1. कृषीपीडिया

Bamboo Farming: पडीक जमिनीवर देखील केली बांबूची लागवड तरी मिळेल वार्षिक 6 ते 7 लाखांचा नफा, वाचा तपशील

बांबू लागवडीचा विचार केला तर हे एक महत्वपूर्ण असे वृक्ष असून याला बाजारपेठेत कायम मागणी असते. म्हणजे एक उत्पन्नाच्या स्त्रोताचा विचार केला तर शेतकरी बंधूंना एक निश्चितपणे शाश्वत आर्थिक उत्पन्न या माध्यमातून मिळणे शक्य आहे. विशेष म्हणजे याची परत परत लागवड करण्याची गरज नसून एकदा लागवड केली तर तुम्ही 40 वर्षापर्यंत या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात. तसेच भारत सरकारने देखील बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राष्ट्रीय बांबू मिशनची सुरुवात केलेली आहे. या मिशनच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना बांबूच्या रोप खरेदीवर अनुदान मिळते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
bamboo cultivation

bamboo cultivation

 बांबू लागवडीचा विचार केला तर हे एक महत्वपूर्ण असे वृक्ष असून याला बाजारपेठेत कायम मागणी असते. म्हणजे एक उत्पन्नाच्या स्त्रोताचा विचार केला तर शेतकरी बंधूंना एक निश्चितपणे शाश्वत आर्थिक उत्पन्न या माध्यमातून मिळणे शक्य आहे.

विशेष म्हणजे याची परत परत लागवड करण्याची गरज नसून एकदा लागवड केली तर तुम्ही 40 वर्षापर्यंत या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात. तसेच भारत सरकारने देखील बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राष्ट्रीय बांबू मिशनची सुरुवात केलेली आहे. या मिशनच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना बांबूच्या रोप खरेदीवर अनुदान मिळते.

नक्की वाचा:अरे वा काय म्हणता! शेतकरी राजांनी पिकवलेला शेतमाल कृषी विभागाचे कर्मचारी विकणार, काय आहे याबाबतीत कृषी विभागाची योजना? वाचा डिटेल्स

बांबू लागवडीतील महत्त्वाच्या बाबी

 बांबू लागवड करायची असेल तर च्या शेतामध्ये तुम्हाला लागवड करायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुसरे कुठलेही प्रकारचे पीक घेता येत नाही. कारण एकदा लागवड केली की 40 वर्षे तुम्हाला त्या क्षेत्रातून आमचे उत्पादन मिळते. त्यानुसार जमिनीचे क्षेत्र ठरवणे गरजेचे आहे. जर हेक्टरी लागणाऱ्या रोपांचा विचार केला तरपंधराशे झाडे एका हेक्टर मध्ये लागतात असे तज्ञांचे मत आहे.

बांबूची काढणी बाजारातील स्थिती किंवा गरजेनुसार करता येते. कारण बांबू खराब होत नाही किंवा कालांतराने त्याचा दर्जा देखील खराब होत नाही. बाबू लागवड प्रामुख्याने आसाम, कर्नाटक, नागालँड, त्रिपुरा, ओरिसा, गुजरात आणि महाराष्ट्र इत्यादी राज्यातील माती आणि हवामान बांबू लागवडीला अनुकूल आहे

 बांबू लागवडीसाठी शासन देते अनुदान

बांबू लागवडीला चालना देण्यासाठी भारतात राष्ट्रीय बांबू मिशन राबविण्यात येत आहे. यासोबतच बांबू लागवडीसाठी सरकारकडून ५० टक्के आर्थिक मदतही दिली जाते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा राष्ट्रीय बांबू अभियानाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता https://nbm.nic.in/ “> https://nbm.nic.in/ अंदाजानुसार , बांबू लागवडीसाठी 1 रोप 240 रुपयांना उपलब्ध आहे, त्यावर शासनाकडून प्रति रोप 120 रुपये अनुदान मिळते.

एका एकरात 1500 झाडे लावता येतात, ज्यामध्ये एकूण 3 लाख 60 हजार खर्च करता येतो. यामध्ये शेतकऱ्याला 1 लाख 80 हजारांपर्यंतचे अनुदान मिळू शकते. हे पूर्णपणे शेतकऱ्यावर अवलंबून असते की त्याला किती क्षेत्रात बांबूची लागवड करायची आहे किंवा कोणत्या प्रकारची बांबू लावायची आहे. या संदर्भात भारतीय आणि परदेशी बाजारपेठेतील मागणीचीही काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून अधिकाधिक फायदा मिळू शकेल.

 बांबू लागवडीसाठी लागतो एवढा खर्च आणि मिळते इतके उत्पादन

तज्ज्ञांच्या मते, बांबूच्या विविध जातींनुसार एका एकरात 1500 ते 2500 बांबूची रोपे लावता येतात. दरम्यान, बांबूच्या एका रोपाची किंमत २४० रुपये असते, तर एका एकरासाठी ३,६०,००० ते ५ लाखांपर्यंत खर्च येतो, ज्यावर सरकारकडून ५० टक्के अनुदान मिळते.

दुसरीकडे उत्पादनाबाबत बोलायचे झाले तर एक हेक्‍टर बांबूपासून 25 ते 30 टन बांबूचे उत्पादन होते, ते बाजारात 2500 ते 3000 रुपये प्रति टन दराने विकले जाते. यानुसार ३ वर्षानंतर एक हेक्टरमधून वर्षाला ७ ते ८ लाख रुपये कमावता येतात.

नक्की वाचा:अमेरिकेतील वीस वर्षाच्या मुलीने घेतलाय भारतातील शेतकऱ्यांना श्रीमंत करण्याचा ध्यास

English Summary: bamboo cultivation is so profitable to farmer get 40 years production from bamboo Published on: 16 December 2022, 08:36 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters