वातावरण ह्या वर्षी असं आहे की बहुतांश उसाला तुरा आला आहे. मेहनतीने पिकवलेल्या ऊस आता तुरा येऊन खराब होतोय दुष्काळात तेरावा म्हणावा तसा टोळीवाले उसाची तोड करण्यासाठी २ ते ३ हजार रुपयाची मागणी करत आहेत सध्याची परिस्थिती बिकट आहे पण भविष्य उज्वल असेल हे नक्कीच
ऊस हे गवत असल्यामुळे त्याची तोडणी झाली की त्याचा खोडवा घेता येतो उसाचा खोडवा आपण घेतो कारण लागणीपेक्षा खोडव्याचा उत्पादन खर्च हा ३०-४०% कमी असतो ज्यावेळी आंतरमशागत, मजुरी, खते, किटकनियंत्रणाचे भाव गगनाला भिडलेले असताना खोडवा ठेवणे बंधनकारक आहे पण खोडव्याचे उत्पादन हे लागणीच्या तुलनेने खूप कमी येतो, लागण समजा ५५ टन झाली तर खोडवा ३५-४० टन भरतो. त्यामागे असंख्य कारण आहेत त्यातील प्रमुख कारण आहे तुटाळ.
मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एका शेतावर भेट देण्याचा योग आला त्यांचा ऊस हा जानेवारी महिन्यात तुटला होता. ऊस तुटल्यावर एक महिन्याने क्षेत्र पाहिले. तर तिथं १० बेटामागे १-२ बेटं खराब झाली होती. त्यातून नवीन फूट निघेल अशी शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्याला आम्ही लवकरात लवकर तुटाळ भरून घेण्यास सांगितले अंदाजे ८०० रोप लागतील असा अंदाज होता ८०० रोपांचा १६०० रुपयांपर्यंत खर्च येणार होता. शेतकरी हा वाढीव खर्च करण्यास तयार नव्हते. पण आम्ही थोडं समजावुन सांगितले आणि शेतकरी तयार झाले. रोपं आली त्यांची लागण झाली रोपं चांगली बसली बघता बघता ती मूळ बेटांशी स्पर्धा करू लागली. आता ऊस तुटायला आला आहे, तुटाळ भरलेली रोपं आता मुख्य उसाच्या बरोबरीची आहेत.
त्याचे आर्थिक गणित आपण करूया
८०० रोपं लावण्यात आली बेटामागे प्रत्येकी १० फुटवे आपण गृहीत धरू ८००० ऊस आपल्याला मिळतील त्या ८००० उसाचे कमीत कमी १ किलो वजन जर गृहीत धरले तर ८००० किलो म्हणजे ८ टन इतका वाढीव ऊस आपल्याला त्या क्षेत्रातून मिळाला ८ टन × रुपये ३०००/- (उसाचा दर) = २४०००/- रुपये एवढे उत्पन्न आपले नुसतं तुटाळ भरून काढल्यामुळे मिळाले. त्यासाठी आपल्याला फक्त १६००/- रुपये गुंतवावे लागणार होते सध्या त्या शेतकऱ्यांला तेवढ्याच क्षेत्रातून ८ टन वाढीव ऊस मिळणार शेतकऱ्यांचा अंदाज कधी कधी चुकतो आपण ऊस फुटायची थोडं जास्तच वाट बघतो. १५-२० दिवसात आपल्याला खराब बेटं ओळखून तिथे नवीन रोपं लावणे गरजेचे आहे
कधी कधी उशीर होतो त्यावेळी जलद वाढणाऱ्या जाती जसे की १०००१ ची रोप लागण करावी. जेणेकरुन रोपं ही मुख्य पिकाचा बरोबरीने वाढतील.
सध्यस्थितीला उसाचे उत्पादन वाढवणे खुप गरजेचे आहे असे छोटे बदल जरी आपण करू शकलो तर खुप मोठा बदल घडू शकतो थेंबेथेंबे तळे साचे प्रमाणे असे छोटे बदल आपल्याला उनत्तीकडे घेऊन जातील.
संकलन : प्रविण सरवदे, कराड
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments