जर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. आपण अमूल फ्रँचायझी विषयी जाणून घेणार आहोत, या व्यवसायात कमी गुंतवणूक असून उत्पन चांगले आहे. अमूल फ्रँचायझी घेणे फायदेशीर आहे कारण यामध्ये नुकसान होण्याचे प्रमाण खूप कमी आहे.
अमुल फ्रँचायझी घेण्यासाठी खर्च जास्त नसून आपण अगदी एक ते दीड लाख रुपये गुंतवणूक करून हा व्यवसाय करू शकता. यामधून तुम्हाला चांगला नफा मिळेल. मासिक अंदाजित ५ ते १० लाख रुपयापर्यंत तुमची विक्री होऊ शकते हे तुम्ही चालू केलेल्या जागेवरही अवलंबून आहे.
अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायझी देत यामध्ये अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्क आणि दुसर अमूल आईसस्क्रीम स्कूपिंग पार्लर पाहिल्यासाठी अंदाजित २ लाख रुपये खर्च येईल तर दुसऱ्यासाठी ५ लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. काही वस्तू परत करता येत नाहीत म्हणून २५ हजारापर्यंत सुरक्षा रक्कम द्यावी लागेल.
अमूल आउटलेट घेतल्यास अमुलकडून तुम्हाला एमआरपी नुसार कमिशन दिले जाते तर दुधाच्या पिशवीवर २.५ टक्के तर दुध उत्पादनावर १० टक्के कमिशन मिळते. आईसस्क्रीमवर २० टक्के कमिशन मिळते त्याचबरोबर काही उत्पादनावर ५० टक्के कमिशन मिळते.
अमूल दुकान टाकण्यासाठी तुम्हाला १५० चौरस फुट जागेची आवश्यकता लागेल. तर अमूल पार्लर साठी तुम्हाला ३०० चौरस फुट जागा लागेल. हा व्यवसाय तुम्ही शहरी भाग व ग्रामीण भागातील बाजारपेठेच्या ठिकाणी करू शकता. व चागले उत्पन मिळवू शकता. हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला कंपनीला इमेल करावा लागेल किंवा तुम्ही त्यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या
शेतकरी संकटात : आंबा फळबागांचे मोठे नुकसान, शेतकऱ्याची मदतीची मागणी
शेतकऱ्यांना बियाणे आणि खते कमी पडणार नाहीत : कृषीमंत्री दादाजी भुसे
Share your comments