आजघडीला परिस्थिती पाहता विष मुक्त शेतीची गरज चित्र आहे. याचे पहिले कारण आहे आर्थिक आणि दुसरे आहे ते आरोग्याचे.
गांडुळांकडे सर्रास दुर्लक्ष : रासायनिक खतांच्या वापराने शेतातल्या गांडुळांची संख्या कमी होते. गांडूळ हा शेतकर्यांचा मित्र असतो असे परंपरेने सांगितले जाते मात्र त्याकडे मधल्या काळात दुर्लक्ष झाले. परंतु गांडूळ शेतकर्यांचा मित्र असतो. या म्हणण्यात फार मोठा आशय सामावलेला आहे.
आणि पिकांची वाढ चांगली होते : गांडूळ शेतातली माती भुसभुशीत करतो आणि शेत नांगरण्याचे खर्च वाचवतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने जमीन भुसभुशीत केली की पिकांच्या मुळांची मातीत होणारी हालचाल सोपी जाते आणि मुळे सहजतेने जमिनीत खोलवर जाऊन अन्न आणि पाणी शोषून घेतात. मुळे जेव्हा असे अन्नपाण्याचे शोषण करतात तेव्हा पिकांची वाढ चांगली होते. म्हणजे गांडूळामुळे पिक चांगले येते.
रोगजंतूंचाही फडशा : गांडूळांना डोळे नसल्यामुळे ते स्पर्श होईल ते खात राहतात आणि खातात खाता मातीच्या आतील रोगजंतूंचाही फडशा पाडतात. त्यामुळे पिकांवर रोग कमी पडतात आणि महागडी औषधे आणून फवारण्याची गरज लागत नाही. म्हणजे गांडूळामुळे शेतकर्यांचा उत्पादन खर्च वाचतो.
पैसे वाचतात : सेंद्रिय शेतीतला गांडूळ हा महत्त्वाचा घटक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सेंद्रिय खते तयार करताना शेतातल्या काडीकचर्याचा वापर केला जातो. तो काडीकचरा एरवी वाया जात असतो. परंतु त्यांचाच खत म्हणून वापर केल्यास रासायनिक खते विकत आणण्याची गरज भासत नाही आणि शेतकर्यांचे पैसे वाचतात.
गांडूळ फुकटचा कारखानदार : गांडूळाच्या पोटात एक विशिष्ट प्रकारची भट्टी आहे. त्या भट्टीतून त्याने खाल्लेल्या मातीत नत्र मिसळले जाते. म्हणजे गांडूळ हा युरियाचा पुरवठा करणारा फुकटचा कारखानदारसुध्दा असतो. त्यातूनही शेतकर्यांचे पैसे वाचतात.
उत्पादने विषमुक्त : अलीकडच्या काळात रासायनिक खतांचे परिणाम लक्षात यायला लागले आहेत आणि म्हणूनच रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीतल्या मालाला लोकांची मागणी यायला लागली आहे. कारण सेंद्रिय शेतीतली उत्पादने विषमुक्त असतात. हे लोकांच्या लक्षात आले आहे. याही दृष्टीने सेंद्रिय शेती आपल्या हिताची ठरणार आहे.
गांडूळ शेतातली माती भुसभुशीत करतो आणि शेत नांगरण्याचे खर्च वाचवतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने जमीन भुसभुशीत केली की पिकांच्या मुळांची मातीत होणारी हालचाल सोपी जाते आणि मुळे सहजतेने जमिनीत खोलवर जाऊन अन्न आणि पाणी शोषून घेतात. मुळे जेव्हा असे अन्नपाण्याचे शोषण करतात तेव्हा पिकांची वाढ चांगली होते. म्हणजे गांडूळामुळे पिक चांगले येते. गांडूळांना डोळे नसल्यामुळे ते स्पर्श होईल ते खात राहतात आणि खातात खाता मातीच्या आतील रोगजंतूंचाही फडशा पाडतात. त्यामुळे पिकांवर रोग कमी पडतात आणि महागडी औषधे आणून फवारण्याची गरज लागत नाही. म्हणजे गांडूळामुळे शेतकर्यांचा उत्पादन खर्च वाचतो.
Share your comments