बदाम हा सगळ्यांना माहिती आहे. जर आपण बदाम लागवडीचा विचार केला तर प्रामुख्याने कोकण किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात बदाम लागवड केली जाते. जर आपण बाजारपेठेत असलेल्या मागणीचा विचार केला तर कायम मागणी असलेले हे पीक आहे. तर शेतकर्यांच्या दृष्टीने विचार केला तर बदामाचे उत्पादन हातात आल्यानंतर ते विकायला देखील जास्त वेळ लागत नाही
व त्यासोबत याचा साठवण कालावधी 240 दिवसांचा असल्याने शेतकर्यांना बदाम साठवायला देखील कुठल्याही प्रकारची समस्या येत नाही. या लेखात आपण बदाम लागवड विषयी माहिती घेऊ.
बदामाच्या काही लागवडीयोग्य जाती
बदामाच्या सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या काही प्रजाती असून यामध्ये नॉन पॅरील, कार्मिल,थॉम्प्सन, प्राईज, शालिमार, वारीस, मखदूम, सोनोरा, प्लस अल्ट्रा, कॅलिफोर्निया पेपर शेल इत्यादी जाती महत्त्वाचे आहे.
नक्की वाचा:Agri Bussiness:शेतीसोबत 'हा' व्यवसाय करा आणि कमवा महिन्यासाठी लाखो रुपये
बदाम लागवडीसाठी आवश्यक गोष्टी
1- माती- तुम्हाला ज्या जमिनीत लागवड करायचे आहे त्या ठिकाणची जमीन सपाट, चिकन माती असलेली व खोल सुपीक माती असलेली असावी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था असावी. लागवडीआधी शेत चांगले तयार करून घ्यावे. त्यासाठी नांगरणी करून तीन ते चार वेळा चांगली मशागत करावी.
2- बदाम लागवडीची पद्धत- बदाम लागवड करण्याअगोदर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये तीन बाय तीन बाय तीन फूट खोल खड्डे तयार करून घ्यावे. लागवड करताना दोन रोपातील अंतर 5 मीटर ओळीत ठेवावे. लागवड करताना फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत खड्ड्याच्या मध्यभागी लावावी.
3- खत व्यवस्थापन- बदामाच्या चांगली वाढ आणि उत्तम उत्पादन मिळावे यासाठी 35 ते चाळीस किलो कुजलेले शेणखत आणि दोन किलो कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड प्रति वर्ष द्यावे. स्फुरद व पालाश देताना पूर्ण स्फुरद व अर्धे पालाश एप्रिलमध्ये आणि अर्धे नत्र फेब्रुवारीमध्ये व उर्वरित एप्रिलमध्ये द्यावे.
4- पाणी व्यवस्थापन- लहान बदामाच्या झाडांना उन्हाळ्यात दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व यामध्ये पाणी व्यवस्थापन करताना 23 ते 25 दिवसांच्या अंतराने जरी दिले तरी चालते.
उंच सखल भाग असेल तर ठिबक पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. चांगल्या फळधारणेसाठी उन्हाळ्यामध्ये नियोजनबद्ध पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक असून यामुळे फळगळीची समस्या निर्माण होत नाही.
5- तण नियंत्रण- बदामाची बाग तणमुक्त ठेवण्यासाठी वेळोवेळी खुरपणी करून घ्यावी. पहिली खुरपणी साधारणतः लागवड केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी करावी व दुसरी 25 ते 35 दिवसांच्या अंतराने करावी. शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात राहिला तर दोन ते तीन वेळा खुरपण्या करणे गरजेचे आहे.
6- मिळणारे उत्पादन- बदामाची लागवड केल्यापासून विचार केला तर तिसऱ्या वर्षापासून फळ मिळण्यास सुरुवात होते. बदाम चांगला फुलल्यानंतर सात ते आठ महिन्यांनी काढता येतात. बदामाचे तोडणी केल्यानंतर त्यांना सावलीमध्ये चांगल्या पद्धतीने वाळवावेत व त्यानंतर बदाम वेगळे करावे.
परंतु बदामा पासून चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर सहा वर्ष झाल्यानंतर बदामाचे झाड फळ देण्यास चांगल्या पद्धतीने सक्षम होते अशा पद्धतीने बदामाच्या एका झाडापासून पन्नास वर्ष फळे आरामात मिळू शकतात.
जर आपण बदामाचा एका झाडापासून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर प्रति वर्षप्रति झाड दोन ते अडीच किलो सुके बदाम आरामात मिळतात व याचा बाजारभावाचा विचार केला तर 600 ते हजार रुपये प्रति किलो असा दर आहे.
Share your comments