केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. मात्र आता कृषी विभागानेही (Agriculture Department) शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे.
शेतकरी (farmers) मित्रांनो शेतीच्या क्षेत्रातील तुमचे कार्य अतिउल्लेखनीय असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून पुरस्कार मिळू शकतो. दरवर्षी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविले जाते.
यावर्षी देखील कृषी विभागाकडून हे पुरस्कार देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. कृषी पुरस्कारासाठीचा (Agriculture Award) तुम्हाला परीपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात 20 ऑगस्टपर्यंत सादर करावा लागेल, असे सांगण्यात येत आहे.
Heavy Rain: शेतकऱ्यांनो पावसापासून पिकांना वाचवण्यासाठी 'या' महत्त्वाच्या गोष्टी करा; होईल फायदा
या पुरस्कारांचं वितरण
1) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (Krishi Ratna Award) 75 हजार रुपये
2) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक यासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये
3) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक यसाठी 50 हजार रुपये
4) कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक यासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये
5) युवा शेतकरी पुरस्कार, आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक यासाठी प्रत्येकी 30 हजार रुपये
6) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक यासाठी प्रत्येकी 30 हजार रुपये
7) उद्यान पंडीत पुरस्कार आठ कृषी विभागांतून प्रत्येकी एक यासाठी प्रत्येकी 25 हजार रुपये
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात अडचणी येत आहेत? करा फक्त एकच काम..
सर्वसाधारण गटासाठी प्रती जिल्हा याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रती विभाग 1 याप्रमाणे 6 असे एकूण 40 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (Farmers Award) देण्यात येतील, यासाठी प्रत्येकी 11 हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
तसेच आठ कृषी विभागातून प्रत्येकी 1 अधिकारी आणि कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरुन एक असे एकूण 9 पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
Poultry Business! शेतकऱ्यांनो कुक्कुटपालनासाठी मिळणार 33 कोटीपेक्षा जास्त अनुदान; होईल फायदा
Mineral Mixture: दुधाळ जनावरांना द्या खनिज मिश्रण; दुधाच्या उत्पादनात होईल वाढ
Goat Rearing: शेळी पालनातून शेतकरी होतील करोडपती; फक्त अशी करा शेळयांची निवड
Share your comments