जर आपल्याला नांगरणीचा किट व्यवस्थापनात आणि खत स्थिरीकरणामध्ये कसा उपयोग होतो हे सविस्तर समजले तर नक्कीच आपण नांगरणीची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करू शकू.
तर जाणून घेऊयात उन्हाळ्यातील नांगरणीचे फायदे:-
१.आपण जर पारंपरिक शेती पद्धती मध्ये पाहिले तर जमीन आठ महिने पीक व चार महिने पीक विरहित अशी असायची,खरीप आणि रब्बी हंगामातील पिके घेऊन बाकीचे 3 ते 4 महिने जमीन नांगरून तापली जायची.
२.उन्हाळ्यातील तापमान 30℃ ते 38℃ इथंपर्यंत जाते.इतक्या तापमानात जिवाणूजन्य व बुरशीजन्य रोगांचे बीजाणू 60 ते 70 टक्यांपर्यंत नष्ट होतात. व पुढील पिकास त्यांच्या प्रादूर्भावाची शक्यता निम्याहून कमी होते.
३.जमीन पालथल्यामुळे खालील भाग वर येतो,हवा खेळती राहते,कोरड्या हवेशी संपर्क आल्यामुळे अनेक सुप्त घटक सक्रिय होतात.जसे की नत्र,स्फुरद,पालाश स्थिरीकरण करणारे जिवाणू.
४.वळीव पाऊस सुरू होण्याअगोदर आपली जमीन नांगरलेली असेल तर एक्टिनोमायसीट्स नावाचे जिवाणू सक्रिय होतात.पाऊस पडल्यामुळे जो वास आपल्याला येतो तो त्यामुळेच.हे जिवाणू मातीतील रोगकारक जीवाणूंना आळा घालते,तसेच जमिनीत मृत वनस्पती,पशु आणि बुरशीजन्य पदार्थामधील पॉलिमर विघटित करतात.जे पुढील पिकास अंत्यत फायदेशीर आहे.
४.जशी नांगरणी सुरू होते,तेव्हाच अनेक किडीच्या वेगवेगळ्या अवस्था मातीतून जसे कोष,अळी बाहेर येण्यास सुरुवात होते.ते नैसर्गिकरित्या पक्ष्यांच्या भक्षस्थानी पडतात किंवा त्या दिसताच आपण आपण नष्ट करु शकतो. व किडींचा संभाव्य धोका टळतो.
५.पिकाच्या उत्तम वाढीसाठी जमीन भुसभुशीत असणे गरजेचे असते,तो भुसभुशीतपणा व पाणी धरून ठेवण्याची क्षमता नांगरणीमुळे वाढते.
६.पण आज शेतीचे चक्र थोडेसे बिघडले आहे.वाढती स्पर्धा,बाजारपेठेची भरपूर मागणी,त्यामुळे शेतकरी बारमाही पीक उत्पादन घेत आहेत,गरजेनुसारउन्हाळ्यातील नांगरणी ही कधी कधी डिसेंबर करतात तर कधी जून ऑगस्टमध्येच होते.
आपण गरजेनुसार मशागत पद्धतीत बदल करतोय पण ते कितपत योग्य ज्याचं त्यानं ठरवावं.
या सर्व बाबी आपण डोळसपणे लक्ष्यात घेऊन आपण नांगरणी केली तर नक्कीच आपला फायदा होऊ शकतो.
-विकास सानप,नाशिक
संकलन- IPM school
Share your comments