यावर्षी शेतकऱ्यानं अनेक संकटांना समोरे जावे लागत आहे जसे की अतिवृष्टी झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यात खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. केळीच्या बागा जोमात असल्यामुळे त्यास कमी प्रमाणात फटका बसलेला आहे.अगदी अर्धापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या बागांची जोपासना तळहाताच्या फोडाप्रमाणे केली मात्र अवकाळी पाऊस आणि वातावरणामध्ये होणारे बदल त्यामुळे केळीच्या बागांचे एवढे भयानक नुकसान झाले आहे की ते भरून सुद्धा निघणार नाही.करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे केळीच्या बुडापासून ते झाडावर याचा प्रादुर्भाव झाला आहे तसेच याची पाने सुद्धा करपून गेलेली आहेत.
शेतकऱ्यांना दुहेरी फटका:-
अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीनचे तर नुकसान झालेच आहे जे की अजून त्याची भरपाई भेटलेली नाही. खरीप हंगाम बेभरवशी असल्याने शेतकरी आता फळबागांकडे ओळले आहेत मात्र यामध्ये सुद्धा निराश प्राप्त झालेली आहे.पारंपरिक पिकाला खर्च कमी लागतो त्यामुळे जरी नुकसान झाले तर काही वाटत नाही पण केळीची जोपासना करण्यासाठी लाखो रुपये खर्च लागतो. बागा अंतिम टप्यात असताना करप्या रोगाचा प्रादुर्भाव जडलेला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी फवारणी करण्याचा सला दिलेला आहे.

केळीचे दरही घसरलेलेच:-
पिकबदल करून चांगले उत्पादन काढायचे असा शेतकऱ्यांचा निर्धार होता त्यामुळे त्यांनी पारंपरिक पीक सोडून केळीची लागवड केली. सुरुवातीला चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यात केळीचे क्षेत्र वाढले पण यंदा केळी ला कमी दर भेटला असल्याने शेतकऱ्याना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले.
Share your comments