उसाची शेती संपूर्ण भारत वर्षात पाहायला मिळते. या पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रात देखील विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागात ऊस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त असून शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते.
नक्की वाचा:रॉक फॉस्फेट बागेसाठी उत्तम पर्याय; उत्पादनात होणार वाढ
सध्या राज्यात उसाचा गळीत हंगाम प्रगतीपथावर आहे. गाळप हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडून यावर्षी लवकरच गाळप हंगाम सुरू झाला आहे. यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येणार नसल्याचे सांगितले जात आहे.राज्यात गेल्या काही वर्षांपासून सिंचनाच्या पर्याप्त सुविधा उपलब्ध होत असल्याने ऊस या बागायती पिकाची लागवड वाढली आहे.
परिणामी अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. मात्र आता शासन स्तरावर याबाबत गंभीर दखल घेतली गेली आहे. यासाठी राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे विस्तारीकरण झाले आहे.परिणामी यापुढे एक्स्ट्रा उसाचा प्रश्न भेडसावणार नाही असा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ऊस तोडणी साठी मजूर टंचाई प्रकर्षाने जाणवतअसल्याने आता यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऊस तोडणी करण्यासाठी ऊस तोडणी यंत्राचा वापर वाढावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून 320 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.अशा परिस्थितीत उसाची शेती आगामी काळात शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. दरम्यान आतां ऊस उत्पादक बागायतदारांनी उत्पादन वाढवण्यासाठी फोकस केला पाहिजे. यासाठी प्रगत जातींची लागवड केली पाहिजे.अशातच आता भारतातील ऊस उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
उसाची एक नवीन जात नर्मदापुरम येथील पवार खेडा येथील ऊस संशोधन केंद्रात विकसित करण्यात आली आहे. कोगेन 9505 असं या जातीचं नाव आहे. यामध्ये 22% साखर आढळून आली आहे.विशेष म्हणजे ही जात अवघ्या 10 ते 14 महिन्यात काढण्यासाठी तयार होते. तसेच यापासून ११० टन एवढे उत्पादन मिळू शकते. या संशोधन केंद्रात याच बेन उपलब्ध असल्याचे मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
नक्की वाचा:Sukoyaka: ब्रॉड-स्पेक्ट्रम बुरशीनाशक वापरण्याची पद्धत
Share your comments