1. कृषीपीडिया

अटल बांबू समृद्धी योजना, देईल बांबू लागवडीला चालना

bamboo cultivation

bamboo cultivation

शेतकऱ्यांचे आर्थिक सुधारणा करण्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. शेतीमध्ये विविध प्रयोग सरकारकडून करण्यात आले आहेत. बांबू शेतीतून अधिक लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बांबू शेती साठी सरकार अनुदानही देते. सरकारने अटल बांबू समृद्धी योजना लागू केली आहे. निरनिराळे हवामानाची व पर्यावरणाशी जुळवून घेऊन वाढणाऱ्या जवळजवळ एक हजार 400 बांबूच्या जाती आहेत. बांबू हे अतिशय जलद गतीने वाढणारे झाड आहे. बांबूच्या काही जातींची दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंत वाढ होऊ शकते.

 

 चीन व रशियाच्या इतर भागात वाढणारी मोसो ही बांबूची जात व त्यापासून अन्य  उत्पादन घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. बांबूच्या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापर सुद्धा कमी होतो. बांबूची आशियामध्ये उत्पादन गेल्या वीस वर्षात झपाट्याने वाढले  आहे. महाराष्ट्रात मानवेल,कटांग काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू,चिवळीयाप्रजातीचे बांबू आढळतात. बांबूची लागवड केल्यापासून सुमारे पाच वर्षानंतर त्याचे उत्पन्न मिळाले लागते. त्यानंतर सुमारे साडेचार लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्रति महिना मिळू शकते.बांबूचा उपयोग हा हस्तकला, शेती फर्निचर,खाद्य, बांधकाम,विविध वस्तू,वाद्य निर्मिती, कागद उद्योग या उद्योगांमध्ये बांबूचा उपयोग होतो. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून टिशू कल्चर बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते.

 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन  त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळणार आहे.दरम्यान महाराष्ट्र सरकार टिशू कल्चर बांबू रोपे उपलब्ध करून देते. विशेष म्हणजे टिशू कल्चर बांबू सवलतीच्या दरात सरकार देते. यासाठी सरकारने अटल बांबू समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी तुम्ही महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या साइटवर जाऊन बांबू शेती साठी असलेले अनुदानाची माहिती आणि अर्ज करू शकता. या योजनेची उद्दिष्टे शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला जोड देण्यासाठी शेतजमिनीवरील बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढवणे, बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांची उपजीविकेचे साधन निर्माण करणे  इत्यादी या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 बांबू लागवडीचे फायदे

 बांबू प्रजातीचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटा मध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होत असतात.

 पाणी साचलेल्या जमिनीवर, शार युक्त जमीन तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड केली जाऊ शकते. इतर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर 30 ते 40 टक्के कमी खर्च येतो. पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे बांबू सोडून तिसऱ्या वर्षानंतर बांबू करता येत असल्याने शाश्वत उत्पन्न मिळू शकते.

 बांबू विक्रीसाठी बाजारपेठ

महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमाच्या प्रयत्नातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल.टिशू कल्चर बांबू रोपांचा दर अंदाजे 25 रुपये प्रति रोप आहे. बांबू रोपे अगोदर खरेदी करून त्यांचे शेत जमिनीवर लागवड करतील.शेतजमिनीवर केलेल्या बांबू लागवड तपासणीनंतर बांबू रोपांच्या किमती पैकीचार हेक्‍टर किंवा त्या खालील शेती असलेल्या भूधारकांना 80 टक्के तर चार हेक्‍टरपेक्षा अधिक शेती असलेल्या भूधारकांना 50 टक्के सवलतीच्या दराने त्यांच्या बँक खात्यात सबसिडी जमा करण्यात येते.

 शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराने बांबू रोपे मिळवण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात खालील कागदपत्रांसह अर्ज करावा.

  • शेतीचा सातबारा उतारा
  • गाव नमुना आठ, गाव नकाशा ची प्रत
  • ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपंचायत कडून रहिवाशी असल्याबाबतचा दाखला.
  • बांबू लागवड करावयाच्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू रोपे लहान असताना डुकरा पासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक कंपनीचे सोय असल्या बाबतचे हमीपत्र
  • आधार कार्डची प्रत, बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत, कोरा धनादेशचीछायांकित प्रत
  • अर्जदार शेतकर्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक राहील त्याकरिता त्यांनी बँकेला दिलेल्या पत्रांची व बँकेकडून मिळालेल्या पोहोच पावती ची प्रत
  • शेतामध्ये विहीर, शेततळे, बोरवेल असल्याबाबतचे विहित प्रपत्रात हमीपत्र, बांबू रोपांची निगा राखणे, संरक्षण करण्यासंदर्भात विहित प्रपत्रात हमीपत्र
  • बंधपत्र जिओ टॅग जीआयएस द्वारे फोटो पाठवणे बाबत हमीपत्र. ज्या शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवड करायचे आहे एक शेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शवणे.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters