1. कृषीपीडिया

मिरची पिक किड रोग व्यवस्थापन

सद्यःस्थितीत मिरचीवर चुरडा मुरडा, पानावरील ठिपके आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे वांगी पिकावर शेंडे, फळ पोखरणारी अळी पांढरीमाशी या किडी तर पानावरील करपा, फळसड, बोकड्या या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मिरची मिरचीवरील चुरडा-मुरडा (लीफ कर्ल) हा विषाणूजन्य रोग आहे या रोगाचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी आणि कोळी या रसशॉोषक किडींमार्फत होतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
मिरची पिक किड रोग व्यवस्थापन  सद्यःस्थितीत मिरचीवर चुरडा मुरडा, पानावरील ठिपके आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे वांगी पिकावर शेंडे, फळ पोखरणारी अळी पांढरीमाशी या किडी तर पानावरील करपा, फळसड, बोकड्या या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

मिरची पिक किड रोग व्यवस्थापन सद्यःस्थितीत मिरचीवर चुरडा मुरडा, पानावरील ठिपके आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे वांगी पिकावर शेंडे, फळ पोखरणारी अळी पांढरीमाशी या किडी तर पानावरील करपा, फळसड, बोकड्या या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

कीड नियंत्रण

 

पांढरी माशी : पिकात एकरी १२ पिवळे चिकट सापळे लावावेत.

फुलकिडे : एकरी १२ निळे चिकट सापळे वापरावेत.

फवारणी प्रतिलिटर पाणी वेळ -प्रादुर्भाव दिसताच फिप्रोनील (५ ई.सी.) १.५ मि.लि.

फेनपायरॉक्झिमेट (५ इ.सी.) १ मि.लि. किंवा

फेनाक्झाक्विन (१० इ.सी.) २ मि.लि.

 

रोग नियंत्रण

पानावरील ठिपके : हा रोग सरकोस्पोरा व अल्टरनेरिया या बुरशींमुळे होतो. दोन्ही बुरशींचा प्रादुर्भाव बियाण्यांमार्फत होतो.

सरकोस्पोरा : या बुरशीमळे पानावर गोलाकार, लहान डाग दिसून येतात. डागांचा मध्यभाग फिकट सफेद, कडा गर्द तपकिरी असतात. या रोगाला फ्रॉग आय लिफ स्पॉट असेही म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पाने पिवळी पडून गळतात. पानगळ झाल्यामुळे फळे उघडी पडून सौरउष्णतेमुळे फळांवर पांढरे चट्टे पडतात.

अल्टरनेरिया सोलॅनी : या बुरशीमुळे तपकिरी रंगाचे आकारहीन डाग पानांवर दिसतात. या डागामध्ये एकात एक अशी गोलाकार वलये असतात. असे लहान डाग एकमेकात मिसळून मोठे चट्टे होतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढून पानाची पूर्ण वाढ होण्याअगोदर करपतात आणि पानगळ होते.

नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी

वेळ :रोगाची लक्षणे दिसताच

मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा

कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅमकिंवा

क्लरोथॅलोनील २.५ ग्रॅम

 

वांगी  पिकावरील शेंडे व फळ पोखरणारी अळी व पांढरीमाशी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पध्दतीचा अवलंब करावा.

 

एकात्मिक कीड नियंत्रण

कीडग्रस्त शेंडे दर आठवड्यातून खुडून टाकून नष्ट करावे तोडणीनंतर कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.

ल्युसील्यूर कामगंध सापळे एकरी ४० याप्रमाणात वापरावेत तसेच त्यातील ल्यूर दोन महिन्यांनी बदलावा.

पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी एकरी १२ पिवळे चिकट सापळे वापरावेत.

अधून-मधून ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडिरॅक्टीन (१५०० पीपीएम) ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. किंवा क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एस.सी.) ०.४ मि.लि.

सूचना :फवारणी नॅपसॅक पंपाने करावी.

रोग नियंत्रण- 

पानावरील करपा व फळसड रोगकारक बुरशी : फोमोप्सिस व्हेक्झान्स

लक्षणे-  पाने व फळावर रोग आढळून येतो रोगामुळे करड्या ते तपकिरी रंगाचे गोलाकार ते लंबाकृती डाग पानांवर व फळांवर दिसून येतात. फळावर खोलगट तपकिरी काळसर, वलयांकित डाग दिसून येतात व फळे सडतात.

नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी, वेळ - रोगाची लक्षणे दिसताच कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि.

 

बोकड्या किंवा पर्णगुच्छ

रोगकारक बुरशी : फायटोप्लाझमा लक्षणे : रोगामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने लहान आकाराची,मऊ, पातळ, पिवळसर गुच्छासारखी झालेली दिसतात. अशा झाडांना फुले लागत नाहीत. रोगाचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होतो.

नियंत्रण

वांगी कुळातील तणांचा नायनाट करावा. लागवड करताना रोपे १००० पीपीएम (१ ग्रॅम/ लिटर पाणी) स्ट्रेप्टोमायसिनच्या द्रावणात बुडवून लावावीत त्याचप्रमाणे पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांपासून दर १५-२० दिवसांच्या अंतराने स्ट्रेप्टोमायसिन (१-१.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी)ची फवारणी करावी. लागवडीनंतर दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने निंबोळी अर्क (५ टक्के) फवारावा.

संकलन - प्रवीण सरवदे, कराड

 

English Summary: Chili Pick Insect Disease Management Published on: 05 October 2021, 08:47 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters