1. कृषीपीडिया

जैविक खतांचा वापर का व कसा करावा?

चांगले उत्पादन आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जातो परंतु याचा जमिनीतील जीवांवर नकारात्मक प्रभाव पडतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
जैविक खतांचा वापर का व कसा करावा?

जैविक खतांचा वापर का व कसा करावा?

जड यंत्रसामग्रीसह काम केल्याने जमिनीत कॉम्पॅक्टिंग देखील होते. केमिकल फर्टीलायझर च्या नियमित वापराने जमिनीतील हवा आणि पाणी यांचा समतोल बिघडतो आणि जमिनीचा पीएच वाढतो.अशा जमिनीत वनस्पतींच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. नियमित रासायनिक खतांच्या वापराने जमिनीतील पाण्यावर विपरीत परिणाम होऊन पाणी ते दूषित होते.

            शेतीमधील प्रभावी सूक्ष्मजीव मातीचे टिकाऊ पुनरुत्पादन करण्यास मदत करतात, यामुळे सुपीकता वाढते आणि जमिनीतील जीव सक्रिय होतात. सुक्ष्म जिव हे जमीनीच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पुर्वी निसर्गा मधे मानवी हस्तक्षेप कमी होता, पण आता तो खूप वाढल्यामुळे या डोळ्यांनी न दिसणा-या जिवांचा विचार करणे आवश्यक आहे.वनस्पतींसाठी काम करणाऱ्या या जीवाणूंची प्रक्रिया ही पूर्वीपासून चालत आलेली आहे पण आता वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे वाढत चाललेल्या जमिनीच्या प्रदूषणामुळे त्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. वनस्पतीं साठी लागणारे वातावरणातील घटक त्यांना मिळवून देण्यासाठी या सूक्ष्मजीवांचा किंवा जैविक खतांचा खूप मोठा वाटा आहे. वेगवेगळ्या पकारची सूक्ष्मजीव हे ही पिकांसाठी खूप महत्त्वाची आहेत त्यांच्या पानांच्या मुळांच्या आणि खोडाच्या वाढीसाठी परिपूर्ण अन्न मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हवेमध्ये 78 टक्के नायट्रोजन असून ते झाडाला वापरात आणता येत नाही त्यासाठी तो नायट्रोजन त्या पिकाला मिळवून देण्यासाठी सूक्ष्मजीव मदत करतात. (उदाहरणार्थ; रायझोबियम)         

जैविक खतांचे प्रकार आणि वैशिष्ट्ये:

 सूक्ष्मजीवाच्या प्रकारावर आधारित, जैव-खताचे देखील खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते:

बॅक्टेरियाच्या जैव खते: उदा. राईझोबियम,अ्झोस्पेरिलियम, अझोटोबॅक्टर, फॉस्फोबॅक्टेरिया.

फॉस्फरस विघटन बॅक्टेरिया:(pseudomonas/aspergillus) सुडोमोनास आणि अस्पर्गिल्लस

बुरशीजन्य जैव खते: उदा. मायकोराईझा

शैवाल ‌जन्य: निळा ग्रीन शैवाल (बीजीए) आणि अझोला.

अ‍ॅक्टिनिमाइसेट्स बायोफर्टीलायझरः उदा. फ्रँकिया

वनस्पती वाढीसाठी:(pseudomonas sp)सुडोमोनास एस पी.

 

सामान्य बायोफर्टिलायझर्सची वैशिष्ट्ये

 राईझोबियम:- रायझोबियम तुलनेने अधिक प्रभावी आणि व्यापकपणे वापरला जाणारा बायोफर्टीलायझर आहे राईझोबियम मातीमध्ये दोन वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्त्वात आहे: जर वनस्पती मातीत अस्तित्वात असेल(प्रामुख्याने शेंगा असलेल्या) तर ते त्यांच्या सोबत सहजीवन(symbiotic association) स्थापित करतात आणि वातावरणातील नायट्रोजन मुळाशी साठवतात. आणि वनस्पती नसल्यास ते फ्री-लिव्हिंग सप्रोफाइटिक म्हणून कार्य करतात. शेंगा असलेल्या पिकांच्या जमिनीत राईझोबियम ची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. रायझोबियम जिवाणूंची एका हेक्‍टरमध्ये 450 कीलोग्रम /हेक्टर इतके नायट्रोजन पुरवण्याची क्षमता असते.

