1. कृषीपीडिया

गव्हावरील काळा तांबेरा आहेखूपच नुकसानदायक, अशा पद्धतीने करा नियंत्रण

आपल्या राज्यामध्ये दोन प्रकारच्या तांबेरा रोगाचा गव्हावर प्रादुर्भाव होतो. सुरुवातीच्या काळात नारंगी तांबेरा व नंतरच्या काळात म्हणजे तापमान वाढल्यानंतर साधारण फेब्रुवारी महिना संपत असताना काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
black taanbera

black taanbera

आपल्या राज्यामध्ये दोन प्रकारच्या तांबेरा रोगाचा गव्हावर प्रादुर्भाव होतो. सुरुवातीच्या काळात नारंगी तांबेरा व नंतरच्या काळात म्हणजे तापमान वाढल्यानंतर साधारण फेब्रुवारी महिना संपत असताना काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो.

गहू पिकामध्ये तांबेरा प्रादुर्भाव झाल्यास दुर्लक्ष केल्यास पिकाचे 80 ते 100 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादनात घट येते.मध्येच येणारे  ढगाळ हवामान,वातावरणातील आद्रता यामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या लेखात आपण काळा तांबेरा रोगाविषयी माहिती घेऊ.

 गव्हावरील काळा किंवा खोडावरील तांबेरा

या रोगाचा प्रसार प्रामुख्याने हवेद्वारे वाहून आणलेल्या बीजाणू मुळे  होतो.

 प्रसारास कारणीभूत अनुकूल वातावरण

 पानावर किमान सहा ते आठ तास ओलावा किंवा दव साचलेले असल्यास व तापमान 15 ते 24 अंश सेल्सियस असल्यास रोगाची लागण होते. मात्र तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यावर रोगाचा प्रादुर्भाव खूपच झपाट्याने वाढतो

काळा तांबेरा च्या वाढीसाठी नारंगी तांबेरा पेक्षा साधारणतः साडे पाच अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. हा बुरशीजन्य रोग आपल्या देशात मध्य, पूर्व व दक्षिण भागात विशेषतः हिवाळ्यातील तापमान उत्तर भागाच्या तुलनेत जास्त असलेल्या ठिकाणी आढळून येतो.

 या रोगाची लक्षणे

 या रोगाचा प्रादुर्भाव पानाच्या खालच्या व वरच्या बाजूवर होतो. मात्र अनुकूल हवामानात रोगाचा प्रादुर्भाव खोडावर, देठावर, ओंबीवर तसेच कुसळावर देखील आढळून येतो. पानावर रोगाचा प्रादुर्भाव होताच अंडाकृती ते लंबवर्तुळाकार आकाराचे हरितद्रव्य नष्ट झालेले लहान ठिपके दिसून येतात. कालांतराने त्या ठिकाणी विटकरी रंगाच्या बुरशी बीजाणू ची पावडर दिसून येते. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काळा तांबेरा चा प्रादुर्भाव ओंबी व कुसळावरही दिसू लागतो. अनुकूल हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गव्हाच्या दाण्यांना सुरकुत्या पडून त्याच्या झिऱ्या होतात. 100 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

 या रोगाचे व्यवस्थापन

  • तांबेरा रोगास प्रतिकारक्षम गहू वाणांची पेरणी करावी. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून प्रसारित वाण:फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, गोदावरी, पंचवटी या वानांचा उपयोग करावा.
  • शिफारसी इतकेच पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गावाला जास्त पाणी दिल्यास पिकात सतत ओलावा टिकून राहतो वआदर्तेमुळे रोगाचे प्रमाण वाढते. विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. युरिया खताचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
  • तांबेरा रोगास बळी पडणाऱ्या वानावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. याचा प्रादुर्भाव दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी मॅन्कोझेब तीन ग्रॅम
  • आवश्यकता भासल्यास पुढील फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने करावी.
English Summary: black tanbera in wheat crop is very dengerous do management properly Published on: 24 November 2021, 10:01 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters