पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी राज्यात यावर्षी सुमारे ५ लाखांवर ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुधाळ गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालनासाठी अर्ज आल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे सांगण्यात आले. तर या विविध योजनांसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी राज्य स्तरावर खुल्या गटासाठी आणि जिल्हा परिषद स्तरावर अनुसूचित जाती जमांतीसाठी योजना राबविण्यात येतात.
या योजनांसाठी १८ डिसेंबरअखेर अर्ज मागविण्याची अंतिम मुदत होती. यानुसार दुधाळ गायी म्हशींसाठी १ लाख ४० हजार ९२, शेळी मेंढी गटासाठी १ लाख ४० हजार ८९२ आणि कुक्कुटपक्षी वाटपासाठी ५२ हजार अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांनी पशुधनाची खरेदी जिल्हास्तरीय समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
यानंतर खरेदीच्या पावत्या ऑनलाइन सादर केल्यानंतर ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान
लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार असल्याचे आयुक्तायलाद्वारे सांगण्यात आले.
पाच वर्ष अर्ज कायम राहणार : या वर्षी योजनेचा निधी संपला की, अर्जदाराला पुन्हा अर्ज करावा लागणार नाही. या अर्ज पुढील वर्षीच्या प्रतीक्षा यादीत कायम राहणार आहे. त्यामुळे दरवर्षी नव्याने अर्ज करण्याची गरज नसल्याचे
यामुळे सर्व अर्जदारांना पाच वर्षात योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
यामध्ये प्रामुख्याने दुधाळ गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालनासाठी अर्ज आल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे सांगण्यात आले.
Share your comments