हे विधान गोंधळ निर्माण करणारे आहे आणि त्या गोंधळामुळे लाखो शेतकरी जैविक शेतीच्या नावाखाली ढोरमेहनत करत आहेत. लगेच मत बनवू नका व तुमच्या मतांना छेद गेला म्हणून न चुकता हा पूर्ण लेख वाचा.
शेतीचा आत्मा सेंद्रिय कर्ब
शेतीचा आत्मा सेंद्रिय कर्ब आहे हे मी 2016 च्या ऍग्रोवन वर्तमानपत्रात वाचले तेव्हा पासून त्याचा खोलवर अभ्यास करतोय. जिवाणू तेव्हाच उत्पन्न होतात व वाढतात जेव्हा त्यांना अन्न असते आणि अन्नआहे ऑरगॅनिक कार्बन किंवा ह्युमस. आता हेच पहा ना….तुम्हाला मुंग्या गोळा करायच्या असतील तर तुम्ही काय कराल? त्यांना शोधत बसाल की साखर टाकला अगदी त्याप्रमाणे जिवाणूंचे अन्न वाढवा जमिनीत ते आपोआप येतील. आजपर्यंत जे जिवाणू स्लरीचा प्रसार-प्रचार करत आहे. त्यांनी याचा अभ्यास करायला हवा की आपल्या पूर्वजांनी कुठे असला उल्लेख केलेला आहे की एखाद्या शास्त्रज्ञांनी याचे संशोधन केलेले आहे.
लक्षात घ्या शेतकरी टेन्शन मुक्त झाले तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल व योग्य-अयोग्य समजून घेण्याची क्षमता वाढेल अर्थात विचारसरणी! गांडूळ व जिवाणू यांचे शेतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण ते माती बाहेर तयार करून जमिनीत सोडणे म्हणजे टेस्टट्यूबबेबी जन्माला घालने होय.जेशेतकऱ्यांसाठी खूप खर्चाचे व तात्पुरता फायदा तंत्रज्ञान आहे. त्यामुळे शेतकरी औताला जुपलेल्या बैलासारखा त्यात अडकलेला असतो. मी जैविक शेती करून समाजाचे भले करतोय भोळीभाबडी कल्पना करत असतो.
मित्रहो, आपल्या आजोबा पणजोबांनी केव्हा असल्या स्लऱ्याकेल्या होत्या. खूप पौष्टिक अन्नधान्य पिकवायचे ते.. आज तूप लावून ही भाकरी जेवढी गोड लागत नाही तेवढी शिळी भाकरी लागायची. अलीकडे 1980 मध्ये फक्त 29 वर्षांपूर्वी गावागावात किती आनंद, किती समाधान, शेतकरी सर्व सण समारंभ निवांत साजरे करायचे. त्या वेळी रानावनात चालणाऱ्या देशी जनावरांच्या शेणखताच्या मदतीने हजारो वर्षे यशस्वी शेती केली. याचे शास्त्रीय कारण म्हणजे त्या राना वना च्या मातीचा सेंद्रिय कर्ब दहा टक्क्यांच्या पुढे होता आणि तिथल्या चाऱ्यातून जे शेण पडायचे त्यात पाच ते सहा टक्के सेंद्रियकर्बअसायचा पण आजची परिस्थिती पहा एकतर गावठी जनावरे बोटावर मोजावी इतकी आणि त्यांना चारा कोणता तर अशा मातीतला तिथला सेंद्रिय कर्ब 1% च्या खाली आला आहे.
सांगा त्यातून तयार होणारे शेणखत कितपत या जीवाणूचे पोषण करू शकणार आहे? तुम्हाला माहितीच आहे गरज आहे मातीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्याची पण आपण अडकलो आहोत जिवाणू वाढ करण्यामध्ये.
मित्रहो, जिवाणू संवर्धन खूप क्लिष्ट बाब आहे.जेशास्त्रज्ञ जीवाणू चा अभ्यास करतात त्यांच्या मते 25 हजार जातींचे जिवाणू आहेत. त्यातील दोनशेच्या आसपास ओळख झाली आहे. लॅबमध्ये नियंत्रित वातावरणात अनेक वेळा नको असलेले जिवाणूंची वाढ होते. तर शेतकरी शेतात ज्याप्रमाणे जीवाणूवृद्धी करतात ते कितपत सुरक्षित आहे देव जाणे. म्हणूनच आम्ही जेव्हा याबाबत अनेक प्रयोग केले त्यावरून असे स्पष्ट झाले की जर गांडूळे जमिनीत वाढले तर जिवाणू ही वेगाने वाढतात. अर्थात आपण जर जमिनीचे सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन सुधारले तर जिवाणूंची वृद्धी आपोआप होते. आज आपण अर्धवट माहितीच्या आधारे तात्पुरता उपाय करणाऱ्या संकल्पना शेतीत रुजवली आणि शेती भरकटली.
मित्रहो जिवाणू बद्दल आत्मविश्वासाने बोलणारे शेतकरी आम्हाला अजून नाही भेटले. केमिकल, जैविक व सेंद्रिय यांच्याबाबत गोंधळ असलेले शेतकरी आम्हाला रोज भेटतात. त्यांना जर विचारले की, सेंद्रिय शेती व जैविक शेतीतील फरक कोणते?एकमेकांवर अवलंबून असते की स्वतंत्र? त्यावर त्यांची कोणतीही संकल्पना स्पष्ट झालेली दिसली नाही आणि हो अनेकदा ते एक यशस्वी शेतकरी असतात. पण संभ्रमावस्था व केवळ ट्रायल वर शेती करण्याची प्रथा रूढ आहे हे दुर्दैवी म्हणायचे की सुदैव ट्रायल एड एरर काही काळासाठी ठीक असतो. पण पंचवीस तीस वर्षांनी हे योग्य नाही. शेतकऱ्यांना आत्मविश्वास देणारे तंत्र हवे अंधारात चाचपडने भविष्यासाठी घातक आहे.
लेखक
मिलिंद जे. गोदे
मो.नं.9423361185
Share your comments