जळगाव : आतापर्यंत झालेल्या योग्य प्रमाणातील पाऊस, सूर्यप्रकाशामुळे कपाशीची वाढ जोमात होत आहे. यामुळे कापसाचे अधिकाधिक उत्पादन हाती येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.पाऊस पाणी, सूर्यप्रकाश ‘ओकेमध्ये’ असेल, कापसावर रोगराई नसेल तर यंदा २५ लाख कापसाच्या गाठी तयार होवू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी पावसाअभावी केवळ
९ लाख कपाशीच्या गाठी तयार झाल्या होत्या. त्याची भर या हंगामात निघेल, अशी माहिती जिनिंग व्यावसायिकांनी दिली.गतवर्षी (२०२१) पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली होती. Last year (2021) there was heavy rain several times during monsoon.यामुळे हातातोंडाशी आलेल्या कापसाचे उत्पादन हातचे गेले होते. कापसाची टंचाई निर्माण झाल्याने जिनिंग चालकांना फेब्रुवारी मार्च महिन्यातच जिनिंग बंद कराव्या लागल्या होत्या. जिनिंग उद्योगाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला होता.
दुसरीकडे मात्र कापसाला ९ ते १३ हजारांपर्यंत दर प्रतिक्विंटल मिळाला होता. यंदाही कापसाला चांगला दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी १० टक्के अधिक पेरण्या फक्त कापसाच्या केल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या पावसाने कापूस पिकांची स्थिती उत्तम आहे.आगामी काळात फक्त अतिवृष्टी झाली नाहीतर कपाशीला चांगले बोंडे येतील, अळीचा प्रादुर्भाव होणार नाही. उत्पादन चांगले येण्यास मदत होणार आहे. असे असले तरी अजून महिनाभर पाऊस कसा
पडतो त्यावर चित्र अवलंबून आहे. अधिकच्या उत्पादनाबाबत एक सप्टेंबरनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. आगामी काळात योग्य प्रमाणात पाऊस पडावा, अशी प्रार्थना शेतकरी करताना दिसतात.जिनिंग व्यावसायिकांना कापसाची प्रतिक्षा : गतवर्षी कमी कपाशीमुळे जिनिंग व्यवसायिकांना वेळेपूर्वीच जिनिंग बंद करण्याची वेळ आली नव्हती. यंदा कापूस पिकांची चांगली स्थिती असल्याने उत्पादन
अधिक येऊन मागील वर्षाची भर यंदा निघण्याची आशा आहे. गतवर्षी आलेल्या तोट्यामुळे बँकांमध्ये संबंधितांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली नाही.यंदा नवीन कर्ज घेताना त्यांना बँका कर्ज देतील किंवा नाही याची शंका आहे. कापसाची शंभर गाठी तयार करण्यासाठी चाळीस ते पन्नास लाखांची गरज असते.तेवढं भांडवल उभे करण्यासाठी बँका तयारी दर्शविली पाहिजे.
काही ठिकाणी दोनशे ते पाचशे गाठी तयार होतात. त्याप्रमाणात एक कोटी ते पाच कोटीपर्यंत भांडवलाची उभारणीसाठी जिनिंग व्यावसायिक प्रयत्न करताना दिसतात. गाठी तयार करून तो माल लागलीच विकला जात नाही;विकला गेला तरी त्याचे ‘पेमेंट’ लागलीच होत नाही.दुसरीकडे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात कापसाचे पेमेंट द्यावे लागते. महिनाभराची साईड दिल्यावरही समोरील पार्टीकडून
वेळेत ‘पेमेंट’ येईल याबाबत शंका असते. स्पर्धेचे युग असल्याने या व्यवसायातही स्पर्धा वाढली आहे.सुमारे दीडशे जिनिंग प्रेसिंगचे कारखाने आहेत. यंदा ते सर्व सुरू होऊन सुमारे २५ लाख गाठींची निर्मिती शक्य आहे. आगामी काळात अतिवृष्टी व्हायला नको, सोबतच बोंडअळी सारखा प्रादुर्भाव झाला नाही पीक चांगले राहिल. सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील कापूस परिषद जळगावला घेण्याचा विचार आहे.
- प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशन
Share your comments