1. कृषीपीडिया

ऊस शेतकऱ्यांनो सावधान! ऊसावर आलाय नवीन “पोक्का बोईंग” रोग

ऊस, कापूस, हापूस आंबा, द्राक्षे, डाळिंब, संत्रा, तूर किंवा अंजीर या पिकांनी महाराष्ट्राला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. कारण या पिकांचे उत्पन्न त्याच बरोबर उच्च गुणवत्ता हे त्याचे प्रमाण आहे. पूर्ण जगभरात या पिकांपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तुनीची किंवा फळांची निर्यात होत असते, कारण मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे.

Pradip Balaso Bhapkar
Pradip Balaso Bhapkar


ऊस, कापूस, हापूस आंबा, द्राक्षे, डाळिंब, संत्रा, तूर किंवा अंजीर या पिकांनी महाराष्ट्राला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. कारण या पिकांचे उत्पन्न त्याच बरोबर उच्च गुणवत्ता हे त्याचे प्रमाण आहे.  पूर्ण जगभरात या पिकांपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तुनीची किंवा फळांची निर्यात होत असते, कारण मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी त्या सबंधित पिकांचे उत्पन्न, आरोग्य आणि गुणवत्ता टिकवण आजच्या घडीला एक मोठे आव्हान आहे. याच पिकांमधील महत्वाचे पीक म्हणजे ऊस, महाराष्ट्राची शेतीमधील ओळख व दबदबा असलेल पीक.

 कारण मोठ्या प्रमाणात याची लागवड होते त्याचबरोबर उत्पन्न ही होते.  शेतकऱ्यांना परवडणारे व भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून पण ऊस पिकाकडे बघितले जाते पण आज तशी परिस्थिती राहिली नाही.  बदलत्या वातावरणामुळे ऊस पीकावरती नेहमी कोणत्या ना कोणत्या मार्गाने संकट आली आहे आणि त्यामध्ये नवीन संकट येऊ पाहत आहे ते म्हणजे पोक्का बोईंग जातीचा नवीन रोग.  ऐकायला नवीन आहे, अजून त्याचा प्रभाव ऊसाचे जास्त क्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसला नाही, पण शेतकरी बांधवांनो हा नवीन रोग कोल्हापूर मध्ये येऊन धडकला आहे.  पण याला घाबरून न जाता त्याला नियंत्रणात आणता येऊ शकते.  हा रोग कसा होतो, रोग झाल्यावर काय करावे याविषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.  तर चला जाणून घेऊयात या नवीन रोगाविषयीची माहिती.

 


बुरशीजन्य पोक्का बोईंग रोग प्यूजॉरियाम मोनोलीफॉरमी या बुरशीमुळे होतो. मुख्यत हा रोग वायुजन्य मार्गाने संक्रमित होतो त्याचबरोबर दुय्यम संसर्ग ऊसाचे कांडे, सिंचनाचे पाणी, तुरळक पाऊस आणि माती याद्वारे होतो.  यजमान पिकांमध्ये केळी, मका, कापूस, आंबा, ऊस आणि इतर महत्वाची पीकांवरती या बुरशीचा वावर दिसतो.  रोगजनक कोणत्याही जखमाद्वारे यजमान उतीमध्ये प्रवेश करते.

रोगाची लक्षणे-

  • ऊसाची लागवड जर का मार्च-एप्रिल महिन्यात केली तर या रोगाची लक्षणे आढळू शकतात.
  • सुरूवातीस बुरशीची लागण शेंड्यातून येणाऱ्या तिसऱ्या वा चौथ्या कोवळ्या पानावर दिसून येते.  पानांच्या नियमित आकारामध्ये बदल होताना दिसतो.
  • पानाच्या खालच्या भागात सुरूवातीस फिक्कट हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात अशा पानांचा आकार बदलतो, लांबी कमी होते. खोडाकडील भाग अरुंद होऊन पाने एकमेकांत गुंफली जातात किंवा वेणीसारखी गुंडाळली जातात.
  • प्रादुर्भावग्रस्त जुन्या पानावर पिवळसर पट्ट्याच्या जागेवर वर्तुळाकार, लांब अरुंद वेगवेगळ्या आकारांचे लालसर ते तपकिरी ठिपके अथवा रेषा दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडे कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात.

रोगाचे नियंत्रण-

  • रोगग्रस्थ दिसलेले रोप पहिल्यांदा रानातून उपटून जाळून किंवा पुरून टाकले पाहिजे.
  • बेणे प्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा ५ ग्राम प्रती लिटरच्या हिशोबाने एक ताससाठी बेण तयार द्रावणात बुडवून ठेवावे व त्यानंतर लागण करावी.
  • कॉपर ऑक्सी क्लोराइड २ ग्राम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • क्सापोनाजोल (कंटॉप) २५० मिली १५० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून घ्यावी.  दोन-तीन फवारण्या १५ दिवसाच्या फरकाने घ्याव्यात.
  • बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेड हे दोनी एकत्र ड्रीप द्वारे द्यावे, १ किलोग्रॅम बोरॉन आणि ५ किलो कॅल्शियम नायट्रेड असे सलग १० दिवसातून २ वेळा तरी सोडावे.

English Summary: Be alert! New emerging disease “Pokkah Boeng” shown on Sugarcane Published on: 01 June 2020, 06:25 IST

Like this article?

Hey! I am Pradip Balaso Bhapkar. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters