1. कृषीपीडिया

चाय पे चर्चा करोडो का खर्चा ,चहा चा वाढता ट्रेंड आजारांना आमंत्रण.

चहा हा पदार्थ ब्रिटीशांची देणं जरी असले त्या चहा ला खरी प्रसिद्धी 2014 नंतरच मिळाली, चहा म्हटलं की देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र जी मोदी यांची आठवण येते चहा विकणारा पंतप्रधान होतो,

KJ Maharashtra
KJ Maharashtra
चाय पे चर्चा करोडो का खर्चा ,चहा चा वाढता ट्रेंड आजारांना आमंत्रण.

चाय पे चर्चा करोडो का खर्चा ,चहा चा वाढता ट्रेंड आजारांना आमंत्रण.

पेपर विकणारा देशाचा राष्ट्रपती, वैज्ञानिक मिसाईल मॅन बनू शकतो, पेट्रोलपंप वर काम करणारा रिलायन्स समूह उभारू शकतो, कष्ट करण्याची धमक ज्यांच्या रक्तात भिनलेली असते त्यांच्यासाठी अशक्य काहीच नसते आणि तेच लोकं आपले लक्ष्य साध्य करतात.

सोन्याचा धूर तुपाची धार तर मी पाहिली नाही परंतू माझे बाबा बारा बलुतेदार पैकी एक कासार बाबा म्हनून जवळच्या चार पाच गावात प्रसिद्ध कारण तीस पस्तीस वर्षा आगोदर बावण बुरजी करवंड येथे एकच कासार बाबा होते जन्मा पासुन लग्ना पर्यंत काही मुलींना विनामूल्य बांगड्या भरायच्या एक प्रकारची दत्तक प्रथा होती व त्या मुलीच्या लग्नाच्या वेळीं गाय, शेळी अशी दुभती जनावर भेट दिल्या जात असे माझ्या बालपणी तीन चार गायी, बकऱ्या असल्याने दुधाची धार दिसली सकाळची न्याहारी दूध भाकरच होती कालांतराने त्या दुधात गुळा ऐवजी साखर व पत्ती ने जागा घेतली प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चहा ची एंट्री वेगवेगळ्या प्रकारे आली असेल परंतू चहा हा फक्त सकाळी घेतात ही प्रथा होती ती प्रथा मोडित आपण चहाच्या आहारी कधी गेलो कळलेच नाही.

चिखली आमचं तालुक्याचं ठिकाण शहरातील जीवन धकाधकीचच खेड्या पाड्यातून कामा निमित्त येणाऱ्या लोकांची नेहमीच वर्दळ आलेला प्रत्येक व्यक्ती शहरातील चहाचा अधीन झालेला, व्यावसायिक, अधिकारी व त्यांच्याकडे कामानिमित्त येणारे नागरिक, मित्र मंडळी, कामगार व त्यांच्याकडे येणारे ग्राहक यांचे व्यावसायिक ऋणानुबंध जुळण्यासाठी चहाचा कप मध्यस्थी करतो, 

चहाची वाढती मागणी पाहता शहरातील कानाकोपऱ्यात , महामार्गावर खेड्या पाड्यात, शासकीय कार्यालयांसमोर वर्दळीच्या ठिकाणी एक वेळ नाश्ता मिळणार नाही परंतु चहाची टपरी मिळेलच, चहाची अचानक वाढलेली मागणी पाहता ग्राहक आकर्षित करण्यासाठी काळानुरूप चहात बदल सुरु झाले व वेगवेगळ्या प्रकारची चहा शहरात मिळू लागली, 

गुळाचा चहा, गवती चहा, जायफळ चहा, काळा चहा, तंदुरी चहा, भात्यावराचा चहा, कुल्हड मधला चहा, असे नाना प्रकारच्या चहा ग्राहकांना आकर्षित करु लागल्या व त्यांची वाढती डिमांड पाहता काही मोठया शहरातली नामांकित चहा विक्रेत्यांनी आपल्या चहाचे ब्रँड विकसित करून फ्रेंचायाजी उघड्या त्या पैकी पुणेरी चहा, अमृततुल्य चहा, एकवीरा चहा, येवले चहा यांनी शहरात धमाल केली, आज घडीला शहरात दिडशे च्या आसपास चहाची दुकाने थाटली आहेत व ग्राहक वेगवेगळ्या चहांचा मनमुराद आनंद घेत आहेत, चहाची लागलेली ओढ ही अप्रत्यक्ष घातकच रोज घेणाऱ्या चहातून हजारो कॅलरीज शरीरातील शुगरचे प्रमाण वाढवत आहे, हे वाढते प्रमाण भविष्यात आजारांना निमंत्रण देणारे असून आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

चहा वर करोडो रुपयांची उलाढाल व शेकडो लोकांचा रोजगार अवलंबून आहे त्यांना विरोध नाही कारण एक चहा विक्रेता आमदार पण होऊ शकतो

हे आपल्या बुलडाणा जिल्ह्याने पाहिले आहे, परंतु चहाचे वाढते प्रमाण धोक्याचेच, 

शरीरासाठी चहाचे वाढते प्रमाण धोक्याचे कसे.??

तर दिवसाला ५ ते १० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडू शकता.चहाचे जास्त सेवन केल्याने चहा मधील टॅनिक ऍसिडमुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो.टॅनिक ऍसिडमुळे उलटी किंवा डोकं दुःखण्याचा त्रास होऊ शकतो.

म्हणुन चहा दिवसातून एकच वेळेस घ्या व आपले शरीर निरोगी ठेवा. 

आपण सर्वांना माहीत आहे चहाचे पाने हिरवी असतात मग चहापत्ती काळी का.?

चहा पत्ती बनवतांना जी रासायनिक प्रक्रिया केली जाते त्यामुळे चहातील टीऑक्सीडेंट तत्व निघून न्युट्रिशनव्हॅल्यू झिरो होतात

आपण चहा प्यायचा आहे म्हणून पितो शरीराला त्याचा काहीच फायदा नाही, एक सवय म्हनून चहा पिणे फायद्याचे नाही चहा मुळे रक्त ॲसिडीक होऊन पचन क्रियेवर परिणाम होतो.

चहा ही दिवसातून एक वेळ ठीक आहे. 

 

पत्रकार

मुख्तार शेख

7057911311

English Summary: Chay pe charcha tea trend invitation To disease Published on: 18 December 2021, 08:19 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters