1. कृषीपीडिया

महाराष्ट्रातील शेतकरी मिरची उत्पादनात बनताय अव्वल; जाणुन घ्या मिरची लागवडीची सविस्तर माहिती

महाराष्ट्र भारतात आपल्या गौरवशाली इतिहासासाठी जाणला जातो. महाराष्ट्र शेतीच्या क्षेत्रात पण काही कमी नाही! मग ते केळीचे उत्पादन असो, कांद्याचे उत्पादन असो, किंवा द्राक्ष उत्पादन असो प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र आपला मोलाचा वाटा राखतो. अलीकडे महाराष्ट्रातील रांगडे नौजवान शेतकरी भाजीपाला लागवडिकडे वळताना दिसत आहेत. भाजीपाला पिकात विशेषता मिरची उत्पादनात महाराष्ट्र आता देशात अव्वल बनू पाहत आहे. आणि मिरचीच्या उत्पादनातुन शेतकरी चांगली तगडी कमाई करत आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी आज आपण मिरची लागवडीची शास्त्रीय माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणुन घेऊया मिरची लागवडिविषयी ए टू झेड माहिती.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
chilli crop

मिरची लागवडीसाठी हवामान कसे असावे बरं?

कृषी शास्रज्ञ आणि मिरची उत्पादक आदर्श शेतकरी सांगतात की, मिरचीचे पीक हे गरम आणि दमट हवामानात चांगले वाढते आणि असे हवामान असले तर उत्पादन हे अधिक घेतले जाऊ शकते. शेतकरी मित्रानो मिरचीचे पिक हे बहुहंगामी आहे असं म्हटले जाऊ शकते कारण असे की, मिरचीचे उत्पादन हे पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये घेता येते. मिरची हे एक नाजूक पिक आहे आणि मुसळधार पावसात मिरचीच्या पिकाची हानी होण्याची दाट शक्यता असते आणि अतिवृष्टी मुळे मिरचीच्या झाडांची पाने आणि फळे (मिरची) सडतात. मिरचीसाठी 40 इंच पेक्षा कमी पाऊस चांगला असल्याचे अनेक विशेषज्ञ सांगतात.

मिरची पिकात सर्वात महत्वाचा धोका म्हणजे तापमानातील फरक ह्यामुळे मिरचीच्या झाडाचे फुलोर झाडांमध्ये मोठी होतात आणि उत्पादन कमी होते.  मिरचीचे बियाणे अंकुरण्यासाठी 18 ते 27 अंश सेल्शिअस असले तर बियाणे अंकुरण्याचा रेट हा चांगला असतो. म्हणजे पेरलेले बियाणे चांगल्या रीतीने उतरते आणि परिणामी उत्पादनात वाढ होते.

 मिरची लागवडीसाठी जमीन कशी असावी बरं?

शेतकरी मित्रांनो कुठल्याही पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असते. मिरचीचे रोपे हे मध्यम जमिनीत देखील चांगले वाढतात, तसेच दंगट/भारी जमिनीतही चांगली वाढतात. जर आपण हलक्या जमिनीत मिरची लागवड करणार असाल तर सेंद्रिय/जैविक खताचा योग्य वापर करून मिरचीचे उत्पादन चांगले घेता येते.  मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पावसाळी हंगामासाठी तसेच बागायती मिरचीसाठी निवडली पाहिजे असा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात मिरचीची लागवड मध्यम ते भारी जमिनीत करता येऊ शकते.

 मिरचीच्या सुधारित जाती नेमक्या कोणत्या बरं?

1) पुसा ज्वाला: ही वाण हिरव्या मिरचीसाठी चांगली आहे आणि या जातीची झाडे लहान असतात आणि ह्या जातीच्या मिरचीच्या झाडाला खुप फ़ांद्या येतात.  मिरची ही 10 ते 12 सेमी लांब वाढते आणि त्यावर आडव्या सुरकुत्या येतात. मिरचीची ही वाण जड आणि अतिशय तिखट असते. आपल्या तिखटपणासाठी ही जात प्रसिद्ध आहे.

  2) पंत सी -1: ही वाण हिरव्या आणि लाल अशा दोन्ही मिरच्यांच्या उत्पादनासाठी चांगली असते. या जातीच्या मिरच्या उलट्या असतात.  मिरचीचा आकर्षक लाल रंग मिरचीच्या परिपक्वतेनंतर येतो. ह्या जातीची मिरची 8 ते 10 सेंमी लांब वाढू शकते. आणि ह्या जातीच्या मिरचीची त्वचा/साल जाड असते. या जातीच्या मिरचीमध्ये बियाचे प्रमाण जास्त असते.

English Summary: chilli cultivation total proccess and management Published on: 04 October 2021, 09:20 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters