रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचे पीक म्हणजे गहू हे होय. भारतामध्ये बहुसंख्य राज्यात रब्बी हंगामात गहू ची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते.योग्य व्यवस्थापन आणि नियोजन आणि गव्हाचे चांगले उत्पादन घेता येते.इतर पिकांप्रमाणेच गव्हावर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो.
यावर आपण जर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तरमोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.त्यामुळे त्यांचे वेळीच व्यवस्थापन करणे फार गरजेचे आहे.या लेखात आपण गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या महत्त्वाच्या किडिंची माहिती घेणार आहोत.
गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे
- मावा-ही कीड ढगाळ हवामान, रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानातील मोठा फरक या प्रमुख कारणांमुळे गहू पिकावर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो. दिवसाचे तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान आठ ते दहा अंश सेल्सिअस ह्या किडीच्या वाढीसाठी पोषक असते.
या किडीची ओळख
ही कीड साधारणपणे दोन ते तीन मीमी लांबीची, तिखट पिवळसर,काळपट, हिरवट रंगाचे असते. या किडीच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस दोन नलिका सारखे अवयव असतात.
या किडीचा प्रादुर्भाव
एचडी चे पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागील बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहाने एकवटलेले दिसून येतातव त्यातील पेशी रस शोषून घेतात. त्यामुळे गहू पिकाचे पाने पिवळसरव रोगट होतात. तसेच हि किड मधाप्रमाणे गोड चिकट द्रव विष्टेद्वारे पानांवर,खोडावरव गव्हाच्या कोवळ्या शेंड्यावर टाकते.त्यावर काळी बुरशी वाढून पानाची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते.परिणामी गव्हाची रोपे किंवा झाडे मरतात आणि पीक उत्पादनात मोठी घट येते.
उपायोजना
मावा किडीने आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे साधारणपणे दहा मावा कीड प्रति झाड किंवा फुटवा गाठल्यानंतरच कीडनियंत्रणासाठी च्या उपाययोजना हाती घ्यावेत.
नियंत्रण
थायमेथॉक्झाम (25 डब्ल्यू जी) एक ग्रॅम किंवा ऍसिटॅम्परीड 5 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
- तुडतुडे- या किडीचा प्रादुर्भाव गहू पिकावर यापूर्वी दिसून येत नव्हता. परंतु आता रोपावस्थेत पासून वाढीच्या अवस्थे दरम्यान काही प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तुडतुडे हे कीटक तीन ते चार मीमी लांब,पाचरीच्या आकाराचे हिरवट राखाडी रंगाचे असतातआणि हे गव्हाच्या पानांवर दोन्ही बाजूस तिरकस चालताना आढळून येतात.
प्रादुर्भाव
तुडतुडे किडीचे पिल्ले आणि प्रौढ पानांतील अन्नरस शोषून घेतात.त्यामुळे पानांचे शेंडे पिवळे पडतात व रोपांची वाढ खुंटते.
नियंत्रण
डायमिथोएट(30ईसी) 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. पिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. त्यामुळे तुडतुड्यांचा नियंत्रणासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज नाही.
Share your comments