वाटाणा आहे रब्बी हंगामात भरपूर आर्थिक उत्पन्न देणारे पीक आहे. ज्या भागामध्ये मार्च महिन्यात ही थंड वातावरण व सरासरी तापमान 10 ते 20 अंश सेल्सिअस राहते. अशा ठिकाणी सध्या स्थितीतही त्वरित लागवड केली तरी चालते. त्यानुसार वाटाणा लागवडीचे उत्तम नियोजन करावे. या लेखात आपण वाटाणा पिकाच्या उत्तम उत्पादनासाठी व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.
वाटाण्याची नवीन लागवड
- जमिनीची निवड:
- लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. कसदार,रेती मिश्रित जमीन असली तर या पिकासाठी उत्तम असते.
- वाटाणा पिकासाठी लागवड करण्यापूर्वी मशागतीला फार महत्व आहे. त्यासाठी जमिनीची एक वेळा चांगली नांगरट करावी व कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.जमीन चांगली भुसभुशीत करून लागवड करावी.
- सद्यस्थितीत लागवडीसाठी लवकर येणार या जातींची निवड करावी. उदा.निटीओर,अर्लीबॅजरइत्यादी.
- लागवडीसाठी सपाट वाफे किंवा सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केल्यास फायदा होतो.सपाट वाफ्यात 60 सेंटीमीटर×7.5 सेंटिमीटर अंतर ठेवून लागवड करावी. सरी-वरंब्यावर लागवड करायची असल्यास 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या सोडाव्यात. सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने किंवा पाभरीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने लागवड केल्यास रोपांमधील अंतर साडेसात सेंटिमीटर ठेवावे. टोकण पद्धतीने हेक्टरी 20 ते 25 किलो बियाणे लागते तर पाभरीने पेरणी केली तर एकरी 50 ते 75 किलो बियाणे लागते.
- वाटाणा या पिकाला प्रति हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत पेरणीपूर्वी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. रासायनिक खतमात्रा देतांना प्रति हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र, 50 ते 60 किलो स्फुरदआणि 30 ते 40 किलो पालाश द्यावे. पेरणी करतांना संपुर्ण स्फुरद व पालाश तसेच निम्मे नत्र द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावे.
नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लागवड करायची असल्यास
- गरजेनुसार खुरपणी करून तण नियंत्रण करावे. खुरपणी मुळे जमीन भुसभुशीत राहण्यासाठी मदत मिळते.
- वाढत्या थंडीच्या काळात पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल वातावरण असते. त्यादृष्टीने नियोजन करावे.
- वाटाण्याच्या शेंगा पक्व होताना त्यांचा हिरवा रंग बदलून फिकट होतो. हिरवट गोलाकार शेंगा दर दोन ते तीन दिवसांनी काढणीस तयार होतात. शेंगांची काढणी लागवडीखालील क्षेत्राचा अंदाज घेऊन दोन ते चार आठवड्यात पूर्ण करावी. काढणीचा पूर्ण हंगाम तीन ते चार तोडणीमध्येआटोपेल असे नियोजन करावे.
पाण्याचे व्यवस्थापन
- नवीन लागवडीत बी पेरल्याबरोबर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार सहा ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- सद्यस्थितीत फुले लागण व शेंगा लागण आलेल्या पिकास योग्य पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. या काळात फुले आल्यापासून शेंगांचा बहर पूर्ण होईपर्यंत सात ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
पीकसंरक्षण
रोगनियंत्रण
- भुरी–नियंत्रण: फवारणी प्रति लिटर पाणी
- विद्राव्य गंधक दोन ग्राम
मररोग नियंत्रण
- पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम अडीच ते तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- वारंवार एकाच जमिनीवर वाटाणा हे पीक न घेता पिकांची फेरपालट करावी.
शेंगा पोखरणारी अळीचेनियंत्रण
- निंबोळी अर्क 5% किंवा
- अझडिराक्टिन (1000 हजार पीपीएम) पाच मिली किंवा
- क्विनोलफॉस ( 25% ) 1.6मिली
- आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने दुसरी व तिसरी फवारणी करावी.
मावा, तुडतुडे,फुलकिडे नियंत्रण
फवारणी प्रति लिटर पाणी
- निंबोळी अर्क 5% किंवा
- अझाडीरेक्टीन (1000 हजार पीपीएम) तीन मीली किंवा
- डायमेथोएट ( तीस टक्के ) 1 मिली
- आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी
Share your comments