केळी हे जगातील प्राचीन फळ असून केळीला स्वर्गीय फळ असे म्हणतात. केळीच्या फळांमध्ये कॅल्शिअम फॉस्फरस लोह ही महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. केळीच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात ३६ ग्राम कर्बोदके असतात.
भारतात केळीच्या लागवडीचे पश्चिम विभाग पूर्व विभाग दक्षिण विभाग आणि ईशान्य विभाग हे चार विभाग पडतात. महाराष्ट्राच्या सर्व भागात केळीची लागवड होत असली तरीही जळगाव आणि ठाणे जिल्ह्यात केळी लागवडीखाली मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. आजच्या लेखात आपण केळी पिकांची निगा आणि मोहोर फळधारणेच्या हंगामाविषयी माहिती करुन घेणार आहोत..
मोहोर फळधारणा हंगाम
-
लागवडीनंतर 10 ते 12 महिन्याच्या अवधित झाडावर लॉगर येऊ शकतो.
-
बसराई जातीचे लोंगर 7 ते 12 महिन्यात बाहेर पडतात. वाल्हा जातीत 6 ते 7 महिने लागतात. लालवेची, सफेदवेलची व मुठळी जाती 9 ते 13 महिने लागतात. तर लालकेळीस लॉंगर येण्यास 14 महिने लागतात.
-
झाड चांगले वाढलेले असल्यास लागवडीनंतर साधारणपणे 6 महिन्यांनी खोडास फुलोरा तयार होवू लागतो.
-
9 ते 10 महिन्यांनी केळी फूल खोडाबाहेर पडते. व 3 ते 5 महिन्यात घड तयार होतो. थंडीच्या दिवसात घड तयार होण्यास जास्त काळ लागतो.
-
घडाने आकार घेतल्यानंतर त्याच्या टोकास असलेले वांझ केळफूल त्या घडातील केळयांच्या शेजारी फणीपासून थोडया अंतरावर कापून टाकतात.
-
त्या केळफूलाचा भाजीसाठी उपयोग होतो शिवाय ते काढून घेतल्यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्याचे वजन वाढते.
-
केळीचा हंगाम मुख्यतः महाराष्ट्रात ठाणे, वसई भागात जूलै ते मार्च व खानदेश भागात सप्टेंबरमध्ये असतो.
-
फळ चांगले पोसून गुबगुबित झाले, त्यावरच्या धारा (कडा) मोडून ते गरगरित झाले की, ते पूर्ण तयार झाले समजावे.
-
पूर्णपणे तयार झालेला घड तीन ते चार दिवसांत पिकतो. त्यामुळे तो वाहतूकीस योग्य ठरतो.
-
त्यासाठी 75 टक्के पक्व असेच घड काढतात. त्यामुळे ते लांबवर वाहतूक करता येते.
वाहतूक
बारमाही बहराचे वरदान केळी पिकाला लाभलेले असले तरी जलद गतीने नाशवंत फळांच्या शापांचे गालबोटही या पिकास लागले आहे.
झाडावर केळ पूर्णपणे वाढून तयार झाल्यावर घड कापून जलद गतीने ग्राहकापर्यंत पोहचविण्याची गरज असते. केळीची घड त्यांच्या पानाचा थर देऊन वाघीणी किंवा ट्रक मध्ये रचली जातात.
-
2 ते 7 दिवसापर्यंतच्या रेल्वे प्रवासात केळी आपोआप पिकतात व स्थानकावर पोहोचविल्यावर त्वरीत त्याची 2 ते 4 दिवसांत विल्हेवाट लावावी लागते.
-
केळी हिरवी व पूर्ण वाढीची सोडली तरीही आपोआप प्रवासात पिकतातञ किंवा धुरी वा इथाइलीन गॅसच्या साहारूयाने पिकविले जातात.
-
केळीच्या घडाच्या दांडयाला पॅराफिन मेण, व्हॅसलिन किंवा चुना लावतात. त्यामुळे फळे जास्त काळ टिकतात व अधिक आकर्षक रंगाचे होतात. अर्धा किलो मेन 100 घडयांना पुरते.
