सोयाबीन हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे.जर आपण पिकांचे संशोधन किंवा विविध जाती विकसित करण्याच्या बद्दल विचार केला तर देशातील विविध कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्था यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. कृषी विद्यापीठातील किंवा कृषी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ कायम शेतकऱ्यांना फायदेशीर आणि कीड व रोगांना प्रतिकारक अशा पिकांच्या जाती विकसित करण्याचे काम करतात.
अशाच काही महत्त्वाच्या सोयाबीनच्या जाती या आयसीएआर सोयाबीन संशोधन केंद्र, इंदोर यांनी तीन जास्त उत्पादन देणाऱ्या आणि कीड व रोगांना प्रतिरोधक जाती विकसित केले आहेत. या जातींचा नक्कीच फायदा शेतकरी बंधूंना होईल. या लेखात आपण या तीनही जातींची माहिती घेऊ.
नक्की वाचा:पावसामुळे कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई; 'या' टोल फ्री नंबरवर करा कॉल
सोयाबीनच्या तीन नवीन विकसित जाती
1- एनआरसी 157- सोयाबीनची जात मध्यम कालावधीची असून लागवडीनंतर 94 दिवसांत काढणीस तयार होते. जर आपण या जातीपासून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर हेक्टरी 16.5 क्विंटल सरासरी उत्पादन मिळते.
या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही टारगेट लिफ स्पॉट,अल्टरनेरिया लिफ स्पॉट यासारख्या रोगांना थोड्या प्रमाणात प्रतिरोधक आहे. ही जात उशिरा पेरण्यासाठीसुद्धा उपयुक्त आहे. जर या जातीच्या पेरणीचा कालावधीबाबतीत शास्त्रज्ञांच्या मताचा विचार केला तर ही 20 जुलैपर्यंत पेरता येते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! कापूस उत्पादकांसाठी सेंद्रिय कापूस प्रकल्प सुरू
2- एनआरसी 131- ही सोयाबीनची जात लागवडीनंतर 93 दिवसांत काढणीस परिपक्व होते. या जाती पासून मिळणारे उत्पादन हे सरासरी 15 क्विंटल हेक्टरी मिळते.
सोयाबीनची ही जात चार्कॉल रॉट आणि टारगेट लिफ स्पॉट यासारख्या रोगांसाठी देखील बऱ्यापैकी प्रतिरोधक आहे. ही जात भारतातील पूर्वेकडील जो काही भाग आहे त्या भागासाठी विकसित करण्यात आले आहे.
3- एनआरसी 136-सोयाबीनची ही जात महत्त्वपूर्ण असून लागवडीनंतर 105 दिवसांत काढणीस तयार होते.
या जातीपासून मिळणाऱ्या सरासरी उत्पादनाचा विचार केला तर प्रति हेक्टर 17 क्विंटल उत्पादन मिळते.विशेष म्हणजे ही जात दुष्काळग्रस्त भागात पाण्याचा ताण सहन करणारी आहे.या जातीला भारताच्या मध्यवर्ती क्षेत्रासाठी मान्यता देण्यात आली असून येलो मोजॅक व्हायरस ला प्रतिरोधक जात आहे.
नक्की वाचा:मायक्रो एक्सलन्स-ESM युरोपीयन तंत्रज्ञानावर आधारीत मायक्रो ग्रॅन्युलर उत्पादन
Share your comments