अझोला हे उथळ पाण्यावर तरंगणारे नेचे वर्गीय वनस्पती आहे. सामान्यपणे अझोला तांदुळाच्या शेतात किंवा उथळ पाण्याच्या जागी उगवण्यात येते. अझोला हे दुधाळ जनावरांसाठी उत्तम खाद्य पूरक म्हणून वापरण्यात येते. अझोला हे जास्त संखेनी व वेगाने वाढणारी वनस्पती आहे. तसेच अझोला हे कमी जागेत कमी परिश्रमात जास्तीत जास्त उत्तपादन देणारी वनस्पती आहे म्हणून शेतकर्यांना हे एक उत्तम पर्यायी खाद्य म्हणून वापरता येते.
अझोलाच्या जाती : अझोलाच्या जाती खालील प्रमाणे आहेत :
1. अझोला केरोलीना
2. अझोला निलातिका
3. अझोला फ़िलिक़्युलायड
4. अझोला मेकरोफीला
5. अझोला पिन्नाटा
6. अझोला पिन्नाटा भारतात आढळणारी जात आहे.
अझोलातील पोषणमुल्य:
१) अझोला प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ल, जीवनसत्वे (विटामिन A,ब-१२ आणि बीटा carotene ) शरीरास वाढीस उपयुक्त असणारे खनिज पदार्थ जसे कॅल्शियम, Phosprus, Potasium, लोह, तांबे, माग्नेसिम यांनी परिपूर्ण आहे.
२) शुष्क वजन (Dry Weight) आधारित अझोला मध्ये २५ – ३५ % प्रथिने, १० – १५ % खनिज पदार्थ आणि ७-१० % अमिनो आम्ल असतात.
३) अझोलात उच्च प्रथिने आणि निम्न लीग्निन मात्रा असल्यामुळे जनावरास सुलभतेने पचते.
४) अझोला धन आहारात मिसळुन किंवा नुसतेच अझोला जनावरांना देऊ शकतो.अझोला मध्ये असलेल्या पौष्टिक गुणधर्म जनावरांच्या खद्याला गुणकारी व परिणामकारक बनवतो.
५) अझोला गायी – म्हशी सोबत शेळ्या- मेंढ्या, वराह व सस्याना पण दिला जाऊ शकतो.
अझोला उत्पादन :
1. अझोला तयार करण्यासाठी जमीन सपाट,व सारखी करून घ्यावी. या जमिनीत २ लांबीचा, १ रुंदीचा व २० से.मी. खोल खड्डा करावा. अझोला च्या वाढीसाठी संपूर्ण सूर्यप्रकाशाची गरज नसते त्यामुळे अझोलाचा खड्डा झाडाच्या सावलीखाली तयार करावा.तसेच या खड्डा मध्ये रिकामी वापरलेल्या जुन्या खताचे पोते (प्लास्टिकचे) टाकावे. त्यामुळे अझोलाच्या खड्यात जवळील झाडांचा शिरकाव थांबेल.
2. खाड्याच्या काठाला आयताकार स्वरूप आडव्या विटा लावाव्या, विटांनी तयार करण्यात आलेल्या आयताकारच्या मार्जीनला झाकणारी २.५ * १.५ मापाची एक पातळ युव्ही stabilised प्लास्टिक ची सीलपाव्लीन shita पुर्ण खड्डा झाकेल अशी टाकावी.
3. या सीलपाव्लीन शीट वर १० ते १५ किलो चाळून बारीक केलेली माती टाकावी. तसेच १० लिटर पाण्यात २ किलो गायीचे शेण( दोन दिवसांपूर्वीचे) व ३० ग्राम सुपर phosphate यांचे मिश्रण करून ते मातीवर टाकावे. पाण्याची पातळी १० सें मी पर्यंत पोहचेल इतके पाणी टाकावे.
4. या पाण्यात अर्धा ते एक किलो शुद्ध व ताजे अझोला clture बी पसरवून त्यावर थोडे पाणी शिंपडावे. एक ते दोन आठवड्यात ५ ते २० से.मी. जाड इतकी अझोला गादीसारखे सर्वत्र पसरते. २० ग्रम सुपर phosphate आणि सुमारे १ किलो गायीचे शेण ५ दिवसात एकदा मिसळण्यात यावे,त्यामध्ये अझोलाची लवकर वाढ होते आणि रोजची ५००ग्र म ची उपज कायम राहते.
