1. कृषीपीडिया

Castor Cultivation: एरंड लागवडीच्या माध्यमातून होऊ शकतात मालामाल, जाणून घेऊ लागवड तंत्र

बरेच शेतकरी अजूनही परंपरागत पिकांची लागवड करतात. त्या माध्यमातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत नाही.शेतीसाठी खर्च केलेला पैसा हे मुश्किल होते. त्यासाठी उत्पन्नामध्ये होणारी घट, वाढत्या रोगांचे आणि किडींचे प्रमाण, योग्य बाजारपेठ व इतर मुद्दे मारक ठरतात.त्यासाठी शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या शोधात आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
castor crop

castor crop

बरेच शेतकरी अजूनही परंपरागत पिकांची लागवड करतात. त्या माध्यमातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत नाही.शेतीसाठी खर्च केलेला पैसा हे मुश्किल होते. त्यासाठी उत्पन्नामध्ये होणारी घट, वाढत्या रोगांचे आणि किडींचे प्रमाण, योग्य बाजारपेठ व इतर मुद्दे  मारक ठरतात.त्यासाठी शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या शोधात आहेत.

त्यामधूनच एक पुढे येत आहे ते म्हणजे एरंड. तसे बघितले तर एरंडाचा पीक म्हणून शेतकऱ्यांनी कधी विचार केलेला नाही.केरला नेहमी शेताच्या बांधावर जागा मिळाली आहे. यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे त्याला मिळणाऱ्या दराकडे दुर्लक्ष करण्यात आला आहे. आपल्याकडे असणाऱ्या आठवडी बाजारात दहा किंवा पंधरा रुपये किलो चा जर  दर मिळाला तरी शेतकरी त्यालाविकून घ्यायचा. परंतु आता शेतकऱ्यांनी एरंडाची मुख्य पीक लागवड केली तर त्याला बाजारात खूप चांगली मागणी आहे. कारण एरंडा पासून वंगण निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यासाठी त्याला क्विंटलला 3000 ते 3500 रुपये इतका बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे नवीन काहीतरी करू इच्छिणार्‍या शेतकऱ्यांसाठी एरंड एक वरदान ठरू शकते. या लेखात आपण एरंड पिकाच्या लागवड तंत्रज्ञान विषयी जाणून घेऊ.

एरंडाचे लागवड तंत्रज्ञान

  • पूर्वमशागत-एरंड पिकासाठी नांगरट खोलवर करावी. कारण याच्या मुळे खोलवर जात असतात.नांगरणी झाल्यावर कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी.
  • जमिन आणि हवामान- हे पीक हलक्‍या मध्यम जमिनीमध्ये उत्तम पद्धतीने येते. त्यासाठी कोरडे आणि उष्ण हवामान चांगले मानवते. त्याच बरोबर अवर्षणप्रवण भागामध्ये सुद्धा 40 ते 50 सेंटिमीटर पावसात येऊ शकते.
  • पेरणी/ लागवड- या पिकाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात करता येते. जून महिन्यामध्ये पुरेसा पाऊस झाल्यावर जमीन वाफशावर आल्यावर लागण करावी. त्याचबरोबर एरंड या पिकाची लागवड आकस्मिक काळातील पीक म्हणून देखील करता येते. तीन ते पाच किलो प्रती एकर बियाण्याची गरज भासते. बियाण्याला ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रति किलो ने बीजप्रक्रिया करून घ्यावी. दोन पिकांमधील अंतर 90 सेंटिमीटर व दोन ओळींमधील अंतर दीडशे सेंटिमीटर ठेवावे.
  • खतपुरवठा- या पिकासाठी जमीन कसदार असेल तर अन्नद्रव्याची गरज भासत नाही. परंतु फुलगळ टाळण्यासाठी तसेच दाणा भरण्यासाठी अन्नद्रव्यांची गरज भासते. त्यासाठी 40:40:20किलोग्रॅम अनुक्रमे नत्र,स्फुरदआणि पालाशप्रति एकर प्रमाणे द्यावी.अर्धे नत्र,संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे व उरलेले नत्र 40 ते 45 दिवसांनी द्यावे.
  • पाणी व्यवस्थापन- या पिकासाठी पाणी देण्याची गरज भासत नाही. कारण मुळातच या पिकाला पाणी कमी लागते. पण कधी पाऊस पडण्याचा कालावधी जर का वाढला तर पाणी देणे आवश्यक आहे. पाण्याच्या ताणामुळे फुलगळ जास्त होते तसेच जाणा सुद्धा भरत नाही. अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी एक किंवा दोन वेळा पाणी चांगला उत्पन्नासाठी द्यायला हवे.
  • काढणी-हे पीक  काढणीसाठी साधारणतः लागवडीनंतर पाच ते सहा महिन्यांमध्ये तयार होते. घडा मधील दोन ते तीन दाणे वाळले  कि काढणीला सुरुवात करावी.घडाची काढणी दोन ते तीन वेळा  करावे लागते. एरंडाचे मळणी पारंपारिक पद्धतीने बडवून केली जाते. आज बाजारामध्ये एरंड मळणी यंत्र उपलब्ध आहेत.
  • उत्पन्न- 10 ते 20 क्विंटल( जिरायती पीक ) वीस ते तीस क्विंटल ( बागायती पिक )
  • कीड, रोग व त्यांचा बंदोबस्त- एरंडा वर उंट आळीचा प्रादुर्भाव सुरवातीपासून दिसतो. त्यासाठी उंटअळ्या हाताने वेचून घ्यावेत व रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. पिकाच्या सुरुवातीस एक ते दोन महिने उंट आळी पासून संरक्षण करावे. निमार्क पाच मिली प्रति लिटर किंवा मेटारायझियम बुरशी पाच ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी. शेंडे व बोंडे पकडणाऱ्या आळीसाठी वरील औषधांचा वापर करावा.
English Summary: can earn more product and more income through cultivation of caster crop Published on: 11 December 2021, 10:29 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters