1. कृषीपीडिया

कृषी प्रदर्शने ठरताहेत आधुनिक तंत्रज्ञानाची दालने, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कसा होतो फायदा

ग्रामीण भागांमध्ये कृषी किंवा पशु प्रदर्शने आयोजित केली जातात. प्रदर्शनामध्ये एकाच छताखाली शेती किंवा पशुधनाच्या संबंधित असणारी सर्व माहिती शेतकऱ्यांना पहायला मिळते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश

आजकाल वाढती बेरोजगारी लक्षात घेता तरुणांनी शेतीकडे वळण्याची खुप गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये कृषी किंवा पशु प्रदर्शने आयोजित केली जातात. प्रदर्शनामध्ये एकाच छताखाली शेती किंवा पशुधनाच्या संबंधित असणारी सर्व माहिती शेतकऱ्यांना पहायला मिळते. कृषी आणि पशु व्यवस्थापनामध्ये दररोज काही ना काही बदल होत असतात त्याबद्दलचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे व त्या तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवांना फायदा व्हावा या अनुषंगाने ही प्रदर्शने आयोजित केली जातात.

आधुनिक तंत्रज्ञानाचं पशु दालन-धेनू अँप
ग्रामीण भागातील पशुपालकांचा विकास व्हावा व त्यांचे एकात्मिक दूध उत्पादन वाढावे यासाठी पशुपालन व दुग्धव्यवसायातील अत्याधुनिक माहिती देणारे धेनू अँप हे मंच, पशु ज्ञान, पशु बाजार, पशु व्यवस्थापन यांसारख्या विविध फीचर्स सह प्लेस्टोअर वरती मोफत उपलब्ध करून दिले आहे.
आज धेनू अँप लाखों शेतकऱ्यांच्या दुग्धव्यवसायात बदल करून उत्पादन वाढविण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहे.

कृषी प्रदर्शनाचे फायदे-
नवनवीन खते, बियाणे आणि औषधे याची माहिती डेमो सहित पाहायला मिळते.
ट्रॅक्टर चलीत नवनवीन यंत्रे जसे की नांगरणी, पेरणी, खुरपणी, डवरणी, छाटणी आणि सोंगणी यंत्रे पहायला मिळतात.
कमी जागेमध्ये जास्त पीक उत्पादन कसे घेतले आहे त्याचे डेमो प्लॉट देखील पाहायला मिळतात.
रोग व किडींचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या व्यवस्थापनाचे प्लॉट देखील पाहायला मिळतात. कमी जागेमध्ये व्हर्टीकल शेती कशी करावी शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस शेती व पीक उत्पादने पाहायला मिळतात.
टाकाऊ पदार्थांचे विघटन व टाकावू पासून टिकाऊ पदार्थांची निर्मिती या संबंधित विविध बाबी पाहायला मिळतात.
ऑटोमॅटिक पद्धतीने शेताला पाणी व खत व्यवस्थापनासाठी सूक्ष्म सिंचन प्रणाली, रेनगन, स्प्रिंकलर इरिगेशन प्रणाली संच पाहायला मिळतात.
इलेक्ट्रिक व सौर उर्जेवर चालणाऱ्या मोटारी, वाहने, गाड्या, ट्रॅक्टर्स पाहायला मिळतात.
शेतकऱ्यांनी घेतलेले विविध रंगांमधील दर्जेदार पीक उत्पादने उदा- कांदा, मिरची, डाळिंब, पेरू, संत्री, द्राक्ष, ऊस, केळी पाहायला मिळतात.
शेतीमध्ये आपणाला येणाऱ्या प्रत्येक अडचणींचे समाधान या कृषी दालनांमध्ये होते.
शेती क्षेत्रातील विविध तज्ञ मंडळी, वैज्ञानिक या ठिकाणी त्यांच्या कार्याची माहिती प्रसारीत करण्यासाठी उपलब्ध असतात.

पशु प्रदर्शनाचे फायदे-
अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाई-म्हशी व त्यांची वंशावळ या ठिकाणी पाहायला मिळते.
चारा व्यवस्थापनातील आधुनिकता जसे कि उदा. चारा बियाणे, सायलेज बंकर, बेल सायलेज, मुरघास बॅग इत्यादी.
जनावरांचे हूप ट्रिमिंग, हूप बाथ, हेअर ट्रिमिंग, काल्फ पेन, हेड लॉक सिस्टिम पाहायला मिळतात.
जनावरांच्या आरामासाठी रबर मॅट, खरारा करण्यासाठी ग्रुमिंग ब्रश, दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन, चारा कट करण्यासाठी कुट्टी मशीन, गोठ्यात थंडावा निर्माण करण्यासाठी कमर्शिअल फॅन व फॉगर्स पाहायला मिळतात.
टी.एम.आर मशीन, पशुखाद्य तयार करण्याची मशीन, जनरेटर इत्यादी छोट्या-मोठ्या मशनरी पाहायला मिळतात.
देशी गाई पासून बनवलेली देशी गो-उत्पादने आपणाला पहावयास मिळतात.

थेट गाई, म्हशी, शेळी व मेंढी पालकांसोबत संवाद साधू शकता व त्यांच्या यशस्वी गोपालनाची माहिती घेऊ शकता.
दुग्धव्यवसायामधील डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती देऊ शकता.
दुग्धव्यवसायातील तज्ञांशी व वैज्ञानिकांशी संवाद साधून आपल्या अडचणीचे निराकरण करू शकता.
पशुपालना संबंधित असलेली पुस्तके, व्हिडीओ कॅसेट, बुकलेट खरेदी करू शकता व माहिती मिळवू शकता.

पशुपालकांनो दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=LLCRNX- 

लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com

महत्वाच्या बातम्या;
सरकारने ठरवलंय शेतकऱ्यांना उबजारी येऊ द्यायचं नाही!! आता डीएपी खत दीडशे रुपयांनी महागले
काल वाह वाह आज थू थू!! पुणे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांचा प्रताप उघड..
बारामतीच्या पिवळ्या कलिंगडांची जयंत पाटलांना भुरळ, म्हणाले बारामतीकरांकडे..

English Summary: Agricultural exhibitions are becoming the pulse of modern technology, farmers know how to benefit Published on: 07 April 2022, 04:29 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters