1. कृषीपीडिया

सेंद्रिय व जैविक बद्दल गोंधळ.

अनेक शेतकर्यांना सेंद्रीय व जैविक बद्दल बोलताना गोंधळलेले पाहीलेले आहे. एवढेच काय तर अनेक तज्ञ मंडळी सूद्धा याबाबत उलटसूलट मते नोंदवितात यामूळे शेतकर्यांच्या गोंधळात अधिक भर पडते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
सेंद्रिय व जैविक बद्दल गोंधळ.

सेंद्रिय व जैविक बद्दल गोंधळ.

     त्यावेळी ९९% शेतकर्यांचा गोंधळ उडतो. काय कारण आहे.

    मित्रहो याबाबतचे अज्ञान आपला लाखोंचा तोटा करून शकते,हजारो एकर बागा व शेती नापिक करून टाकलीय या गोंधळामूळे. 

रासायनिक शेतीने जेवढे नूकसान केले त्यापेक्षा जास्त नूकसान सेंद्रिय , जैविक मधील अज्ञानामूळे होत आहे. 

आज  रासायनिक शेतीचे तोटे लक्षात येवू लागल्याने शेतकरी ओरगॅनिक चा पर्याय शोधत आहेत.

अशा वेळी शेतकर्यांकडे शास्रिय माहीती असने आवश्यक आहे नाहीतर आगीतून उठून फूफाट्यात गेल्यासारखी अवस्था आहे. 

  मार्केटमध्ये शेकडो कंपन्या. तात्पूरता फायदा देनारे प्रोडक्ट विकतात. अनेकदा त्याची शूद्धता ५०% एवढी कमी असते . 

ओरगॅनिक प्रोडक्ट मध्ये गुणवत्ता व क्वालीटी साठी कोणतेही कायदेशीर मापदंड नसल्यामूळे ओरीजनल काय व डूप्लिकेट काय हे कळेपर्यंत ते प्रोडक्ट मार्केट मधून गायब झालेले असते. 

सिविड, ह्यूमिक ॲसिड, अमिनो ॲसिड , ग्लूकोनेटेड खते व एंझाईम्स सोडून मार्केटमध्ये काहीही नाही. सेंद्रीय च्या नावाखाली या प्रोडक्टचा सर्रास वापर केला जातो , ओरगॅनिक म्हनून केवळ रिझल्ट मिळताहेत म्हनून किंवा कमीशन मिळते आहे म्हनून प्रचार करनारे अनेक लोक आहेत परंतू त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार केला जात नाही. 

आता आपन महत्त्वाचा विषय समजून घेऊ.

सेंद्रिय शेती म्हनजे काय ?

. सजिवांचे ( वनस्पती, प्राणी , पक्षी व सूक्ष्मजिव ) उत्सर्जीत पदार्थ व त्यांचे जिवंत वा मृत अवशेष आणि खाणींतून मिळनारी नैसर्गिक पदार्थ यांचा ज्या शेतीमध्ये निविष्ठांसाठी वापर होतो तिला सेंद्रीय शेती असे म्हनतात. 

    उदा. शेणखत, कंपोस्ट, मासळी खत, पेंडीखत, पोल्ट्री खत, खाणीतील खनिज पदार्थ ( चूना , बेंटोनाइट वगैरे) , सेंद्रीय खते झाडपाल्यांचे अर्क , तेल, सीवीड अशी मोठी यादी करता येइल.

सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशके व बूरशीनाशके १००% प्रतिबंधित असतात 

  तर रासायनिक खते नियंत्रित केलेली आहेत. ९९% शेतकर्यांना हे माहीतच नाही की रासायनिक खते काही प्रमाणात चालतात. 

     आता आपन पाहूया.

 

जैविक शेती म्हनजे काय?

 

ज्या पद्धतीमध्ये जिवानू कल्चरचा शेतीसाठी खत व औषधे म्हनून उपयोग केला जातो तिला जैविक शेती म्हनतात.

   एन पी के बॅक्टेरिया , ट्रायकोडर्मा , सूडो ,बॅसीलस व व्हॅम ( VAM ) अशी काही ठळक यादी करता येईल. 

    हे जिवाणू व फंगस मित्रजिव म्हनून काम करतात , खते उपलब्ध करने, रोग नियंत्रीत करने , शत्रू किटक नष्ट करने असे कार्य हे जिव करतात. 

