जैविक कीड नियंत्रणासाठी जगभरात उपयोगात येणारा प्रमुख मित्र कीटक म्हणजे अंडीचे परजीविकरण करणारा ट्रायकोग्रामा मित्र कीटक. ट्रायकोग्रामा कीटक हा हायमेनोप्टेरा गण व ट्रायकोग्रामा टीडी कुटुंबात मोडणारा परोपजीवी मित्रकीटक असून ट्रायकोग्रामाच्या ८0 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.
ट्रायकोग्रामा मित्रकीटक निसर्गतःच सर्वच प्रकारच्या वातावरणात तसेच संपूर्ण जगभरात आढळत असून पतंगवर्गीय, भुंगेरावर्गीय, माशीवर्गीय, ढेकूणवर्गीय कीटकांच्या अंडीवर परजीविकरण करणारा परोपजीवी कीटक असून ट्रायकोग्रामाचे जैविक कीड व्यवस्थापनात प्रभावी मित्रकीटक आहे. ट्रायकोग्रामा कीटक आकाराने अतिशय लहान (०.२ ते १.५ मि.मी.) असून प्रौढ ट्रायकोग्रामा मित्रकीटक अंडी अवस्थेतच किडीचे नियंत्रण करतात.
पतंगवर्गीय कीटकांच्या अंडी शोधून त्यात अंडनिक्षेपक अंड्यांमध्ये घुसवून आपले अंडे टाकते. त्यानंतर अंडेनिक्षेपक घातलेल्या छिद्रातून आंतरिक दाबामुळे एक छोटा बलक बाहेर येतो व त्या बलकावर मादी माशी खाते.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळाचे कामकाज गतिमान करणे गरजेचे
त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढते. एक ट्रायकोग्रामा मादी दररोज १ ते १० अंड्यांचे परजीविकरण तर संपूर्ण आयुष्यमानामध्ये १० ते १९० अंड्यांचे परजीविकरण करते. ट्रायकोग्रामाची मादी माशी यजमानरूप प्रति यजमान १ ते २० अंडी घालून त्यावर परजीविकरण करते.
एक मादी तिच्या संपूर्ण आयुष्यक्रमात २० ते २०० अंडी घालते व ट्रायकोग्रामाची अंडी घालण्याची क्षमता ही तिची प्रजाती, यजमान कीटक व तिचे आयुष्यमान यावर निर्धारित असते. ट्रायकोग्रामा कीटक नैसर्गिक परिस्थितीमध्ये परजीविकरण झालेल्या अंडी ओळखून त्यात परत परजीविकरण करत नाही.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळाचे कामकाज गतिमान करणे गरजेचे
ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटकाचा जीवनक्रम अंडी (१ दिवस), अळी (३-४ दिवस), कोष (४ ते ५ दिवस) व प्रौढ (६ ते ८ दिवस) अशा चार अवस्थांचा असतो. ट्रायकोग्रामाचे पूर्ण आयुष्य १५ ते २० दिवसांचे असते. प्रौढ ट्रायकोग्रामाचे आयुष्यमान कमी असून त्यांचे लिंग गुणोत्तर प्रमाण १:१ असतो. सर्वसाधारणपणे कोषामधून प्रौढ माशी बाहेर पडल्यानंतर लगेच नर व मादीचे मीलन होते व त्यानंतर लगेच मादी ट्रायकोग्रामा अंडी घालण्यासाठी सज्ज होतात.
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा, मार्च एंड’मुळे बँका, सोसायट्या शेतकऱ्यांच्या मागे..
Share your comments