उत्पादन व विक्री
-
प्रदेश, जात व जमिनीच्या प्रकारानुसार केळीच्या उत्पादनाचे प्रमाण बदलू शकते. बसराई जातीचे खानदेश भागात अंदाजे उत्पन्न 335 ते 450 क्विंटल प्रति हेक्टरी सरासरी येते.
-
पूणे व ठाणे भागात 590 ते 650 क्विंटल प्रति हेक्टरी सरासरी येते.
-
राज्य व्यापार महामंडळ, मुंबईतर्फे रशिया. जपान. इटली. कुवेत. वगैरे देशात केळीची निर्यात केली जाते.
-
घाऊक व्यापारी केळयांची खरेदी जागेवरच केळी बागेत घडांची संख्या आकारमान विचारात घेऊन करतात. तथा सर्वर मोठया पेंठात त्यांची वजनावर विक्री होते.
-
किरकोळ विक्रेते भटटीचा तयार माल विकत घेऊन डझनावर विक्री करतात.
-
बागेतील जमिन स्वच्छ व भुसभुशित ठेवावी. त्याकरिता सुरुवातील कोळपण्या द्याव्यात. पुढे हाताने चाळणी करावी.
-
केळीच्या बुंध्यालगत अनेक पिले येऊ लागतात. ती वेळच्या वेळी काढून टाकावीत.
-
लागवडीनंतर 4 ते 5 महिन्याने झाडांच्या खोडाभोवती मातीवर थर द्यावा.
-
आवश्यकता भासल्यास घड पडल्यावर झाडास आधार द्यावा.
-
सुर्यप्रकाशापासून इजा होऊ नये म्हणून केळीच्या घडाभोवती त्याच झाडाची वाळलेली पाने गुंडाळण्याची प्रथा आहे.
-
थंडीपासून संरक्षणासाठी बगीच्याच्या भोवताली शेकोटया पेटवून धूर करावा.
-
केळी पिकाला इतर फळपिकांच्या मानाने जास्त पाणी लागते.
-
दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे व त्यामुळे पाणी पातळी खोलवर जात आहे. त्यामुळे केळी खाजलील क्षेत्र कमी कमी होत आहे.
क्षेत्र वाढीसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिबकसिंचन योजना राबवून क्षेत्र टिकवून राहू शकेल व त्यात वाढही शक्य आहे.
-
केळी हे सर्व फळांमध्ये स्वस्त आहे व त्यामुळे गरीबवर्गीयांसाठी उपयुक्त आहे. या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी विशेष शासकीय सवलतीचा कार्यक्रम नाही. इतर जिरायत व बागायत पिकांप्रमाणे कर्जपुरवठा वगैरे उपलब्ध केला जातो.
-
वाहतूकीसाठी रेल्वेकडून वॅगन्स उपलब्ध केल्या जातात. पण त्यात अल्पशी सवलत आहे. केळी उत्पादन टिकविणे, वाहतूक जलद व सवलतीच्या दराने करणेची व्यवस्था करणे यामुळे लागवड क्षेत्र वाढीवर चांगला परिणाम होईल.
खत व्यवस्थापन
सेंद्रीय खते – शेण खत 10 किलो प्रति झााड किंवा गांडूळ खत 5 किलो प्रति झाड
जैवकि खते – अॅझोस्पिरीलम – 25 ग्रॅम प्रति झाड व पी एस बी 25 ग्रॅम प्रति झााड केळी लागवडीच्या वेळी
रासायनिक खते – केळीसाठी प्रति झाडास 200 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्फूरद व 200 ग्रॅम पालाश् देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
जमिनीतून रासायनिक खते देताना त्यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खोल बांगडी पध्दतीने किंव कोली घेवून खते द्यावी.
पाणी व्यवस्थापन
केळी पिकास एकूण 1800 ते 2200 मि. मि. पाणी लागते.
केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त असून, ठिबक सिंचनासाठी सूक्ष्म नलीका पध्दतीपेक्षा ( मायक्रोटयुब) ड्रिपर किंवा इनलाईन ड्रीपर चा वापर करणे अधिक योग्य असते.बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी वाढीची अवस्था इ. बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते.
Share your comments