भारतातील शेतकरी आता शेती करताना शेतीची पारंपारिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत.शेतीला एक पारंपारिक व्यवसाय न मानतात त्याला एक आता व्यावसायिक स्वरूप येत आहे.
शेती करण्याच्या पद्धती सोबतच घेण्यात येणाऱ्या पीक पद्धती देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.पारंपरिक पिके देण्याच्या शेतकऱ्यांनी आता बंद केले असून नवनवीन आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून नफा देणारी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
यामध्ये भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये देखिल वेगळ्या प्रकारचा विदेशी भाजीपाला, फळबागांमध्ये देखील स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुट सारखे उदाहरण आपल्याला सांगता येतील. या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी आता औषधी वनस्पतींच्या शेतीचा विचार करू लागला असून बऱ्यापैकी लागवड क्षेत्रात वाढ होत आहे.
यामध्ये अश्वगंधा,शतावरी सारखे औषधी वनस्पतींची लागवड वाढत असून तुळस हादेखील एक व्यावसायिक शेती करण्याच्या दृष्टीकोनातून पुढे आलेला उत्तम पर्याय आहे. या लेखामध्ये आपण तुळस शेती विषयी आणि या व शेती शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून कशी फायदेशीर ठरू शकते याबद्दल माहिती घेऊ.
तुळस लागवड एक शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक शेतीचा पर्याय
तुळस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म तर आहेतच परंतु धार्मिक परंपरांमध्ये तुळशीला खूपच महत्त्व आहे. जर आपल्या भारताचा विचार केला तर तुळशीला पौराणिक महत्त्व असूनसंपूर्ण जगात तुळशीचे दीडशे प्रकार आहेत.
तुळशीची लागवड करायची असेल तर सुपीक जमिनीत पाहिजे असं काही नाही.पाण्याचा उत्तम निचरा होणारी वालुकामय आणि चिकन माती असलेल्या जमिनीत देखील तुळस लागवड करता येते. उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीयअशा दोन्ही प्रकारच्या हवामानात व शेती चांगल्या प्रकारे केले जाते.
तुळस लागवडीच्या आधी रोपवाटिका तयार करावी लागते व नंतर रोपांची पुनर्लागवड करावी लागते.जर आपण तुळस लागवडीच्या कालावधीचा विचार केलातर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांनी तुळस लागवडीसाठी शेत तयार करावे.पंधरा ते वीस सेंटीमीटर चांगली खोल शेताची नांगरणी करावी वचांगले उत्तम कुजलेले शेणखत 15 ते 20 टन प्रती एकर शेतात चांगले मिसळावे.
नक्की वाचा:'या' झाडाची एका एकरात लावलेली 120 झाडे 10 वर्षानंतर बनवतील करोडपती
तुळशीची लागवड कराल परंतु या गोष्टी ठेवा लक्षात
प्रत्येक पिकाच्या लागवडी साठी विशिष्ट काही बाबींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते, तीच गोष्ट तुळशीला देखील लागू होते.शेतकरी जमिनीच्या पृष्ठभागावर एक मीटर लांब आणि एक मीटर रुंद बेड तयार करूनए हेक्टर जमिनीसाठी 750 ग्रॅम ते एक किलो बियाणे यासाठी लागते.
सुरुवातीला 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश आवश्यक आहे.तुळशीच्या बियाण्याची थेट पेरणी करायची नसतेतर भुसभुशीत जमीनीमध्ये किंवा वाळूमध्ये चांगले मिसळून ते पेरावे लागते.
लागवड किंवा पेरणी करताना एका ओळीत पासून दुसऱ्या ओळीतील अंतर आठ ते दहा सेंटिमीटर असणे गरजेचे असून यांनी जास्त खोलवर जाणार नाही याची शंका त्यांनी काळजी घ्यावी.या पिकाला जास्त सिंचनाची गरज भासत नाही परंतु शेतकरी पिकाची गरज पाहून त्याला पाण्याचा पुरवठा करू शकता.
नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो! कपाशी लावली गेली परंतु सुरुवातीला पाऊस आहे कमी तर नका करू काळजी कारण….
हेक्टरी मिळते 25 टनांपर्यंत उत्पादन
लागवड केल्यानंतर जवळ जवळ शेतकऱ्यांनी खुरपणी वगैरे कडून पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे असते.तुळशीची लागवड करण्याआधी व लागवडीनंतर आपण प्रति हेक्टरी 15 टन या दराने कुजलेले शेण मिसळू शकतात. 75 ते 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रति हेक्टरी वापरता येते.
रोपांची पुनर्लागवड करण्याअगोदर फॉस्फरस आणि पोट्याश ची पूर्ण मात्रा द्यावी,तर एक तृतीयांश नायट्रोजन द्यावा. उरलेले नत्र तुम्ही पिकाला दोनदा देऊ शकतात. तुळशीची लागवड केल्यानंतर 10 ते 12 आठवड्यांनी तुळशी काढण्यासाठी तयार होते. या काळामध्ये झाडा पूर्ण फुले वाढतात आणि खालची पाने पिवळी पडू लागतात. अशाप्रकारे या पिकापासून हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन मिळू शकते. त्यात80 ते 100 लिटर तेल निघते.
नक्की वाचा:20 हजारात 'या' फुलाची लागवड करा अन कमी कालावधीत कमवा लाखों, वाचा
Share your comments