 अझोस्पिरीलम:- अझोस्पिरिलम हा उच्च वनस्पती प्रणालीच्या जवळचा असोसिएटिव्ह सहजीवन म्हणून ओळखला जातो. या जीवाणूंमध्ये तृणधान्यांसह संबद्धता असते; गहू, ज्वारी, मका, ऊस, मोत्याचे बाजरी, फॉक्सटेल बाजरी आणि इतर लहान बाजरी आणि चारा गवत. अझोस्पिरीला नायट्रोजन फिक्सेशन आणि हार्मोन्सचे स्राव करण्यास सक्षम आहे. जे मुळांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. विविध प्रजातींमध्ये पोषक आहारात सुधारणा करते.सर्वसाधारणपणे अझोस्पीरीलम जिवाणू प्रति हेक्टरी २0 ते ४0 किलो नत्र स्थिर करतात. अझोस्पीरीलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ आढळून आली आहे.

 अझोटोबॅक्टर:- ही एक सामान्य मातीची जीवाणू आहे. हे आंतरप्रवाही जिवाणू आहेत. असिटोबॅक्टर जिवाणू शर्करायुक्त पिकांच्या मुळामध्ये व पिकामध्येही वाढतात. उत्तर: भारतीय मातीत मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. वनस्पती वाढीमध्ये अझोटोबॅक्टर खुप महत्वाची भूमिका बजावतो.

ब्लू ग्रीन शैवाल (बीजीए):-निळ्या हिरव्या शैवालला तांदूळ क्षेत्रात भरपूर प्रमाणात आढळतो. असल्यामुळे ते तांदूळ जीव म्हणून ओळखले जातात. निळा-हिरवा एकपेशीय वनस्पती जीवाणूंचा एक प्रकार आहे ज्याला सायनोबॅक्टेरिया म्हणून ओळखले जाते.हवेतील नत्र स्थिरीकरण करून जवळ-जवळ २५ ते ३० किलो नत्र प्रति हेक्टर एका हंगामात मिळते. रासायनिक खतांच्या नत्र मात्रेमध्ये हेक्टरी २५ ते ३० किलो बचत होते.

जमिनीत अद्राव्य स्वरूपातील स्फुरद भात पिकास काही प्रमाणात उपलब्ध होतो.

जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते. जमिनीचा पोत सुधारतो.

  बुरशीजन्य जैविक(माइकोराईझा):- वनस्पती आणि या प्रकारातील बुरशी एकमेकांना मदत करत असतात. वनस्पती हे त्या बुरशीला अन्न पुरवतात तर बुरशी ही वनस्पती ला पाणी व‌ न्यूट्रिएंट्स(फॉस्फरस) पुरवते. तसेच ते वनस्पतीला मातीतील घातक सूक्ष्म जीवांपासून वाचवते. बुरशीजन्य जैविक आहे वनस्पतीच्या वाढीसाठी ग्रोथ प्रोमोटींग उपयोगी पदार्थ देत असतात.

 

 स्फुरद विरघळणारे जिवाणू (Posphate solubilizers):-

 काही जिवाणू मातीतील घट्ट स्वरूपातील स्फुरदाचे विघटन करून त्याचे पाण्यात विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात. जमिनीमध्ये बद्ध झालेल्या स्फुरदाची पिकांना उपलब्धता करून देतात. परिणामी स्फुरदयुक्त रासायनिक खतांची बचत होते. उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करतात.

स्फुरदमुळे कर्बयुक्त पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया जोमाने होते. पिकांच्या मुळाची जोमदार वाढ होते. पीक फॉस्फरिक ॲसिडच्या रूपाने स्फुरद घेतात. काही जिवाणू सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, फ्यूमारिक आम्ल, फॉस्फेटच्या द्रवात रूपांतर करून पिकास उपलब्ध करून देतात. उदा. बॅसिलस, सुडोमोनास इत्यादी. स्फुरद विरघळणारे जिवाणू खते वापरल्यास सोयाबीन, भुईमूग, हरभरा व बटाटा उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

जैविक खतांचे फायदे:

 महाराष्ट्रातील पिकांच्या उत्पादनात घट येण्याच्या प्रमुख कारणांपैकी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता हे एक आहे. झिंक विरघळविणारी जैविक खते जमिनीतील खनिज स्वरूपातील झिंक विरघळवून पिकांना उपलब्ध करतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.

  जीवांणूपासून बनलेली असल्यामुळे त्यापासून प्रदूषण होत नाही म्हणजेच ती पर्यावरण पूरक असतात.

जैविक खते ही जमिनीच्या पीएच मध्ये बदल करत नसल्यामुळे ती जमिनीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करतात.

जमिनीची उत्पादनक्षमता २५ते ३० टक्के वाढवते.

जमीनीतील रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मदत करते. जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या प्रति जैविकांमुळे पिकाची रोग व कीड़ प्रतिकारशक्ती वाढते.

जैविक खतेही रासायनिक खतांच्या तुलनेत खूप कमी खर्चात उपलब्ध होतात.

 

शरद केशवराव बोंडे.

जैविक शेतकरी

९४०४०७५६२८

English Summary: Bio fertilizer use and how do it Published on: 22 December 2021, 04:54 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters