कांदा एक प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. देशात सर्वत्र कांदा पिकासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले जाते. मात्र असे असले तरी याची लागवड समशीतोष्ण प्रदेशात बघण्यास मिळते. कांद्याची लागवड राज्यात सर्वात जास्त नजरेस पडते. कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्य शीर्षस्थानी आहे. राज्यातील पश्चिम भागात कांदा चे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी संपूर्ण देशात ओळखला जातो. नाशिक समवेतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत कांदा लागवड केली जाते.
तसेच खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. महाराष्ट्रात जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जात असल्याचे सांगितले जाते. राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि कोकणात देखील कांदा लागवड बघायला मिळते. महाराष्ट्र राज्याचे कांदा एक प्रमुख मुख्य पीक आहे त्यामुळे आज आपण कांदा लागवडीतुन दर्जेदार उत्पादन कसे प्राप्त केले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कांदा लागवडीतील काही महत्त्वपूर्ण बाबी.
कांदा लागवडीतील काही महत्त्वपूर्ण बाबी
- कांदा लागवड ही खरीप हंगामात तसेच रब्बी हंगामांत देखील केली जाते.खरीप हंगामात लावल्या जाणाऱ्या कांद्याला लाल कांदा म्हणून ओळखला जातो खरीप हंगामातील कांदा जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. रब्बी हंगामात लावल्या जाणाऱ्या कांद्याला उन्हाळी कांदा म्हणून संबोधला जातो आणि असा कांदा जास्त काळ साठवता येतो. कांद्याची लागवड रब्बी हंगामात केली असता त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त करता येते, रब्बी हंगामात लावल्या जाणाऱ्या कांद्याला रोगराईचा धोका कमी असतो. कांद्याची लागवड अशा जमिनीत केली पाहिजे ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होतो. कांदा पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे कुजलेले शेणखत टाकण्याचा सल्ला दिला जातो.
- कांदा लागवड सर्वात महत्त्वाची बाब ठरते ती पूर्वमशागतीची कांदा लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत व्यवस्थितरीत्या करणे महत्त्वाचे ठरते. पूर्वमशागत करताना जमीन नांगरून व्यवस्थित रित्या जमीन समतल करावी लागते.
- कांद्याच्या पिकात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाणी व्यवस्थापनाची. रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी सहा ते सात दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची शिफारस केली जाते. काढणीपूर्वी कमीत कमी 20 दिवस अगोदर कांदा पिकाला पाणी देणे बंद करावे. नाहीतर यामुळे कांदा सडू शकतो.
Share your comments