करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी अधिक स्टिकर १० मि.लि. या प्रमाणात १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
सुक्ष्म अन्नद्रव्य ३ लिटर प्रती २०० लीटर पाणी प्रती एकर किंवा विपूल किंवा मल्टीप्लेक्स १० मिली प्रती १० लीटर पाणी किंवा झिंक फेरस ०.५ टक्के + बोरँक्स ०.२ टक्के ची १५ दिवसाच्या अंतराने २ फवारण्या कराव्या.
फुलकिडे आणि इतर किडींच्या नियंत्रणासाठी मेथील डीमेटॉन १० मिली किंवा मँलेथिऑन १० मीली कींवा रोगर २० मिली किंवा नुवान १२ मिली यापैकी एक कीटकनाशक निवडून प्रती १० लीटर पाणी याप्रमाणे आलटून पालटून १ ते २ फवारण्या कराव्यात.
पिकावर किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीमध्ये निंबोळीअर्क ५ टक्के किंवा करंज बियांच्याअर्क ५ टक्के प्रमाणे प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
जर झाडे मुळकुज खोडकूज, सालकूज इ. रोगामुळे पिवळी पडत असतील तर अशा झाडांना बोर्डोमिश्रण ०.५ टक्के जमिनीतून रींग पध्दतीने प्रती झाड अर्धा ते १ लिटर द्रावण ओतावे.
मॅग्नेशियम कमतरतेसाठी मॅग्नेशियम सल्फेट १० ते १५ किलो प्रती एकर व बेनसल्फ १० किलो प्रती एकर द्यावे.
(प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते.
शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत: च्या जबाबदारीवर करावा)
संकलन - प्रवीण सरवदे कराड
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments