1. कृषीपीडिया

सावधान : सोयाबीन आणि कपाशी पिकांवर वाढतोय किडींचा प्रकोप! शेतकरी हवालदिल

महाराष्ट्र सोयाबीन आणि कपाशी लागवडीत अख्ख्या भारतात एक महत्वाचे योगदान देतो पण ह्यावर्षी सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे याचे कारण असे की महाराष्ट्रातील एकट्या अकोला जिल्यात खुप मोठ्या प्रमाणात किडिंचा हाहाकार माजलाय, अकोला आणि आजूबाजूच्या परिसरात सोयाबीन आणि कपाशी पिकावरील रोगानी पार थैमान घातलाय.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
soyabion crop

soyabion crop

महाराष्ट्र सोयाबीन आणि कपाशी लागवडीत अख्ख्या भारतात एक महत्वाचे योगदान देतो पण ह्यावर्षी सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे याचे कारण असे की महाराष्ट्रातील एकट्या अकोला जिल्यात खुप मोठ्या प्रमाणात किडिंचा हाहाकार माजलाय, अकोला आणि आजूबाजूच्या परिसरात सोयाबीन आणि कपाशी पिकावरील रोगानी पार थैमान घातलाय.

अनेक भागात सोयाबीन पिकात करपा रोगाचे संक्रमण बघावयास मिळत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांकडून जास्तीच्या उत्पादनाची आशा असते. खुप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी कपाशी सोबतच सोयाबीन लागवडीला प्राधान्य देतात आणि कदाचित हेच कारण आहे की गेल्या काही वर्षात सोयाबीनची लागवड खुप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे. परंतु करपा रोग जणू काही एवढ्या मोठ्या सोयाबीन लागवडीला आमवाशाचे ग्रहणच लावतोय.करपा रोगात सोयाबीनची पाने पिवळी पडतात आणि गळू लागतात.

वरुण राजाने पाठ फिरवताच सोयाबीन रागावला!

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी खरीप हंगामात दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली.  दरम्यान, काही दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन पिकांचेही नुकसान झाले. जेव्हा सोयाबीनची पिके चांगली फुलली होती, नेमका तेव्हाच बराच काळ पाऊस पडला नव्हता. यामुळे सोयाबीन पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 यावर बळीराजा काय म्हणतोय?

महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की किडिंच्या आक्रमनामुळं बऱ्याच पिकाचे नुकसान होत आहे. विदर्भ दरवर्षी असतो त्यापेक्षा जास्तीचा दुष्काळाचा सामना करतोय, या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, आणि म्हणुनच यंदा सोयाबीन उत्पादनात 25 टक्के घट होण्याची शक्यता आहे.

 

 

त्याचप्रमाणे अनेक भागात कपाशीच्या पिकांवर अळी आणि लाल्या रोगाचा प्रकोप दिसून येत आहे. लाल्या रोगामुळे पिकाची पाने लाल होतात. ज्यामुळे वनस्पती स्वतःच सुकू लागते. एकदा चांगला पाऊस झाला की पिकांना किडिंपासून दिलासा मिळू शकतो. कपाशीच्या पिकांवर अळी आणि लाल्या रोगाचा संसर्ग रोखला नाही तर कापसाचे उत्पादनही कमी होऊ शकते.

 महाराष्ट्राच्या विविध भागात सोयाबीनची लागवड

यावर्षी एकट्या अकोला तालुक्यात 49,914 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली आहे.  

 

 

 

त्याचप्रमाणे अकोटमध्ये 10,575 हेक्टर, तेल्हारामध्ये 12,505, बाळापूरमध्ये 19,210, पातूरमध्ये 27,540, बार्शीटाकळीमध्ये 34,928 आणि मूर्तिजापूर तालुक्यामध्ये 38,038 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. सध्या शेतकरी सोयाबीन पिकावर विविध कीटकनाशके फवारण्यात गुंतले आहेत, जेणेकरून या किडिंचा व रोगांचा वाढता प्रादुर्भाव काही अंशी का होईना कमी होईल.

English Summary: attack on cotton and soyabion crop insect in maharashtra Published on: 09 September 2021, 12:28 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters