डाळवर्गीय पिकांमध्ये हरभरा एक महत्वपूर्ण पीक आहे.भारतात लागवड केल्या जाणाऱ्या डाळवर्गीय पिकांमध्ये 50 टक्के हिस्सा हा हरभऱ्याचा आहे. हरभऱ्याचा प्रमुख वापर हा दाळ,बेसन पीठआणि भाजीच्या रुपात केला जातो.हरभऱ्यामध्ये असलेले पोषक तत्वे,प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम आणि आयर्न आता ती पोषक घटक असतात की ती आपल्या आरोग्याला फायदेशीर असतात.या लेखात आपण उपयोगी अशा हरभऱ्याच्याकाही जातींची माहिती घेणार आहोत जेणेकरूनया जातींच्या लागवडीनेशेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
- जे जी 74-
- हरभऱ्याची ही प्रजात 110 ते 115 दिवसांत मध्ये काढणीस तयार होते.
- या जातीचे वैशिष्ट्य आहे की हीचे सरासरी उत्पादन 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- या जातीच्या हरभऱ्याचा दाणा हा मध्यम आकाराचा असतो.ही जातभारतातील संपूर्ण राज्यांमध्ये लागवड करतात.
- जेजी 315 –
- हरभऱ्याची ही जात 140 ते 145 दिवसात काढण्यास तयार होते.
- या जातीच्या हरभऱ्याची सरासरी उत्पादन हे 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- या जातीच्या हरभऱ्याचा दाणा हा मध्यम आकाराचा असून या जातीची लागवड प्रामुख्याने छत्तीसगड राज्यात केली जाते.
- राधे
- हरभऱ्याची ही जात 140 ते 150 दिवसांमध्ये काढणीस तयार होतात.
- या जातीचे सरासरी उत्पादन25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- या जातीच्या हरभऱ्याचा दाणा आकाराने मोठा असतो. हरभऱ्याचे झाड इतर जातींपेक्षा उंच असते.
- हरभऱ्याचे ही प्रजाती भारताच्या संपूर्ण राज्यामध्ये लागवड केली जाते.
- अवरोधी-
- हरभऱ्याची जात 150 ते 155 दिवसांत काढणीस तयार होते
- या जातीचे हेक्टरी सरासरी उत्पादन 25 ते 30 क्विंटल आहे.
- या जातीच्या झाडांची उंची मध्यम स्वरूपाची असते.
- विजय –
- हरभऱ्याची ही प्रजाती 120 ते 125 दिवसांत काढणीस तयार होते.
- या जातीचे हेक्टरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळते.
- या जातीच्या हरभरा चा दाणा मध्यम आकाराचा असतो.
- या जातीची लागवड छत्तीसगड राज्यातकेली जाते.
Share your comments