शोभिवंत मत्स्यालय हे आजकाल खूप लोकप्रिय झालेले आहे. खूप लोक याकडे एक छंद म्हणून पाहत आहेत. वास्तू शास्त्रानुसारही याला फार महत्त्व आहे. शोभिवंत मत्स्यालय घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस याची मागणी वाढत आहे. शोभिवंत मत्स्यालय घरात ठेवल्यामुळे अनेक फायदे लोकांना होतात.
वास्तूशास्त्रानुसारही शोभिवंत मत्स्यायालयाला लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे लोक शोभिवंत मत्स्यालय सार्वजनिक ठिकाणी, दवाखान्यात, घरात, महाविद्यालयात, कामाच्या ठिकाणी ठेवत आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे व्यावसायिकदृष्ट्या बगता येते. शोभिवंत मासे लोकांना स्वयंरोजगार निर्माण करून देतात . खर्च कमी व भरपूर उत्पन्न मिळते त्यामुळे ह्या क्षेत्राकडे लोकांचा खूप कल वाढत आहे. मासे खूप शांत प्रजाती आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांच्यामुळे कुठलाही त्रास नाही.
शोभिवंत मत्स्यालय घरात ठेवण्याचे फायदे:
• ताण तणाव कमी होतो.
• शोभिवंत मत्स्यालय घरात ठेवल्यामुळे ताणतणाव कमी होतो. एक शांत ऊर्जा प्राप्त होते आणि मानसिक समाधान लाभते.
रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे ठोके संतुलित राहतात.
• घरात मत्स्यालय ठेवल्यामुळे व त्याकडे पाहिल्यामुळे हृदयविकार कमी होतात. हृदया संबंधित अडचणी कमी होतात. जर कोणी उच्च रक्तदाब व उच्च हृदय गती ह्या संघर्षातून जात असेल तर घरात मत्स्यालय ठेवणे अतिशय उपयोगाचे ठरते.
• वेदना, भीती व चिंता कमी होते.
• मत्स्यालयाच्या उपस्थितीमुळे अनेक दंत रुग्णाच्या वेदना कमी होतात. एका वैज्ञानिक अहवालानुसार मत्स्यालय दंत दवाखान्यात प्रतिक्षयालयात ठेवल्यामुळे रुग्णावर पुढचा उपचार होण्याआधीच वेदना कमी झाल्याचे रुग्णाला जाणवते.
• सृजनशीलता वाढते आणि लक्ष केंद्रीत होते.
• मत्स्यालयाच्या उपस्थितिथीमुळे मन आणि शरीर दोन्ही शांत राहतात व वेदना कमी होतात. पण मत्स्यालय हे कामाच्या ठिकाणी ठेवल्यामुळे सृजशीलता वाढते. कामामध्ये लक्ष केंद्रीत होते. नवनवीन कल्पना सुचतात व कामाची उत्पादकता वाढते. जर एखादी अडचण असेल तर एख्यादया सक्रिय माशिला पाहिल्यामुळे लक्ष अडचानिकडून वळते व त्या अडचणींवर उपाय सुचतात.
• आजकाल खूप लोकांना ताणतणावामुळे निद्रानाश होत आहे. ही एक खूप मोठी समस्या बनली आहे. पण मत्स्यालय घरात ठेवल्यामुळे ही समस्या दूर होते. ताणतणाव दूर होऊन छान शांत झोप लागते व त्यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा भेटते.
• घरात मत्स्यालय ठेवल्यामुळे लहान मुलांमध्ये विचार करण्याची क्षमता वाढते. लहान मुले सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम होतात. लहान मुलांमध्ये कल्पना शक्ती वाढते.
शोभिवंत मासे घरात ठेवणे भाग्यशाली मानले जाते.
• काही विविध प्रकारच्या माश्याच्या प्रजाती भाग्यशाली मानल्या जातात विशेष प्रजाती विषयी बोलायचं मनल तर ॲरोवना माशी खूप भाग्यशाली मानली जाते त्यामुळे घरामध्ये भरभराट होते, संपत्ती प्राप्त होते .
• शोभेच्या माश्या ह्या तरुणांना आणि वृद्ध लोकांना आनंद तर देतातच सोबतच विश्रांती पुरवतात.
• शोभिवंत माश्याची शेती हे लोकांना स्वंयरोजगर निर्माण करून देते.
वास्तुशास्त्रानुसारही खूप महत्त्व.
• वास्तुशास्त्रानुसारही शोभिवंत मत्स्यालयाचे महत्व खूप वाढले आहे . शक्यतो मत्स्यालय हे पूर्व, उत्तर ह्या दिशांना ठेवले जाते.काही दिशा व त्या दिशेला मत्स्यालय ठेवण्याचे फायदे:
1. उत्तर _पूर्व : ह्या दिशेला मत्स्यालय ठेवल्यामुळे आंतरिक ज्ञान वाढते
2. पश्चिम. : ह्या दिशेला मत्स्यालय ठेवल्यामुळे लहान लेकरांमधिल सृजनशीलता वाढते.
वैष्णवी सोनवळे, हिरा पाटील, विद्यार्थीनी,
जयंता सु. टिपले, सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मो. न. ८७९३४७२९९४. मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर. महाराष्ट्र.
Share your comments