जर आपण यंदाच्या खरीप हंगामाचा विचार केला तर अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यातीलच एक महत्त्वाचे पीक म्हणजे तुरअद्याप काढणीला आलेली नाही. त्यामुळे तूर उत्पादन करणारे शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात व आर्थिक फायदा मिळवू शकतात.तुरीचे उत्पादन वाढावे यासाठी कृषी तज्ञडॉ.सुरेश नेमाडे यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.शेतकऱ्यांना तुरीचे शेंडे खोडा वेत असा सल्ला नेमाडे यांनी दिलाआहे.
तुरीचे शेंडे खुडल्यानेतुरीच्या उत्पादनात वाढ होणार आहे.याबाबतीत आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेने ही अशी शिफारस केलीआहे.तुर बहारातआली की केवळ वाढ होते. त्यामुळे तुरीची शेंडे खोडल्यास फांद्या फुटतात व खोड ही मजबूत होते.जास्त असलेल्या फांद्या फुटल्या की शेंगाही मोठ्या प्रमाणात लागतात. तुरीचे केवळ उंची न वाढता झुडूपा प्रमाणे घेर वाढतो. त्यामुळे उत्पादनही वाढते.
उत्पादनात वाढ होईल दीडपटीने
तुरीची पेरणी ही दोन्ही झाडांमध्ये योग्य अंतर राहील या पद्धतीने करायला हवी.सव्वा ते दीड फुटाचे अंतर राहिल्यास योग्य वाढ होते.
.जेवढी विरळ तूर तेवढे जास्तीचे उत्पादन होते.शिवाय योग्य वेळी शेंडे खुडणी केल्यास दीड पटीने उत्पादन वाढणार आहे.तुरीची योग्य काळजी घेऊन एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन वाढते.
खुडणी अशा पद्धतीने करावी
खरीप हंगामात तुरीचे पीक घेतले जाते.उडीद,मुग त्यामध्ये आंतरपीक म्हणूनच याचा पेराहोतो. मात्र दोन्ही झाडांमध्ये दीड फुटाचे अंतर ठेवल्यास वाढही जोमात होते. शिवाय पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी पहिली शेंडा खुडणी करावेव पाणी दिल्यानंतर 60 ते 65 दिवसांनी दुसरी शेंडा खुडणी करावी. दोन ते तीन इंच असा शेंडा खुडावा.
याकरिता कोणत्या यंत्राचा वापर न करता शेतकऱ्यांनी हाताने खुडणी करावी.
खुडणी सोबत खत व्यवस्थापन
तुरीची खुडणीम्हणजे पीक बहरात असते. त्याच दरम्यान खत व्यवस्थापन करून स्फुरद अन्नद्रव्य दिल्यास फुलोरा आणि शेंगांची लागवणवाढते. जेव्हा पिक कळी अवस्थेत असते तेव्हा जमिनीत ओल असेल तर उत्पादनातही वाढ होते.( माहिती स्त्रोत-HELLO कृषी)
Share your comments