1. कृषीपीडिया

लसणाचे सर्वोत्तम वाण; आहेत ऑक्टोबर मध्ये लागवड करण्यासाठी फायदेशीर

garlic species

garlic species

 लसणाची लागवड करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा उपयुक्त असतो. लसूण लागवडीसाठी जास्त उष्ण हवामान नको असते. तसेच जास्त थंडी लसणाला अपायकारक ठरत असते.लसूण लागवडीसाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात केलेल्या लसणाच्या लागवडीमुळे लसनाचे कंद जोमदार उगवतात. असेच काही भरघोस उत्पन्न देणाऱ्या लसणाच्या विविध वाण विषयीची माहिती आपण आज या लेखात करूनघेऊ.

 लसणाची विविध वाण

  • टाईप56-4:

ही लसणाची  जात पंजाब कृषि विश्वविद्यालय यांनी विकसित केले आहे. या जातीच्या लसणाच्या गाठी छोट्या आकाराच्या असतात व रंगाने  सफेद असतात.एका लसणामध्ये 25 ते 34 पाकळ्या असतात.या जातीचे उत्पादन हेक्‍टरी कमीत कमी दीडशे ते दोनशे क्विंटल पर्यंत मिळते.

2-को.2:

 ही जात तामिळनाडू कृषी विश्वविद्यालयाने विकसित केली आहे.या जातीचा लसूण हा सफेद रंगाचा असतो आणि या जातीच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पादनमिळते.

-आईसी-49381:

भारतीय कृषी संशोधन संस्थेने ही जात विकसित केली आहे. या जातीचे लसुन 160 ते 180 दिवसात तयार होते. या जातीमुळे ही शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते.

4- सोलन:

 हिमाचल प्रदेश कृषि विश्वविद्यालयने ही जात विकसित केली आहे.या जातीचा लसूण  रुंदी व लांबी नेबर्‍यापैकी मोठा असतो.लसणाचा रंग हा गडद असतो. या लसणाच्या प्रत्येक गाठीमध्ये चार पाकळ्या येतात व त्यांचा आकार तुलनेने मोठा असतो. या जातीच्या लागवडीमुळे लसणाच्या अधिक उत्पन्न मिळते.

5- ॲग्री फाउंड व्हाईट (41 जी ):

या जातीचा लसूण 150 ते 160 दिवसांत तयार होतो.फॅक्टरी 130 ते 140 क्विंटल उत्पादन मिळते.या वाणाची बहुतांशी गुजरात,महाराष्ट्र,मध्य प्रदेश,कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये लागवड केली जाते.

6-

यमुना(1 जी ) सफेद:

तिचा संपूर्ण भारतात लागवडीसाठी वापरली जाते. अखिल भारतीय भाजीपाला सुधार परियोजना द्वारे या वानाला पारित करण्यात आले. या जातीचा लसुन 150 ते 160 दिवसांत तयार होतो. प्रति हेक्टरी उत्पन्न 150 ते 175 क्विंटलपर्यंत येते.

7- जी 282:

हा लसुन सफेद आणि मोठ्या आकाराचा असतो. कमीत कमी 140 ते 150 दिवसांत तयार होतो. उत्पन्न हेक्‍टरी 175 200 क्विंटलपर्यंत येते.

 

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters