शेतकऱ्यांना आता परंपरागत शेती आणि परंपरागत पिके घेणे बंद केले असून आता शेतकरी आधुनिक पिकांकडे वळत आहे.बरेच शेतकरी आता वेगवेगळ्या प्रकारचे पिके तसेच विदेशी भाजीपाला,ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी सारखे फळांची लागवड करू लागला आहे.
फुल शेती मध्ये देखील शेतकऱ्यांचा ओढा दिसून येत असून बरेच शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची लागवड करून चांगला नफा मिळवत आहेत. जर तुम्हाला फुल शेती करायचे असेल तर या लेखात आपण एका वेगळ्या फुलाच्या प्रकाराची माहिती घेऊ.
अँथरियम फुल लागवड
हे फूल मूळचे हॉलंडमधील असून हे अत्यंत आकर्षक असे फुल आहे. या फुलाची लागवड पुणे येथील तीन चार शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने केली आहे.
अँथेरियम हे फूल विविध प्रकारच्या सात रंगांमध्ये आहे. या फुलाच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते, त्यामुळे सामान्य शेतकरी या फुलाच्या उत्पादनाकडे फारसा वळताना दिसत नाही.
नक्की वाचा:या' टिप्स वापरुन कमी खर्चात बटाट्याचे उत्पादन घ्या आणि मिळवा अधिक नफा, वाचा सविस्तर
परंतु या शेतकऱ्यांनी या फुलाची लागवड करण्याचे धाडस केले आहे. हे फूल जवळजवळ सात रंगांमध्ये उपलब्ध असून या फुलाचा वापर मुख्यतः मोठे हॉटेल्स, कार्पोरेट तसेच मोठे मोठे डेकोरेटर्स वापरतात.
सामान्य नागरिक या फुलांची खरेदी करत नाहीत. या फुलांची किंमत तीस रुपये इतकी असते तर किरकोळ बाजारपेठेत हे फूल 50 ते 60 रुपयांपर्यंत विकले जाते.
या फुलांची लागवड करताना ती टिशू कल्चर प्लांट असल्यामुळे हॉलांड वरून आयात करावी लागतात. तसेच याची लागवड करताना मातीचा वापर न करता रॉक ऊल आर्टिफिशल वापरले जाते.
या फुलाची एकदा लागवड केल्यानंतर ते झाड वर्षाला साधारणपणे आठ फुले देते. लागवडीनंतर सहा ते सात महिने छोटी फुले येतात मात्र वर्षभरानंतर ती विक्रीयोग्य होतात.
या शेतकऱ्याने 47 गुंठ्यांमध्ये या फुलाची लागवड केली असून तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च केला आहे. या फुलाचे जवळ जवळ तीन प्रकल्प पुणे जिल्ह्यात असून हे फुल झाडावर तोडल्यानंतर साधारणपणे 18 ते 20 दिवस टिकते.
त्यामुळे त्याची विक्री होईपर्यंत शीतगृहात ठेवण्याची गरज भासत नाही. हे फूल महाग असल्यामुळे त्याला ठराविक ठिकाणांहून मागणी असते. किरकोळ बाजारपेठेत हे फूल 50 ते 60 रुपयांपर्यंत विकले जाते. ठराविक लोक या फुलाचे मागणी करतात त्यामुळे त्याला उत्तम दर देखील मिळतो.
नक्की वाचा:50 हजारात घ्या 'या' पावरफुल सेकंड हँड बाईक्स, मिळतील या ठिकाणी, वाचा सविस्तर माहिती
Share your comments