5. अझोलाच्या वाढीसाठी खनिजांची आवश्यकता असते,त्यासाठी सुश्म पोषक द्रव्ये जसे की मग्न्यशिउम, लोह, तांबे, गंधक इत्यादी एका आठवड्यातून पाण्यात मिसळावे. तसेच ३० दिवसातुन एकदा सुमारे ५ किलो ताजी माती टाकावी त्यायोगे नायट्रोजन ची वाढ आणि सुश्म पोषकद्रव्याची कमतरता यांच्यावर उपाय होईल तसेच २५ ते ३० % पाणी दर दाहा दिवसांनी बदलावे.खड्डया मध्ये नवीन अझोला दर सहा महिन्यांनी बदलावा. जेव्हा रोग किंवा कीटक अझोलाल्या लागल्यास अझोलाचे शुद्ध कल्चरयुक्त ताजे बेड/ गादी लावावी.
Monsoon Updates: आला आला रे आला मान्सून आला ! कोकणातील मान्सूनची तारीख ठरली..!
अझोलाची काढणी करणे :
१० ते १५ दिवसात अझोलाची पुर्ण वाढ होऊन खड्डा पुर्ण भरून येतो. त्यावेळेपासुन ५०० ते ६०० ग्र म अझोलाची कापणी दररोज होऊ शकते, हे काम १५ व्या दिवसापासुन एखादया चाळणीच्या मदतीने केले जाऊ शकते.काढणी केलेला अझोला ताज्या पाण्याने धुवायला पाहिजे म्हणजे गायीचा शेणाचा वास जाईल. काढणी झल्यावर अझोलाल्या सूर्यप्रकाशात हिरवट – विटकरी होएपर्यंत सुकवावे.
अझोलाच्या वाढीसाठी आवश्यक घटक :
१) पर्यावरण, तापमान : २० से ते २८ से, प्रकाश : ५० % पूर्ण सूर्यप्रकाश
अझोलाच्या वाढीसाठी ३० सें. च्या वर तापमान वाढल्यास अझोलाची वाढ लवकर होत नाही, तसेच किटकानचा प्रादुर्भाव होतो.उन्हाळात तीव्र सूर्यप्रकाश असल्यामुळे ग्रीन हवूससाठी वापरण्यात येणाऱ्या हिरव्या जाळीचे छत म्हणुन वापरल्यास ५ ते ७ सें तापमान आपण कमी करू शकतो.त्यामुळे बाष्पीभवन कमी करण्यास मदत होते व अझोलाची वाढ चांगली होते.
२) फोस्फरस युक्त खत : अझोलाच्या लवकर वाढीसाठी फोस्फरस आवश्यक असते. फोस्फरसच्या सतत पुरवठ्यामुळे अझोलाची लवकरात लवकर वाढ होण्यास मदत होते.
अझोला आहार देण्याची पद्धत :
अझोला ढेपेमध्ये, गहू व मका भरडा किंवा नुसतेच अझोला जनावरांना देऊ शकतो. सुरवातीला कमी प्रमाणात देऊन दिवसाला २०० ते ३०० ग्रामपर्यंत जनावरांना देऊ शकतो. अझोला हे पोल्ट्री,शेळ्या – मेंढ्या,डुकरे,ससे यांनाही दिला जाऊ शकतो.
पपई फळबाग लागवड आणि व्यवस्थापन
अझोलाचे फायदे:
- 1.अझोला हे जनावरांना सहजपणे पचणारे असून याचा खाद्यात वापरामुळे दुध उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
2. अझोलाच्या पौष्टिक गुणधर्मामुळे ते जनावरांसाठी एक फायदेशीर खाद्यापूरक म्हणून वापरल्या जाते.
3. जनावरानमध्ये अझोला वापरल्यामुळे दुधाची गुणवत्ता सुधारते
4. अझोलामुळे मासल कोंबड्यामध्ये वजनात वाढ होते व अंडी देणाऱ्या कोंबड्यामध्ये अंडी देण्याचे प्रमाण वाढते
5. अझोला तयार करण्यासाठी ६ महिन्यापासून वापरण्यात आलेल्या मातीपैकी २ किलो माती हि १ किलो व्यावसायिक नत्र,स्पुरद व पलाश या खताइतकी पोषक असते.
6. अझोला चा खात म्हणून वापर करता येते . एक हेक्टर शेतात ४० ते ६० किलो अझोला खत म्हणून शेतात टाकता येते .अझोला खताच्या रुपात वापरल्यास पिकाची वाढ खूप जास्त होते.
