परंपरागत पिके घेणे शेतकऱ्यांनी आता सोडून दिले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची पिके घेण्यात शेतकरी सध्या उत्साहित आहेत. कमीत कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळावे अशा पिकांची निवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी सध्या बऱ्याच प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करीत आहेत. या औषधी वनस्पतीच्यालागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे एक चांगला स्त्रोत मिळाला आहे.
या लेखामध्ये आपण अशाच एका औषधी वनस्पतीची माहिती घेणार आहोत त्याचे नाव आहे ब्राम्ही. या औषधी वनस्पतीची शेती केल्यास शेतकऱ्यांना तीन पट नफा मिळू शकतो. थांबा मी एक औषधी वनस्पती असून ती जमिनीत फैलाव करून वाढते. आयुर्वेदातातहिवनस्पती अतिशय महत्वाचे असे मानले जाते. दोन ते तीन फूट उंच वाढते आणि त्याची मुळे ढेकळामधून पसरतात.भारताव्यतिरिक्त उत्तर व दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या देशांमध्येही लागवड केली जाते.या लेखात ब्राम्ही विषयी माहिती घेऊ.
ब्राम्ही या औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी?
या औषधी वनस्पतीची लागवड करण्यासाठी शेताची चांगली नांगरट करून काही दिवस ते तसेच पडू द्यावे. त्यानंतर त्या शेतामध्ये सेंद्रिय खत मिसळले जाते. रोपांच्या लागवडी नुसार शेतात सरी व बांध तयार केले जातात. याच्या वनस्पतींना रोपट्यांची या स्वरूपात लावणे फायदेशीर असते. आधी तयार केलेल्या कॅरी मध्ये याच्या बिया पेरल्या जातात. त्यानंतर याची वनस्पती तयार झाल्यानंतर याची कटिंग पोट्रेमध्ये लावून रोपे बनवली जातात. त्यानंतर ते शेतात लावली जातात. त्याच्या झाडाच्या काठावर अर्धा फूट अंतरावर लागवड केली जाते. तयार केलेल्या प्रत्येक बांदा दरम्यान अंतर सुमारे 25 ते 30 सेंटिमीटर असावी. ब्राम्ही ची लागवड पावसाळी हंगामात करावी.
या औषधी वनस्पती चांगल्या उत्पादनासाठी पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळेत खुरपणी करावी जेणेकरून वनस्पतीच्या वाढीवर परिणाम होणार नाही. लागवडीनंतर चार महिन्यांनी ब्राह्मी ची काढणी केली जाते.
ब्राह्मी औषधी वनस्पतीची कापणी
या वनस्पतीची कापणी खोडापासून चार ते पाच सेंटीमीटर वर करतात. उर्वरित भागात पुन्हा वाढ होते. कापणीनंतर त्याची व्यवस्थित पॅकिंग करून बाजारात नेता येते. एका हेक्टरमध्ये कमीतकमी ब्राम्ही ची 25 ते 30 क्विंटल सुकी पाने मिळतात.याचे पिक तीन ते चार वेळा घेता येते. तुम्ही केलेल्या गुंतवणुकी पेक्षा कमीत कमी तीन ते चार पट अधिक पैसे मिळतात. जास्त उत्पन्नासाठी आपण ती थेट बाजारातनविकता तिचे पानेभुकटीच्या रूपात विकू शकतात. तो चांगला नफा मिळवू शकतात.
ब्राम्ही चे आरोग्यदायी फायदे
याची पाने बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. तसेचब्राम्ही रस संधीवातावर यशस्वी उपचार आहे. या वनस्पतीत रक्त शुद्धतेचे गुणधर्म आहेत.ब्राम्हीवनस्पतीमुळे बुद्धीला चालना देते आणि स्मरणशक्ती वाढवण्यास देखील मदत करते.यापासून बनवलेली औषधे कर्करोग, अशक्तपणा, दमा, मिरगी आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर उपचार मध्ये वापरली जाते.सर्पदंशावर देखील याचा उपयोग होतो.
Share your comments