1. कृषीपीडिया

ऊस उत्पादकांचे कष्ट वाचणार! आता यांत्रिकीकरणाचा प्रयोग करून होणार ऊस लागवड

काळाच्या ओघानुसार शेतकरी आपल्या शेत पद्धतीमध्ये बदल करत निघाला आहे जे की शेतीसाठी विविध प्रकारची यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे. ज्यामुळे शेतमजुरीचा खर्च ही वाचत आहे आणि सोबतच वेळ सुद्धा वाचत आहे. आजच्या स्थितीला शेतीसाठी लागणारे जे मजूर आहेत त्यांच्या मजुरी चा सुद्धा खर्च वाढलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे आता हाच खर्च कमी करण्यासाठी शेतकरी यांत्रिकीकरनाचा वापर करून शेतीमध्ये लागवड करत आहेत. यांत्रिकीकरणमुळे कामे सुद्धा झटपट होतात तसेच वेळ सुद्धा वाचतो शिवाय खर्च ही कमी होतो.

किरण भेकणे
किरण भेकणे
sugarcane

sugarcane

काळाच्या ओघानुसार शेतकरी आपल्या शेत पद्धतीमध्ये बदल करत निघाला आहे जे की शेतीसाठी विविध प्रकारची यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे. ज्यामुळे शेतमजुरीचा खर्च ही वाचत आहे आणि सोबतच वेळ सुद्धा वाचत आहे. आजच्या स्थितीला शेतीसाठी लागणारे जे मजूर आहेत त्यांच्या मजुरी चा सुद्धा खर्च वाढलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे आता हाच खर्च कमी करण्यासाठी शेतकरी यांत्रिकीकरनाचा वापर करून शेतीमध्ये लागवड करत आहेत. यांत्रिकीकरणमुळे कामे सुद्धा झटपट होतात तसेच वेळ सुद्धा वाचतो शिवाय खर्च ही कमी होतो.

पैठण तालुक्यात सात गावांमध्ये प्रयोग :-

शेतीसाठी वाढलेला मजुरी खर्च पाहून पैठक तालुक्यातील लोहगावसह अनेक सात गावामध्ये यांत्रिकीकरनाचा वापर करून कमी वेळेत जास्त क्षेत्रात ऊस लागवडीचा प्रयोग केलेला आहे. या प्रयोगासाठी पैठण तालुक्यातील सेहगल फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे. शेतकऱ्यांवर नेहमी कोणती न कोणती संकटे हजर असतातच जे की दुष्काळ पडल्यानंतर शेतीला पाणी न्हवते त्यामुळे शेतात पिकेच न्हवती आणि शेतजमिनी पडीक पडल्या होत्या. दुष्काळ झाल्यानंतर अतिवृष्टी झाली त्यामुळे पानी ही उपलब्ध झाले सोबतच शेतीमधील पिकासाठी लागणारी खते, बियाणे, बेणे तसेच मशागत आणि शेतीसाठी लागणारा जो मजुरी खर्च आहे तो सुद्धा वाढलेला आहे त्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात अडकलेले असतात.

सेहगल फाउंडेशनद्वारे अनेक उपक्रम :-

शेतीसाठी लागणार एवढा सर्व खर्च भागवून जर निसर्गाने अवकृपा दाखवली तर गेलेला खर्च सुद्धा माघारी येणे अशी शेतकऱ्यांची पंचायत होते त्यामुळे पैठण तालुक्यातील लोहगाव सोबत मुलानीवाडगाव, ढाकेफळ, तोडोंळी, इसारवाडी, वरूडी, बालानगर या सात गावांनी उसासाठी लागणारा एवढा खर्च कमी करण्यासाठी तसेच उत्पन्न जास्त मिळवण्यासाठी यांत्रिकीकरनाच प्रयोग केला आहे. बालनगर येथील सेहगल फाउंडेशनच्या माध्यमातून रब्बी हंगामामध्ये सेंद्रीय शेती तसेच खरीप हंगाम आणि कृषी तज्ञांचे मार्गदर्शन व यांत्रिकरणाचा वापर तसेच पीक प्रात्यक्षित, सूक्ष्म अन्नद्रव्य, हिरवा चारा पिके इत्यादी सर्व कार्यक्रम राबिवण्यात येतात.

२५ एकर शेतात लागवडीचा प्रयोग :-

मागील महिन्यापासून २५ एकर खोंडवा ऊस शेतामध्ये हुमणी कीड नियंत्रण तसेच पचतकुंटी, विद्राव्य खत वाटप व त्या २५ एकरात ट्रॅक्टरद्वारे एकाच वेळी ऊस लागवडीचा प्रयोग हाती घेण्यात आला आणि त्याचा प्रयोग शेतकऱ्यांना दाखवण्यात आला होता. या दरम्यान त्या जागेवर सेहगल फाऊंडेशनचे राज्य प्रमुख विष्णु खेडकर, शेती सहायक राजपाल सोनकांबळे, प्रकल्प समन्वयक योगेश शिंगारे, विकास शिसोदे, गणेश शिदे, गणेश गवळी, जाकीर शेख, ज्ञानेश्वर शिंदे, गंगाराम भागवत, योगेश शिरवत, रामनाथ पाचे, रामनाथ भवर, सुरेश बोरूडे, गीताराम भवर, नितीन भवर, भागचंद कोरडे, कृष्णा भवर, अर्जुन जगधने,लक्ष्मण शिरवत, राहुल दळे इत्यादी सर्व शेतकरी तसेच अधिकारी उपस्थित होते.

English Summary: ऊस उत्पादकांचे कष्ट वाचणार! आता यांत्रिकीकरणाचा प्रयोग करून होणार ऊस लागवड Published on: 22 February 2022, 01:57 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters