्यत (फुले, पाते, बोंडे तयार होण्याची अवस्था)
- पिक फुलोरा अवस्थेत असल्यापासून प्रती एकरी 2 कामगंध सापळे बसवून सतत निरिक्षण करावीत.
- कामगंध सापळ्यातील वडी (ल्यूर) त्याच्या वैधता तारखेप्रमाणे बदलावी.
- कामगंध सापळ्यात अडकलेले पतंग प्रत्येक आठवड्याला बाहेर काढून नष्ट करावेत.
- जर किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल (म्हणजेच सर्वसाधारण नर पतंग 8 प्रती सापळा सलग 3 दिवस सापडल्यास) मास ट्रॅपींगसाठी जास्तीचे 6 कामगंध सापळी प्रती एकरी लावावेत.
- प्रती एकर (रॅन्डमली) 20 हिरवी बोंडे घेवून (एक बोंड प्रती झाड) त्याचा काप घेवून पहाणी करावी. 10% प्रादुर्भावग्रस्त फुले किंवा बोंडात जिवंत अळ्या आढळल्यास क्विनॉलफॉस 25% ए एफ 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम/प्रती 10 लिटर पाणी घेवून फवारणी करावी.
- 10 ते 15 दिवसाच्या अंतराने क्लोरोपायरीफॉस 20% ईसी 25 मिली किंवा थायोडीकार्ब 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम/प्रती 10 लिटर पाणी घेवून फवारणी करावी.
- उपलब्धता असल्यास सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परजीवी ट्रायकोग्रामा बॅक्टरी 60,000 अंडी प्रती एकर प्रमाणे वापर करावा.
- साधारणपणे एका ट्रायकोकार्डवर 5,000-18,000 ट्रायकोग्रामा बॅक्टरी अंडी असतात.
- ट्रायकोकार्ड लावल्यानंतर साधारणपणे 10 दिवस किटकनाशकांची फवारणी टाळावी.
1 ऑक्टोंबर ते 30 ऑक्टोंबर 2018
पीक वाढीची अवस्था: 105-135 दिवस (बोंडे भरणे, बोंडे फुटणे)
- सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात ट्रायकोकार्ड लावलेले नसतील तर चार ट्रायकोकार्ड प्रती एकरी लावावेत.
- प्रती एकरातील रॅन्डमली 20 हिरवी बोंडे घेवून शेंदरी बोंड अळीची निरीक्षणे घ्यावीत.
- किड आर्थिक नुकसान पातळीच्या वर (कामगंध सापळे किंवा हिरवी बोंडे पाहिल्यानंतर) गेलेली असेल तर लगेच फेन्वलरेट 20% ईसी 10 मिली किंवा सायपरमेथ्रिन 10% ईसी 10 मिली प्रती 10 लिटर पाणी घेवून फवारणी करावी.
1 नोव्हेंबर 2018 ते 15 जानेवारी 2019
पीक वाढीची अवस्था: 180-210 दिवस (बोंड फुटणे, वेचणी)
- शेवटची वेचणी करून वेचणी झालेल्या शेतात चरण्यासाठी मोकळी जनावरे सोडावीत.
- पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळी पिकाची फेरपालट करावी.
संदर्भ:
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन वेबसाईट
Share your comments