हरभरा हे पीक रब्बी हंगामातील गव्हा सोबतचे हे महत्त्वाचे पीक आहे. कोणत्याही पिकाच्या जर आपण चांगल्या वाणांची लागवडीसाठी वापर केला तर उत्पन्नात सहाजिकच वाढ होते. हेच तत्त्व हरभरा पिकासाठी ही लागुपडते. या लेखात आपण हरभरा पिकाच्या काही सुधारित वाण विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
हरभरा पिकाचे सुधारित वाण
- देशी हरभरा-हाहरभरा मुख्यत्वे डाळ बनवण्यासाठी व बेसना करिता वापरतात. या प्रकारामध्ये साधारणतः दाण्यांचा रंग फिकट काथ्याते पिवळसर असतो. दाण्याचा आकार मध्यम असतो.
- भारती( आय सी सी व्ही 10)- हा वाण जिरायती, तसेच बागायती परिस्थितीत चांगला येतो. हा वाण मर रोग प्रतिबंधक असून 110 ते 115 दिवसांत काढणीस तयार होतात. जिरायत क्षेत्रामध्ये हेक्टरी 14 ते 15 क्विंटल तर ओलीता मध्ये 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
- विजय( फुले जी-81-1-1)- जिरायती व ओलिताखालील तसेच उशिरा पेरणी करता प्रसारित केला आहे. मर रोगास प्रतिकारक्षम असून,पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे. जिरायतीतहेक्टरी पंधरा ते वीस क्विंटल व ओलित क्षेत्रात 35 ते 40 क्विंटल व उशिरा पेरणी केल्यास 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता आहे.
- जाकी 9218-हा देशी हरभऱ्याचा आती टपोर दाण्याचा वाण आहे.हा वाण लवकर परिपक्व होणारा आणि मर रोग प्रतिबंधक आहे. सरासरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे.हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे.हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
काबुली हरभरा-
हा हरभरा छोले भटूरे बनवण्यासाठी वापरतात. या हरभऱ्याच्या प्रकारांमध्ये दाण्याचा रंग पांढरा असतो.
- श्वेता( आयसीसीव्ही-2)- मर रोगास प्रतिकारक्षम आहे. दाणे टपोरे असून, जिरायतीमध्ये 85 ते 90 दिवसात तर ओलित क्षेत्रात 100 ते 105 दिवसांत पक्व होतो. जिरायतीमध्ये आठ ते दहा, तर ओलिताखाली 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
- पीकेव्ही काबुली-2- मर रोगाला प्रतिकारक्षम असून पेरणीस उशीर व पाण्याचा ताण पडल्यास टपोरे पणावर परिणाम होतो. म्हणून या वाणाची लागवड योग्य वेळी ओलिताखाली करावे.
- ओलिताखाली उत्पादन 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- विराट- हा काबुली वाण टपोऱ्या दाण्यांचा आहे.हा वाण मर रोग प्रतिकारक्षम असून,ओलिताखाली 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
- पीकेव्ही काबुली 4-या वानाचा दाण्याचा आकार आती टपोर आहे. हा वाणमर रोगास साधारण प्रतिकारक्षम आहे.या वाणाचे सरासरी उत्पादन 15 क्विंटल एवढे मिळते.
गुलाबी हरभरा
- गुलक 1- टपोऱ्या दाण्याचा वाण.मूळकुजव्या व मर रोगास प्रतिकारक असून, दाणे चांगले टपोर,गोल व गुळगुळीत असतात. फुटाणे तसेच डाळी तयार केल्यास त्याचे प्रमाण डी8 पेक्षा जास्त आहे.
Share your comments