  मग यांची उपलब्धता व्हावी यासाठी लॅबमध्ये वाढविलेले कल्चर , स्लर्या, वेस्ट डिकंपोझर किंवा जिवाणू वृद्धीसाठी फरमेंटेशन करन्याच्या विविध पद्धती. शेतकरी वापरतात. 

मित्रहो , हे जिव आहेत म्हनजे यांना अन्न लागनार .यांचे अन्न आहे ह्यूमस कूजलेले सेंद्रीय पदार्थ ज्याला ओरगॅनिक मॅटर असे म्हनतात . त्यातील ओरगॅनिक कार्बन यांचे अन्न आहें. मग शेतकर्यांनी जमिनित ओरगॅनिक कार्बन वाढविला तर यांची संख्या जमिनितच झपाट्याने वाढेल पण तसे होत नाही कारण आज जमिनीत OC चे प्रमाण ०.५ % च्या आसपास म्हनजे वाळवंट झालेले आहे. 

  मित्रहो केवळ तात्पूरत्या मिळनार्या रिझल्टच्या मागे न धावता शाश्रिय पद्धतीने शेती केल्यास माफक खर्चात खूप चांगले पोषन उपलब्ध करता येवू शकते . त्यामूळे कोणतेही ओरगॅनिक प्रोडक्ट वापरण्यापूर्वी त्यातील घटक व कार्यपद्धतीचा अभ्यास करने ही काळाची गरज आहे. 

 जर OC ह्यूमस वाढला तरच जमिन पून्हा सजिव होऊ शकते. ह्यूमस कमी असलेल्या सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून रहाणे हेही कूपोषनाचे प्रमुख कारण आहे. व कूपोषनच पूढे जावून रोगराई व समस्यांना आमंत्रण देते .

 हे का व कसे घडतेय.

जर जमिनित सेंद्रिय पदार्थच ( ओरगॅनिक मॅटर) नसतील किंवा असूनही त्यात पूरेसा (OC)ओरगॅनिक कार्बन नसेल तर हे जिवाणू कसे जगतील? 

   आपल्याला आपल्या घरात ३/४ दिवस जेवन नाही मिळाले तर आपन घर सोडून निघून जावू अगदी तसे हे मित्र जिव जमिनितून नाहीसे झाले कारण त्यांचे अन्न संपले. 

  गांडूळे यांना अन्न उपलब्ध करते. 

त्यामूळे जिवाणूंवर काम करण्याची गरज पडत नाही. 

आज काल मार्केटींग करनारे लोक सेंद्रीय शेती व जैविक शेती असा वेगवेगळा प्रचार करत आहेत. जे अत्यंत घातक आहे. कारण सेंद्रिय शेतीतच जिवांनूंची झपाट्याने वाढ होते. म्हनजेच जिवाणू नसतिल तर सेंद्रीय पदार्थ कूजनार नाही व सेंद्रीय पदार्थ नसेल तर जिवाणूंना अन्न मिळनार नाही. 

दोन्ही प्रकारची शेती एकमेकांशिवाय अधूरी आहे. त्यामूळे सरळ सरळ एक लक्षात घेणे गरजेचे आहे जमिनिचा कस म्हनजे ह्यूमस वाढविला तर सेंद्रिय शेती व जैविक शेती नैसर्गिकपणे घडून येते. 

संभ्रम निर्माण करून व्यवसाय केले जातात. ज्ञानातून आत्मविश्वास निर्माण होतो. जिवाणूंचा वापर करा पण आपन दही करन्यासाठी विरजन घालतो एवढाच करा . 

विरजनावर ( जिवाणू) जास्त खर्च न करता तो मातीत दूधावर ( सेंद्रीय कर्ब) करा . मग बघा मर्यांदित खर्चात , अमर्यांद परिणाम मिळतात . 

  जर सेंद्रिय निविष्ठांची उपलब्धता न करता केवळ स्लर्या , जिवाणू कल्चरचा वापर दिर्घ काळासाठी करने म्हनजे जमिनितला कार्बन वेगाने खर्च करने म्हनजेच. एका अर्थाने जमिन नापिक करने होय. हे धक्कादायक असले तरी सत्य आहे. फक्त जैविक शेतीची वेगळी चूल मांडलेल्या शेतकर्यांची बागायती शेती धोक्यात आल्याची अनेक उदाहरने पहायला मिळतील ती याचमूळे. 

 

शरद केशवराव बोंडे.

९४०४०७५६२८

English Summary: Confusion about organic and biological. Published on: 03 December 2021, 09:02 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters