केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे परंपरागत शेती व्यतिरिक्त आधुनिक पिके व तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेती करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाज्या व औषधी वनस्पतीची लागवड इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये औषधी वनस्पतींची लागवड केली तर याच्या लागवडीचा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे.
याशिवाय औषधी वनस्पतींचे उत्पादन कमी असल्याने त्यांची मागणी नेहमीच चांगली राहते. त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळतो. या लेखात आपण शतावरी औषधी वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत.
शतावरी विषयी माहिती
शतावरीला आयुर्वेदातील एक महत्त्वाची वनस्पती मानली जाते. शतावरी मधील असलेले गुणधर्म बऱ्याच रोगांचे निदान करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कृषी तज्ञांचे म्हणणे आहे की, हिमालय प्रदेश या व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंका येथे मुख्यत्वे शतावरीची लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या मते एका बिघामध्ये चार क्विंटल कोरडी शतावरी मिळते. जी ची किंमत सुमारे 40 हजार आहे. शतावरी ही अनेक शाखा असणारी वनस्पती आहे. हे दोन मीटर पर्यंत लांब असते आणि मुळे हे गुच्छा प्रमाणे असतात. शतावरी चे पीक तयार झाल्यावरच मुळे विकली जातात. शतावरीची मुळे गुणवत्तेत समृद्ध असतात आणि आयुर्वेदिक औषधांसह व इतर उत्पादनांमध्ये देखील वापरली जा
शतावरीची लागवड कशी केली जाते?
शतावरी रोपाची लागवड भाताप्रमाणेच केली जाते.म्हणजेच रोपवाटिकेत रोपे तयार केली जातात आणि नंतर तयार केलेल्या शेतात लागवड केली जाते. नर्सरी तयार करण्यासाठी एक मीटर रुंद आणि दहा मीटर लांब क्यारीतयार केली जाते. क्यारिमधूनदगडगोटे काढून टाकले जातात. शतावरी बियाणे 60 ते 70 टक्के अंकुरित असते. एक हेक्टर शेतात सुमारे बारा किलो शतावरी बियाणे पेरले जाते. बियाणे क्यारीमध्ये 15 सेंटीमीटर खाली पेरले जाते आणि वरून मातीने हलकेच झाकले जाते.
दोन महिन्यानंतर शतावरी ची रोपे लावणीसाठी तयार होतात.शतावरी ची लागवड करण्यासाठी सरी तयार केली जाते.यामध्येसमान अंतरावर रोपे लावली जातात. नाली मध्ये लागवड केल्यामुळे रोपे वेगाने वाढतात. शतावरी ही मूळ असलेली वनस्पती आहे.
त्यामुळे शेतात पाण्याचा निचरा करण्याची यंत्रणा असावी आणि पावसाचे पाणी शेतात साठवले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
शतावरीची पावडर बनवून विकल्यास अधिक नफा
लावणीनंतर बारा ते चौदा महिन्यानंतर मुळे परिपक्व होण्यास सुरुवात होते. एका वनस्पती पासून सुमारे पाचशे ते सहाशे ग्रॅम मुळे मिळू शकतात. एका हेक्टर मधून सरासरी बारा हजार ते चौदा हजार किलो ताजी मुळे मिळू शकतात. ही सुकल्यानंतर शेतकऱ्यांना एक हजार ते बाराशे किलोग्रॅम मुळे मिळतात. शेतकरी थेट बाजारात विकू शकतात. जर आपल्याला अधिक नफा कमवायचा असेल तर मुळांची पावडर करून विकता येते.
Share your comments