जनावरांच्या खाद्यात अझोला कसे दिले जाते :
शेणाचा वास जाण्यासाठी अझोला स्वच्छ धुवावे. अझोला जनावरांना खाऊ घालण्याअगोदर १ चौ.सें.मी. छीद्र असलेल्या प्लास्तीच्या चाळणीतून त्यामधील अतिरिक्त पाणी गळून घ्यावे व नंतरच अझोला जनावरांना खाऊ घालावा. ताजा अझोला व्यावसायिक पशुखाद्यात एकत्र करून जनावरांना खाऊ घालावे. व्यावसायिक पशुखाद्याचे आणि अझोलाचे प्रमाण १:१ इतके पाहिजे. सुकलेल्या अझोलाची पावडर करून ते जनावरांच्या रोजच्या खाद्यात मिळवता येते.
हातात पैसे टिकत नाहीत का? मग करा 'हा' एकच उपाय; कायम राहणार खिशात पैसे
अझोला तयार करताना काळजी कशी घ्यावी
1. अझोला तयार करताना पुरेसा (५० %) सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.जास्त सूर्यप्रकाश किंवा तापमान असल्यास अझोला ला गडद विटकरी रंग येतो. तापमान अधिक असल्यामुळे अझोलाची वाढ हळू व कमी होते, म्हणून अझोला तयार करण्याची जागा एका झ्हाडाखाली शेड करून सावलीत तयार करावी.
2. अझोलाची वाढ होताना अझोलाचा ढीग किंवा थर जास्त प्रमाणात होऊ नये याची काळजी घ्यावी.थर जास्त प्रमाणात असल्यास कीटकांचा प्रादुर्भाव होतो व अझोलाच्या वाढीला नुकसान करते.
3. अझोलाच्या वाढीसाठी खड्या मधील सर्व बाजूच्या पाण्याची पातळी सारखी असावी (१० ते १२ से.मी.)
4. अझोलाची गादि किंवा बेड स्वछ ठेवावे.पाणी व माती बदलावे तसेच अझोला दर सहा महिन्याने बदलावे.
5. अझोला वर कीटक किंवा रोग लागणे सुरु झाल्यास अझोलाचे शुद्ध कल्चर युक्त असे ताजे बेड लावावे.
6. नायट्रोजनची कमतरता न होण्यासाठी ५ किलो माती ३० दिवसातून व २५ ते ३० % पाणि १० दिवसातून बदलावे तसेच ६ महिन्यातून एकदा ताजे अझोला कल्चर बदलावे.
7. जनावरांना अझोला खाऊ घालण्यापूर्वी अझोला एका जाळीत धुणे फार बरे असते, म्हणजे लहान सहान रोपटे पडून गेल्यास त्यांना पुन्हा वापरता येते.
प्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी ग्रीन हाउससाठी वापरण्यात येणारी सावलीची जाळी वापरण्यात यावी.
काही पर्यायी सूचना :
अझोलाच्या उत्पादनासाठी लागणारी जागा शेतकऱ्याकडे नसल्यास अझोला एक सिमेंटच्या टाकीत तयार करू शकतात. सिमेंटची टाकी २ x१ x०.३ मी या आकाराची असावी.त्यात ७ सें.मी.जाडीच्या मातीचा आणि शेणाचा थर टाकावेत.नंतर ५ ते ७ सें.मी. पर्यंत पाणी टाकावे व १० ते १५ ग्राम सुपर phosphate टाकावे. यामध्ये २०० ग्राम अझोला सोडावे ,१२ ते १५ दिवसानंतर २ ते २.५ किलो अझोला मिळवता येतो.शेण नसल्यास ताज्या बयोगास स्लरीचा वापर केला जाऊ शकतो .ज्या क्षेत्रात ताज्या पाण्याचा आभाव आहे ,तिथे न्हाणी घर आणि गोठ्यातील सांडपाणी हे खड्डा भरण्यासाठी वापरले जाऊ शकते.
डॉ.कल्याणी सरप
विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन)
कृषी विज्ञान केंद्र,हिवरा-गोंदिया
डॉ.व्हि.जी.अतकरे
सहयोगी प्राध्यापक,
कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर,नागपुर
डॉ. कविता कडू
वरिष्ठ संशोधन सहायक
कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर,नागपुर
मोब.नं.९०९६८७०५५०
Share your comments