1. कृषीपीडिया

बटाटा पिकावरील विषाणूजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे

बटाटा पिकात मावा व तुडतुडे या विषाणूजन्य रोगाच्या दुय्यम प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या किडीचे योग्य निदान करून खालील निर्देशीत

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
बटाटा पिकावरील विषाणूजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन

बटाटा पिकावरील विषाणूजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन

बटाटा पिकात मावा व तुडतुडे या विषाणूजन्य रोगाच्या दुय्यम प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या किडीचे योग्य निदान करून खालील निर्देशीत कोणत्याही एका कीटकनाशकांचा प्रादुर्भावानुसार गरज असेल तर तरच वापर करून मावा व तुडतुडे या किडीचे व्यवस्थापन करावे Thiamethoxam 25% WG 2 ते 3 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी किंवा Methyl dematon 25 % EC 10 मिली अधिक दहा लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची मावा व तुडतुडे या किडीच्या व्यवस्थापनासाठी व त्यापासून पुढे होणाऱ्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यकतेनुसार योग्य निदान करून गरजेनुसार फवारणी करावी.

बिजप्रक्रिया 

         एक हेक्‍टर लागवडीसाठी ढेमशाचे 3 ते 4 किलो बियाणे लागते. बियांचे कवच जाड असते, त्यामुळे बियाण्याला बीजप्रक्रिया करावी. बियांची चांगली उगवण होण्यासाठी बिया 24 ते 48 तास ओल्या फडक्‍यात बांधून ठेवाव्यात.

लागवडीपूर्वी बिया 2 ग्रॅम बाविस्टीन प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बुडवून घ्याव्यात. ढेमशाची लागवड पट्टा पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात. 

पाणी व्यवस्थापन :आळे पद्धतीने पिकाला जास्त पाणी द्यावे लागते आणि तणांची वाढही जास्त होते. लागवड करताना दोन ओळींत 90 सें. मी. आणि दोन वेलींत 60 सें. मी. अंतर ठेवून करावी. एका ठिकाणी 2-3 बिया खुरप्याच्या साहाय्याने टोकून मातीने झाकून हाताने दाबून घ्याव्यात.

बटाट्याची लागवड करताना विषाणूजन्य रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता रोगमुक्त बियाण्याचा म्हणजेच रोगमुक्त बटाट्याचा वापर करावा.

विषाणूजन्य रोगाची लक्षणे बटाटा पिकात दिसताच पहिले एकटे दुकटे रोगट झाड उपटून नष्ट करावे.

बटाट्याचे शेत तणविरहित ठेवावे तसेच पिकांची फेरपालट करावी.

दरम्यान आपण या लेखातून बटट्यावर येणाऱ्या रोगांविषयीची माहिती घेऊया. त्याचे व्यवस्थापन कसे करावे याचीही माहिती आपण त्यातून घेणार आहोत.

पिकातील पाने गुंडाळणारा विषाणू ( लिफ रोल व्हायरस) : रोगग्रस्त बटाट्यामुळे या रोगाचा प्राथमिक प्रादुर्भाव होऊन पुढे मावा आणि तुडतुडे या किडीमुळे या रोगाचा दुय्यम प्रसार होऊ शकतो. या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव बटाटा पिकास झाल्यास पाने आत वळून आकसतात, पाने पिवळसर पडतात आणि रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडांना बटाटे छोट्या आकाराचे आणि कमी प्रमाणात लागतात या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाल्यास बटाट्याच्या उत्पादनात 25 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत घट संभवते.

बटाटा पिकावरील वाय विषाणू ( पोटॅटो व्हायरस वाय) : या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास बटाटा पिकात नवीन पाने आकसलेली व रंगहीन दिसतात तसेच पाने, देठ, फांदी करपल्या सारखी दिसते. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ खुंटते व रोगग्रस्त पाने गळतात. या रोगाचा प्रसार मावा या किडी मार्फत होऊ शकतो.

पर्पल टॉप रोल व्हायरस : बटाटा पिकात हा रोग फायटोप्लाजमा या घातक लसीमुळे होतो. या रोगात बटाट्याची पाणी वाळतात आणि आकसतात. शेंड्याकडील पानाचा खालचा भाग जांभळट गुलाबी दिसतो. बटाट्याची खालील जुनी पाने पिवळी होतात, रोगग्रस्त झाडाची उंची खुंटते बटाट्यास बारीक केसाळ कोंब फुटतात. या रोगाचा प्रसार तुडतुडे या किडींमार्फत होतो.

बटाट्याची लागवड करताना विषाणूजन्य रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता रोगमुक्त बियाण्याचा म्हणजेच रोगमुक्त बटाट्याचा वापर करावा.

विषाणूजन्य रोगाची लक्षणे बटाटा पिकात दिसताच पहिले एकटे दुकटे रोगट झाड उपटून नष्ट करावे.

बटाट्याचे शेत तणविरहित ठेवावे तसेच पिकांची फेरपालट करावी.

विनोद धोंगडे नैनपुर

English Summary: Batata crop virus disease management Published on: 30 January 2022, 09:44 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters