गहू हे रबी हंगामातील सगळ्यात महत्त्वाचे पीक आहे.या पिकावर तांबेरा हा सर्वात महत्त्वाचा रोग आहे. या रोगाकडे जर दुर्लक्ष केले तर उत्पादनामध्ये 80 ते 100 टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता असते.ढगाळ हवामान, वातावरणात भरपूर आर्द्रता अशा प्रकारचे पोषक हवामानात संवेदनशील गहू जातीवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो गहू पिकाचे दाणे भरण्याच्या वेळेस जर हा रोग आला तर दाण्यांवर सुरकुत्या पडून त्यांच्यातझिऱ्याहोतात. या लेखात आपण गव्हावरील काळा किंवा खोडावरील तांबेरा या रोगाची माहिती घेणार आहोत.
गव्हावरील काळा किंवा खोडावरील तांबेरा
- काळा तांबेरा हा पक्षीनिया ग्रामिनीस ट्रीटीसाय या बुरशीमुळे होतो.त्याचे प्रमाण भारतातील मध्य,पूर्व व दक्षिण भाग यामध्ये विशेषतः जेथे हिवाळ्यातील तापमान उत्तर भागाच्या तुलनेत जास्त असते अशा ठिकाणी आढळून येतो.
- या रोगाचा प्रादुर्भाव हवेद्वारे पाहून आलेल्या बीजाणूमुळे पानाच्या वरखाली दोन्ही बाजूवरहोतो. मात्र अनुकूल हवामानात रोगाचा प्रादुर्भाव खोडावर, देठावर, गव्हाच्या ओंबीवर तसेच कुसळावर देखील आढळून येतो.
- पानावर किमान सहा ते आठ तास ओलावा किंवा दव साचलेले असणे व तापमान 15 ते 24 अंश सेल्सियस असल्यास रोगाचा प्रादुर्भाव होतो. मात्र तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यावर रोगाचा प्रादुर्भाव खूप झपाट्याने वाढतो.
- काळा तांबेरा रोगाच्या वाढीसाठी नारंगी तांबेरा रोगापेक्षा साधारणतः 5.5 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची गरज असते. पानावर रोगाचा प्रादुर्भाव होताच हरितद्रव्य नष्ट झाल्यामुळे अंडाकृती ते लंबवर्तुळाकार लहान ठिपके दिसून येतात.कालांतराने त्या ठिकाणी बुरशीच्या विटकरी रंगाच्या बीजाणू ची पावडर दिसून येते.
- या भुकटी मध्ये बुरशीची असंख्य जिवाणू असतात. अनुकूल हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
तांबेरा रोगाचे व्यवस्थापन
- महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित तांबेरा रोगास प्रतिकारक्षम गहू वाणाची पेरणी करावी.उदा. फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, गोदावरी, पंचवटी इत्यादी
- विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे खते व पाणी पाळ्या द्याव्यात. गहू पिकाला जास्त पाणी दिल्यास पिकात सतत ओलावा टिकून राहतो. आद्रते मुळे रोगाचे प्रमाण वाढते. युरिया खताचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
- गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच फवारणी प्रति लिटर पाणी मॅन्कोझेब (75 टक्के) तीन ग्रॅम किंवा झायनेब ( 75 टक्के) तीन ग्रॅम ची फवारणी करावी. एकरी 500 लिटर पाणी वापरावे.
Share your comments