1. कृषीपीडिया

Business Idea: शेतकरीपुत्रांनो नोकरींत मन रमत नाही ना…! मग पावसाळ्यात 'या' पिकाची 200 रोपं लावा, काही दिवसातचं 6 लाख कमवा

Business Idea: मित्रांनो सध्या मान्सूनचा सीजन (Monsoon Season) सुरू आहे. सर्वत्र आल्हाददायक वातावरण आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांची (Farmer) शेतीमधली (Farming) लगबग देखील वाढली आहे. मित्रानो खरं पाहता मान्सूनच्या सीझनची शेतकरी राजा अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत असतो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
clove cultivation information

clove cultivation information

Business Idea: मित्रांनो सध्या मान्सूनचा सीजन (Monsoon Season) सुरू आहे. सर्वत्र आल्हाददायक वातावरण आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांची (Farmer) शेतीमधली (Farming) लगबग देखील वाढली आहे. मित्रानो खरं पाहता मान्सूनच्या सीझनची शेतकरी राजा अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत असतो.

कारण की, हा सीजन अनेक पिकांच्या पेरणीसाठी देखील योग्य मानला जातो. जाणकार लोक मसाल्यांच्या लागवडीसाठी देखील हा सीजन उत्तम असल्याचे सांगत असतात. मित्रांनो लवंग (Clove Crop) हे मसाल्यांचे असेच एक पीक आहे, ज्याची लागवड (Clove Cultivation) मान्सूनच्या सीजनमध्ये केल्यास अधिक फायदा होत असल्याचे सांगितले जाते.

देशातील अनेक राज्यांमध्ये याची या सीजनमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जाते. विविध प्रकारची औषधे तयार करण्यासाठी तसेच सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. यामुळे या पिकाची बाजारात बारामही मागणी असते आणि त्याला चांगला बाजार भाव देखील मिळत असतो.

लवंग कुठे वापरली जाते?

देशात लवंगचे धार्मिक महत्त्वही खूप जास्त आहे.  पुजा-हवनातही लवंग वापरतात. याशिवाय सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्यांमध्ये याचे सेवन फायदेशीर ठरते. आम्ही तुम्हाला सांगतो की, बाजारात लवंगाच्या तेलापासून ते टूथ पेस्ट, दातदुखीचे औषध, पोट आणि तोंडाच्या आजाराच्या औषधापर्यंत अनेक उत्पादने आहेत.

लवंग लागवडीसाठी कोणत्या प्रकारचे हवामान योग्य आहे बरं 

या पिकाची लागवड फक्त उष्ण प्रदेशातच अधिक योग्य आहे.  लवंग वनस्पतींच्या वाढीसाठी, तापमान 10 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त असावे. त्याच वेळी, त्याच्या झाडाच्या वाढीसाठी 30 ते 35 अंश तापमान आवश्यक आहे. थंड ठिकाणी लागवड करणे टाळावे अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

लवंग पेरणी कशी होते

लवंग पेरणीसाठी, पिकलेली फळे प्रथम त्याच्या मातृ रोपातून गोळा केली जातात. पेरणी करायच्या आदल्या दिवशी एक दिवस आधी पाण्यात भिजत ठेवली जातात. यानंतर वरील साल काढून पेरणीची प्रक्रिया सुरू केली जाते. 10 सेमी अंतरावर ओळीत पेरणी करावी लागते.

झाडांच्या वाढीसाठी सेंद्रिय खत वापरत राहावे लागते. साधारण चार-पाच वर्षात ही वनस्पती तयार होऊन फळे देऊ लागते. जर त्याच्या झाडाची चांगली काळजी घेतली तर ते आपल्याला दीर्घकाळ नफा देऊ शकते.

उत्पन्न किती मिळते

त्याची फळे झाडावर गुच्छांमध्ये आढळतात. त्यांचा रंग लालसर गुलाबी असतो. जी फुले येण्याआधीच तोडली जातात. एकदा रोप परिपक्व झाल्यावर ते 2 ते 3 किलो बंपर उत्पादन देते. बाजारात एक किलो लवंग 800 ते 1000 रुपये किलो दराने विकली जाते.

अशा परिस्थितीत तुम्ही एका एकरात 100 रोपे लावली तरी तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंतचा नफा सहज मिळू शकतो. अशा पद्धतीने या पिकाची दोनशे रोपे लावल्यास सहा लाखांचा नफा शेतकऱ्यांना होणार आहे.

English Summary: business idea clove farming information Published on: 07 August 2022, 06:55 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters