1. कृषीपीडिया

कीटकांची आश्चर्यकारक दुनिया: कीटकांचे नाक.

माणूस हा नाक खुपसण्यात आणि नाक मुरडण्यात खूप माहिर असतो. ही वृती आणि प्रवृती आपणास पदोपदी पाहावयास आणि अनुभवयास मिळते. मात्र जीवसृष्टि मध्ये ज्यांच्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त म्हणजे दहा लाख आहे. अशा कीटकांना ही वृती आणि प्रवृती मात्र जोपासणे जमत नाही.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
कीटकांची आश्चर्यकारक दुनिया: कीटकांचे नाक.

कीटकांची आश्चर्यकारक दुनिया: कीटकांचे नाक.

अशा कीटकांना ही वृती आणि प्रवृती मात्र जोपासणे जमत नाही. कारण ज्याप्रमाणे प्राण्यांना नाक असते तसे कीटकांमध्ये नाक या अवयवाचा अभाव असतो. कीटकांना नाकच नाही तर मग फुप्फुसे कोठून येणार आणि फुफुसे नाही तर ते प्राणवायू कसा घेणार आणि ते एकंदर कसे जगणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात शोधणार आहोत. 

कीटकांची श्वसन संस्था समजून घेण्यापूर्वी प्राण्यांची श्वसनसंस्था आपण समजून घेऊया. प्राण्यांना नाक असते आणि नाकावाटे श्वसनाच्या माध्यमातून प्राणवायू आत घेतला जातो. असा प्राणवायू फुप्फुसांमध्ये रक्तात मिसळला जातो आणि आपल्या पेशींना तो हिमोग्लोबिन मार्फत पुरवला जातो. पेशींची वाढ होण्यासाठी प्राणवायू आवश्यक असतो. जर काही कारणाने प्राणवायू शरीराला म्हणजे पेशींना मिळाला नाही तर काही वेळात प्राण्यांचा मृत्यू होतो. अशा प्रकारे कोणत्याही प्राण्यांची श्वसन संस्था ही जीवनरक्षक प्रणाली म्हणून काम करते.

कीटकांमध्ये श्वसनसंस्था ही अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीच्या पद्धतीची असते. कीटकांच्या अंगावर स्पिराकल्स म्हणजे सूक्ष्म छिद्रे असतात. त्या छिद्रांना लहान ट्यूब जोडलेल्या असतात त्यांना ट्राकीया किंवा श्वासनलिका म्हणतात. कीटक या स्पिराकल्स मार्फत प्राणवायू घेतात आणि लहान ट्यूब मार्फत हा प्राणवायू कीटकांच्या प्रत्यक्ष पेशीतिल सायटोप्लाझम मध्ये विरघळवतात. पेशीत प्राप्त झालेला प्राणवायू पेशींश्वसन साठी वापरला जाऊन तयार होणारा कार्बन डायओक्साइड पुन्हा ट्राचिया ट्यूब मार्फत स्पिराकल्सद्वारे वातावरणात सोडला जातो. काही किटकांमध्ये ट्राकीया ट्यूबच्या एअरबग्स म्हणजे पिशव्या विकसित झालेल्या दिसून असतात.

त्यात हवा साठवून गरजेप्रमाणे त्यातून प्राणवायू काही कीटक मिळवतात. याचा उपयोग किटकाला हवेत उडण्यासाठी सुद्धा काही प्रमाणात होतो. ट्राकीया ट्यूब मार्फत स्पिराकल द्वारे कीटक जो प्राणवायू मिळवतात तो प्रत्यक्ष तो रक्तात मिसळला जात असल्याने कीटकांच्या रक्तात प्राण्यामध्ये आढळणारा आणि प्राणवायूचे वहन करणारा हिमोग्लोबिन हा घटक आढळून येत नाही.   हिमोग्लोबिन नसल्याने कीटकांचे रक्त लाल रंगाचे नसते तर ते रंगहीन, फिक्कट पिवळे किंवा फिक्कट हिरवे असते.

 घरात अन्न शिजत असेल आणि त्याचा खमंग वास असो किंवा रस्त्याच्या कडेला अनेक दिवस साठलेल्या कचर्याजची दुर्गंधी असो हा वास आपल्याला आपल्या नाकात असलेल्या घांनांद्रिये चेतापेशी मुळे कळतो. मात्र नाकच नाही तर मग कीटक वास कसा घेणार असा प्रश्न आपल्याला पडला असेल. कीटकांना गूळ, साखर, उघडे अन्न याचे कसे आकलन होते, हे आपण समजून घेवूया. कीटकांच्या डोक्यावर अँटेनाची एक जोडी असते त्याला आपण कधी कधी किटकाच्या मिश्या असेही म्हणतो. या अँटेनाच्या वापर करून कीटक वास घेतात आणि त्याप्रमाणे आपला पुढील प्रवास आणि दिशा निश्चित करतात. परंतु कीटक केवळ वास घेण्यासाठीच त्यांच्या अँटेनाचा वापर करत नाहीत. एखाद्या वस्तूचा पृष्ठभाग जाणवण्यासाठी, गरम आणि थंड जाणण्यासाठी, आवाज ऐकण्यासाठी किंवा हवा किंवा वाऱ्याची हालचाल शोधण्यासाठी ते त्यांचा वापर करू शकतात.‎

कीटकाच्या अँटेना मध्ये विशेष संवेदी पेशी असतात त्यांना ओलफेक्टरी सेनसीला असे म्हणतात. ज्यावेळेस पदार्थाचे रेणु हवेत येतात आणि त्यांचा संबंध हा अँटेना मधील संवेदी पेशी सोबत येतो. या सेन्सिला मार्फत त्या वासाचा अर्थ लावून संदेश मेंदूला पोहचवला जातो आणि किटकाचा प्रवास पदार्थाच्या दिशेने सुरू होतो. दोन अँटेना असल्याने पदार्थ नक्की कोणत्या दिशेला आहे हे किटकाला समजते. कीटक हे अत्यंत सूक्ष्म असा वास ओळखू शकतात की जे आपल्याला कदापि शक्य होत नाही. 

अशा प्रकारे नाक नसलेला कीटक हा कोणत्याही हवामानात आणि वातावरणात बाह्य श्वसन करून आणि आपल्या दोन अँटेना द्वारे सूक्ष्म अशा वासाचे आकलन करून आपले अन्न शोधतो आणि आपले जीवनचक्र पूर्ण करतो.

 

राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी 

९९७०२४६४१७

प्रतिनिधि - गोपाल उगले

English Summary: Amazing world of insects: Insect noses Published on: 08 December 2021, 07:34 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters