डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फॉउंडेशन अंतर्गत दोन दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. २३ ते २४ फेब्रुवारी, २०२२ दरम्यान करण्यात आले होते. सदर राष्ट्रीय परिषदेचा विषय "कृषी-उद्योजकताः कृषी क्षेत्रातील स्टार्ट-अप इकोसिस्टमला चालना देण्याचा मार्ग" हा होता.
या ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एस. एन. झा, उपमहासंचालक, कृषि अभियांत्रिकी, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली हे ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. भाले, मा. कुलगुरू डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला हे होते.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ. वाय. बी. तायडे, संचालक (शिक्षण) तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला, डॉ. आर. एम. गाडे, संचालक ( विस्तार शिक्षण), डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला,
डॉ. एस. बी. वडतकर, अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला, डॉ. एस. एस. हरणे, नोडल ऑफिसर, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला हे या समारोप प्रसंगी सेमिनार हॉल, कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला येथे उपस्थित होते. या राष्ट्रीय ई-परिषदेत चार उप-थीम ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. एस. एन. झा, उपमहासंचालक, कृषि अभियांत्रिकी, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील मनुष्यबळासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच कृषि प्रक्रियेनंतर पॅक्याजिंग तथा ब्रँड मेकिंग यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. कृषि प्रक्रिया केंद्र तसेच अग्री स्टार्ट अप ग्रामीण भागात उभारल्या गेल्यास रोजगार निर्मितीस चालना मिळेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉ. आर. एम. गाडे, संचालक (विस्तार शिक्षण), डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला यांनी आपल्या भाषणात नावीन्यतापूर्ण तंत्रज्ञान व विकसित तंत्रज्ञानामध्ये कालानुरूप आवश्यक बदल महत्वाचे असल्याचे नमूद केले. कृषि मधील संशोधनात आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. भाले, मा. कुलगुरू डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला यांनी आपल्या भाषणात कृषि प्रक्रियेची सद्यस्तिथीत महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले. ग्रामीण रोजगार निर्मितीत अग्री-स्टार्ट-अपची भूमिका मोठी असून कृषि क्षेत्रात उद्योजतेसाठी भरपूर संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषि क्षेत्र मोठे असून यामध्ये कुशल मनुष्यबळ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देशात विविध इन्क्युबेटर स्टार्ट अप ला चालना देण्यासाठी स्थापन केले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती नारनवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश मुरूमकार यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री. महेंद्र राजपूत, श्री. सागर पाटील, डॉ अमरदीप डेरे, रसिका बुरघाटे तसेच सर्व कर्मचारी पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्यूबेशन फॉउंडेशन व राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, डॉ पंदेकृवि, अकोला यांनी विशेष परिश्रम घेतले.
Share your comments