सध्या कपाशी पीक चांगले बहरात असून जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. बरेच शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा बरेच शेतकरी पहिला पाऊस पडल्यानंतर कपाशी लागवड करतात. परंतु ज्या शेतकऱ्यांनी या कालावधीत लागवड केली आहे, ती कपाशी आता पाते धरण्याच्या अवस्थेत आहे.
परंतु नेमका याच कालावधीत बऱ्याच ठिकाणी विशेषता नाशिक जिल्ह्यामध्ये देखील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत असून शेतकरी त्यामुळे हैराण झाले आहेत.
गुलाबी बोंड आळी पासून मुक्तता मिळावी यासाठी कपाशी क्षेत्राचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डी. बी.उंदीरवाडे यांचा सल्ला अमलात आणावा असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी केले आहे.
नक्की वाचा:कापूस पिकातील सल्ला आकस्मित मर येणे यावर उपाय
सध्या जूनमध्ये लागवड केलेल्या कपाशीचे पीक एक पाते आणि बोंडे अवस्थेत असून यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी गुलाबी बोंड आळी नियंत्रणासाठी कृषी तज्ञांच्या सहाय्याने उपाययोजना करावी
ज्या शेतकऱ्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कपाशी लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांनी पिकाचे सूक्ष्मपणे निरीक्षण करावे व बोंड आळी वर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
ज्या भागांमध्ये कपाशीचे पीक 30 ते 40 दिवसांची किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे झाले असेल. अशा कपाशीच्या पिकांमध्ये फुलांच्या खालच्या बाजूला गुलाबी बोंड आळीची मादी एकेरी अंडी घालते
व त्यातून दोन ते तीन दिवसांमध्ये सूक्ष्म अळ्या बाहेर येऊन फुलांमध्ये प्रवेश करतात. या अळ्या फुलांमध्ये प्रवेश करून फुलाच्या उमलणाऱ्या पाकळ्या आतून तोंडातील धाग्याच्या साहाय्याने बंद करून अळी फुलांमध्ये उपजीविका करते.
नक्की वाचा:Agricultural Business: शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा लागवड; कमी कालावधीत व्हाल मालामाल
गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी उपाययोजना
1- पीक 90 दिवसांचे होईल तोपर्यंत पिकांमधील डोमकळ्या नष्ट कराव्यात.
2- एकरी दोन फेरोमन सापळे लावून त्याद्वारे पतंगाचे नियंत्रण करावे. वीस ते पंचवीस दिवसातून एकदा वडी बदलावी.
3- एकरी तीन ट्रायकोकार्ड याप्रमाणे पात्यापासून दहा ते बारा दिवसाचे अंतर आणि चार ते पाच वेळा कपाशी पिकामध्ये लावावे.
4- सापळा मध्ये पतंग अडकण्यास सुरुवात झाल्यानंतर पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडेरेक्टिन 1500 पीपीएम 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
5- फुलांमध्ये प्रादुर्भाव पाच टक्के दिसल्यास पुन्हा क्वीनालफॉस 20 टक्के केएएफ 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यात फवारणी करावी.
नक्की वाचा:कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या संदर्भात जागरूक राहून आवश्यकतेनुसार करा उपाययोजना
Share your comments