1. कृषीपीडिया

वेलवर्गीय उन्हाळी भाजीपाला लागवड करायची आहे का? तर कराया उपाय योजना, होईल बक्कळ कमाई

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये प्रमुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा इत्यादी प्रमुख भाजीपाला पिकांचा समावेश होतो. या सर्व भाजीपाला पिकांची लागवड बियांद्वारे रुंद तर ठेव केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे फार गरजेचे असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
Cucumber crop

Cucumber crop

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये प्रमुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा इत्यादी प्रमुख  भाजीपाला पिकांचा समावेश होतो. या सर्व भाजीपाला पिकांची लागवड बियांद्वारे रुंद तर ठेव केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे फार गरजेचे असते.

 वेलवर्गीय भाजीपाला पिकापासून चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळवायचे असेल तर वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीचा  आधार देता येतो. वेलींना  जर चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते.

 आधारासाठी मंडप व ताटी पद्धत

 वेलवर्गीय भाज्या मंडप ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून चार ते सहा फूट उंचीवर वाढतात. फळे लोंबकळती राहत असल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, किटकनाशकांची फवारणी वगैरे कामे सुलभ होतात.

मंडप उभारणी

1- मंडप उभारणी करताना डबाचा वापर करतात. डबा कुजणार नाही यासाठी डबा यांचा जो भाग जमिनीत गाडला जाईल त्यावर डांबर लावावे.

2- मंडप पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर 10 ते 12 फूट आणि दोन वेलीतील अंतर तीन फूट ठेवावे.

3- 20 ते 25 फूट अंतरावर पाट बांधणी सुतळीने करावी. सुतळीचे एक टोक वेलाच्या खोडाजवळ काठीच्या आधाराने बांधावे तर दुसरे टोक तारेस बांधावे.

4- वेलांची वाढ पाच फूट होईपर्यंत वेलाची बगलफूट व तानवे काढावे. मुख्य वेल मंडपावर पोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा.

 हवामान व जमीन

 भोपळा, कारली आणि काकडी या सर्व वेलवर्गीय पिकांना उष्ण आणि कोरडे हवामान पोषक असते. या वेलवर्गीय पिकांना मध्यम ते भारी, योग्य पाण्याचा निचरा होणारी जमिनीची निवड करावी.

 पाणी व्यवस्थापन

1- पिकांची उगवण वेळेस जमीन वळवावी तसेच उगवल्यावर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणे आवश्यक आहे.

 या भाजीपाला पिकांच्या काही सुधारित जाती

1- कारले- लागवड कालावधी- एप्रिल ते जून

 को लॉग व्हाईट, फुले ग्रीन गोल्ड

 

लॉग व्हाईट, फुले ग्रीन गोल्ड

2- दुधी भोपळा- लागवड कालावधी- मार्च

 सुधारित जाती - सम्राट, नवीन पुसा समर, प्रोलिफिक लॉग

3- काकडी - लागवड कालावधी- जानेवारी

 सुधारित जाती- पुणेरी खिरा, हेमांगी, फुले, शुभांगी पोन सेंट

4- दोडका- लागवड कालावधी- कारला पेक्षा दहा ते पंधरा दिवस उशिरा

 सुधारित जाती - कोकण हरित, फुले सुचिता 

English Summary: Bittergourd crop, cucumber crop is most useful method for more production Published on: 19 December 2021, 05:58 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters